यकृत रोग सामान्य उपचार व पथ्य

यकृत रोगावर सामान्यत: सर्व प्रकारचे रक्‍तपित्तघ्न उपचार करावेत. रक्‍त व पित्त यांचा आश्रयाश्रयी भाव लक्षात घेता. विरेचन व रक्तमोक्षण हे महत्त्वाचे उपक्रम आहेत.

विरेचन – विशेषत: विरेचन हे यकृत रोगावर आवश्यक ठरते.

औषधांमध्ये तिक्त द्रव्यांपैकी कडुनिंब, करंज, सारिवा, मंजिष्ठा; खदिर, गुडूची ही द्रव्ये प्रामुख्याने वापरली जातात.

रक्‍तवह स्त्रोतसाची दुष्टी असताना ही दुष्टी कोणत्या दोषाने झाली आहे हे पाहून त्यानुसार तसेच कोणत्या शरीरावयवांची दुष्टी आहे हे पाहून जलौका, अलाबू, शृंग वा सिराव्यध या द्वारे रक्‍तमोक्षण केले जाते.

रक्‍तवह स्त्रोतसाची दुष्टी होऊन रक्‍ताचे विमार्गगमन होत असेल तर कषाय रसाची व रक्‍तस्तंभनासाठी प्रसिद्ध द्रव्ये वापरली जातात.

उर्ध्वमार्गाने रक्‍ताचे विमार्गगमन असेल तर वासा, लाक्षा, गोदंति इ. द्रव्ये उपयुक्त ठरतात तर अधोमार्गाने रक्‍त जात असेल तर नागकेशर ई द्रव्ये उपयुक्त ठरतात.

मौक्तिक, कामदुहा, प्रवाळ, गोदंति किंवा पद्यकादि तैलासारखी द्रव्ये कोणत्याही मार्गाने रक्‍तस्राव असताना उत्तम कार्यकारी ठरतात.

लिव्हरचे आजार टाळण्यासाठी काय करावे ?  प्रतिबंधात्मक उपाय

  • पित्त होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी पित्तदोष संतुलित राहण्याकडे कायम लक्ष ठेवणे आवश्‍यक असते.
  • या विकारात वेळेवर जेवण करणं महत्त्वाचं असतं. भूक मंदावणे, मळमळणे यासाठी जेवणाआधी आलं-लिंबाचा रस व सैंधव यांचे मिश्रण घेण्याचा फायदा होईल.
  • नाश्‍त्यासाठी, तसेच संध्याकाळी पाचच्या सुमाराला साळीच्या लाह्या खाणे चांगले.
  • पित्तसंतुलनासाठी वैद्याच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार घेणे. प्यायचे पाणी उकळून गाळून घेतलेले असावे.
  • जेवणातील तेल-तुपाचे प्रमाण (स्वयंपाकातील) योग्य प्रमाणात असावे म्हणजे फोडणीसाठी माफक तेल, भातावर थोडे साजूक तूप (हे लोणी काढून घरी बनवलेले तूपच असावे) इतके चालेल. खोबरे व शेंगदाण्याचाही वापर माफक प्रमाणात करावा.
  • कृत्रिम रंग, रासायनिक प्रिझर्वेटिव्हज्‌ टाकलेले खाद्य पदार्थ टाळणे आवश्‍यक. ढोबळी मिरची, आंबट दही, कोबी, फ्लॉवर, चिंच, टोमॅटो, अननस, तळलेले पदार्थ, आंबवलेले पदार्थ टाळणे श्रेयस्कर. योग्य प्रमाणात तेला-तुपाचा वापर आहारात असावा. फरसाण, वेफर्स, वडापाव यासारखे खाद्यपदार्थ टाळावेत. तळलेले पदार्थ, फास्ट फूड वरचेवर खाऊ नये. जेवणात रोज कोशिंबीर वा सॅलड घ्यावे.
  • चिकू, सफरचंद, पपई, संत्री, मोसंबी, केळे अशी फळे खावीत.
  • दर १५ दिवसांनी तीन दिवस साजूक तूप २-२ चमचे दोनवेळा गरम पाण्याबरोबर घेऊन चौथ्या दिवशी विरेचन म्हणजे जुलाबाचं औषध घ्यावं. यामुळे पित्ताचे खडे विरघळून जाण्यास मदत होते.
  • रोज नियमित व्यायाम करावा. रोज एक तास चालायला जावे.

३) जिरे, धणे, हिंग, सैंधव हे मिश्रण ताकांत मिसळून भोजनोत्तर घ्यावे. याने पित्ताचे सम्यक उदिरण होणे, खाल्लेले अन्न पचण्याचे कार्य होते. (ताक १ वाटी–इतर पदार्थ एकत्र करून १ चमचा घ्यावे.)

४) हळद, हिंग,सैंधव, ओवा यांची १॥ चिमटी पूड, कागदी लिंबूमध्ये चिरून त्यांत भरावी व सदर लिंबु दोऱ्याने बांधून लोखंडी पळीत आगीवर तापवावे व जेवणापूर्वी चोखून घ्यावे. याने पाचक स्त्राव कमी पडत असल्यामुळे होणारे सर्वे त्रास कमी होतात. अर्थातच यकृताची मंदता असल्यास हा प्रयोग लाभ देतो.

५) सुप प्रयोग- 

अजा यकृत, कुक्कुट यकृत, पाया सूप, यात अस्थि- मज्जा यांची उपस्थिती असते. रक्‍त व मांस हे असतातच.)

कोबी, गाजर, पालक यांचे वाफाळून केलेले व त्यांत लोणी, तूप, काळीमिरी, जिरे, धणे, सैंधव हे पदाथ घालुन सिद्ध केलेले सूप हे पचन संस्थेवर ताण न देता (स्ववीर्याने पचून व संस्काराने लघु होऊन) बृहण व बल्य गुणधर्म दाखवते.

६) लाजामंड- चांदीचे भांड्यात रात्रभर भिजत घातलेले लाहयांचे पाणी हे साध्या पाण्याऐवजी पिण्यासाठी वापरावे. याने रक्‍तवह स्त्रोतसगत दोष व विषरुप द्रव्ये नष्ट होण्यास मदत होते. दिवसभरात किमान १ लिटर प्यावे.

७) तवकिर, शिंगाडा, कमलबीज यांची खीर ही उत्तम तर्पण करते. विशेषत: पित्तवातज संसर्गावस्थेनंतर याचा उपयोग करावा.

८) दाडीमावलेह- मोरावळा यांचा उपयोग करावा. याने रसादि धातुना ताकद मिळते.

९) गाजर उकडून खावे. उकडण्यामुळे यातील उग्रगंध व तीक्ष्णता कमी होते. अग्निदीपन, पाचन, क्लेदशोषण ही कामे तीनही गाजराकडून उत्तम होतात.

१०) आमसूल, पुदीना, कोंथिबीर, काळोमिरी, आले, ओले खोबरे यांचा उपयोग चटणीसाठी करावा. याने अग्निदिपन होऊन अरुचि नष्ट होते.

११) गाजर, बीट, मुळा, काकडी, पालक, कोबी, उकडलेला बटाटा यांचा उपयोग कोशिबीरीसाठी करावा. याने आतड्यातील रुक्षता कमी होते व त्याने मलप्रवृत्तीची तक्रार होत नाही.

१२ ) भोजनाग्र सदापथ्य लवणाद्रक भक्षणम- जेवणापूर्वी आल व सैंधव तुकडा एकत्र करून खावा.

१३) जेवणानंतर बडिशेप, ओवा, बाळंतशेपा, पिम्पळीमूळ, चवक, सैंधव, बिडलवण यांचे मिश्रण पाचक म्हणून घ्यावे.

१४) शेवटचे व महत्वाचे म्हणजे ” भोजनाचे सर्व नियम काटेकोर पाळले जाणे ”  हे होय.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top