गणपतीला दुर्वा का प्रिय आहेत? जाणुन घ्या.

घरोघरी गणपती पूजन होते व गणपतीला दुर्वा प्रिय असल्यामुळें त्या गणपतीला वाहतात.म्हणुनच दुर्वा सर्वांच्या परिचियांची आहे.

परंतु दुर्वा गणपतीला का प्रिय आहेत जाणुन घ्या. गणेश पुराणात अनलासुराची कथा सांगून दुर्वाचे महात्म्य व दुर्वा चे फायदे फार मार्मिकतेने दिले आहे.

अनलासुराची सुरस कथा.

पुर्वी अनलासुर नावाचा महान पराक्रमी राक्षस होऊन गेला. तो इतका प्रबळ झाला होता कीं, त्यानें देव-दानवांना आपल्या तेजाने त्राही भगवान करून सोडलं होतं.

दावानलाप्रमाणें दाहक अशा त्रासामुळे देव दु:खी कष्टी होऊन गणरायाला शरण गेले.

देवांनी गणपतीला प्रार्थना करून अनलासुराचा बंदोबस्त करण्याची विनंति केली.

देवांच्या विनंतीला मान देऊन गणरायानें अनलासुराशीं युद्ध सुरू केले.

अनलासुर युद्धांत गणपतीकडून काहीं केल्या हरत नव्हता. जेव्हां शस्त्रास्रांचा त्यांच्यावर कांहींच परिणाम होईना, तेव्हां शेवटी गणरायानें अनलासुराला आपल्या चारही हाताने उचलुन मोदकासारखे खाऊन टाकले. अश्या तऱ्हेने अनलासुराचा अंत केला.

देव अनलासुराच्या त्रासांतून जरी मुक्त झाले तरी गणपतीला मात्र त्रास सुरू झाला.

गणपतीच्या सर्वांगाची आग होऊं लागली. दाह सुरू झाल्यामुळें त्या दाहानें त्रस्त होऊन गणपती थयथय नाचूं लागला.

सर्व देव दाह शांतीसाठी नाना तऱ्हेचे उपचार करूं लागला, परंतु कशानेहि गणपतीचा दाह थांबेना, आग कमी होत नव्हती.

शेवटीं सर्व देव गणपतीला घेऊन श्री विष्णूला हरण गेले. हजारों ऋषी श्री विष्णूची प्राथना करून गणपतीच्या अंगाचा दाह थांबविण्यासाठी उपाय विचारूं लागले.

श्री विष्णू म्हणाले ! देव ऋषी जनहो ! दाहशांतीसाठीं अद्‌भुत वल्ली मी अजनीतलावर भरपूर निर्माण करून ठेवली आहे. तिचा उपयोग तुम्ही गणपतीच्या दाहशांतीसाठी करावा म्हणजे त्याच्या सर्वांगाचा दाह कमी होईल.

भगवान विष्णू म्हणाले, ऋषीमुनींनों या अद्‌भुत वनस्पतीचे गुणधर्म व परिचय मी तुम्हाला सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐका.

कांडात्‌ कांडात प्ररोहंती । पुरुषः पुरुष स्परी ।
एवानो दुर्वे प्रतनु सहस्त्रेण । शतेनचा ॥

अशी ही दुर्वा नांवाची वनस्पती तुम्ही घेऊन या आणि तिनें गणपतीची पुजा करा.

श्री विष्णूची ही अमृतमयी वाणी ऐकून एक हजार एकशे आठ ऋषींनी प्रत्येकि १०८ दुर्वा गणपतीला अर्पण केल्या. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे गणपतीच्या अंगाचा दाह शांत झाला.

अशी ही अद्‌भुत व सुरस कथा गणेश महात्म्यांत वर्णन केली आहे.

दुर्वा हे दाह शांतीचे सर्वोत्कृष्ट व सुलभ औषध आहे हे या कथेतून मोठ्या चातुर्याने निवेदन केले आहे.

गणपती पूजनांत याचसाठी दुर्वा गणपती व्रत महात्म्य विशेषत्वाने सांगितलें आहे.

दुर्वा महात्म्य
(ओवीवृत्त)
जेव्हां म्या भक्षिला अनलासुर ।
तेव्हां दाह झाला भर्यकर ॥
परी सेविता दुर्वाकुर ।
दाह शांत झालासे ॥१॥
म्हणोनि दुर्वा मला घाहती ।
परी त्यांतील मर्म न जाणती ॥
गणेशा भक्ता काही न प्राप्ती ।
इहलोकी वा परलोकीं ॥२॥
माझे महात्म्य वाचावे ।
परी त्यांतील मर्म ओळखावें ॥
आणि आचरणांत आणावें।
सूक्षे भावार्थ जाणोनी ॥३॥

चातुर्मास्यांत अनेक सण व व्रते घरोघर पाळली जातात. अशा वेळीं देवपूजेच्या साहित्यांत गंध, अक्षता, फुलें या बरोबरच दुर्वा यांची आवश्‍यकता असते.

पूजा सांगतांना भटजी मंत्र म्हणत असतात व एकेका मंत्राने एकेक वस्तु देवाला समर्पण करावयास सांगतात. गणपतीला दुर्वा वहात असतांना जो मंत्र सांगितला जातो तो वरीलप्रमाणे आहे.

वरील मंत्रांतून दुर्वाचा गुणधर्म उत्तमरित्या वर्णन केला आहे.

गणपतीला दुर्वा वाहव्यात यांतही विशेष अर्थ आहे.

पुजा ही प्रसन्न करण्याकरितां असते.

मनुष्य आपणाला जे प्रिय असतें ती वस्तु मिळाल्याने प्रसन होतो व आपणाला ज्यानें बरें वाटते ती वस्तु आपणाला प्रिय असते.

थंडी झाली म्हणजे उष्ण उपचाराने बरें वाटते.

पित्तप्रकृतीच्या गणरायाला पित्तशामक दुर्वा प्रिय असणें हें आरोग्यशास्त्रदृष्ट्या योग्य आहे. म्हणुनच गणपतीला प्रिय असणाऱ्या गणेश २१ पत्रीत दुर्वा प्रथम क्रमांकाला आहे.

पित्ताचा जो जो विकार असेल त्या त्या विकारांत दुर्वा उपयोग पित्तनाशक म्हणून उपयोग करावा याचें मार्गदशन रोजच्या देवपूजेनें आपणास करून देण्याची मार्मिक युक्ति आपल्या पूर्वजांनी योजली आहे.

दुर्वा सर्वांच्या परिचयाची व सर्वत्र आढळणारी वनस्पती आहे. हिला हरळी नेहमी हिरवी असतें म्हणून असेंही म्हणतात, हे एक प्रकारचे गवत आहे;

या गवताच्या दोन जाती आहेत. एक पांढरी व दुसरी निळसर हिरवी या दोन्ही औषधाकरिता उपयोगांत आणतात.

ताजा दुर्वाचा रस शरिरातील विविध तक्रारीसाठी वापरतात.

वेदाकेअर हे औंध पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. जे सर्वोत्तम आयुर्वेदिक उपचार देते. वेदाकेअर औंध पुणे येथे सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संपर्क

9175069155
9028191155

वेळ

सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00

पत्ता

ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे

3 thoughts on “गणपतीला दुर्वा का प्रिय आहेत? जाणुन घ्या.”

  1. Pingback: दुर्वा - www.harshalnemade.com

  2. Pingback: DHANVANTARI JAYANTI /DHANTRAYODASHI - www.harshalnemade.com

  3. Pingback: तोंड येणे-माऊथ-अल्सर-जिभेला फोड येणे १० उपाय

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!