आयुर्वेद-मायग्रेन-उपचार

मायग्रेन एक डोकेदुखी व आयुर्वेद
Ayurvedic Treatment for Migraine Headache

मायग्रेन हा डोकेदुखीचा आजार आजकाल फारच सामान्य झाला आहे. जगभरात 15% लोक मायग्रेनला पीडित आहेत. 

बहुतेक लोकांना वाटते की ते फक्त डोकेदुखीमुळे ग्रस्त आहेत आणि औषधोपचार घेत नाहीत किंवा फक्त डोकेदुखीचा परस्पर औषधोपचार करतात, ज्यामुळे त्यांना पुढे खूप त्रास भोगावा लागतो. तर अश्या या मायग्रेन जाणुन घेऊया.

मायग्रेन कारणे :-

 • रुक्ष भोजन, अतिभोजन, अध्यशन, सततचा वारा, अतिमैथुन, वेगांचे धारण करणे, अतिपरिश्रम
 • अतिव्यायाम, दिवसा झोपणे, रात्री जागरण करणे, अति मद्यपान, फार मोठ्याने बोलणे, थंड हवेत फिरणे.
 • असात्म्य गंध सेवन, धूर-धूळ- उन्हामध्ये काम करणे, अतिशीत जलपान, डोक्याला मार लागणे, रडणे.
 • अश्रुंचा रोध करणे, सतत खाली पाहणे, पाण्यात अधिक वेळ डुबणे, गुरु-अम्ल पदार्थांचे तसेच 
 • हिरव्या पालेभाज्यांचे अतिप्रमाणात सेवन, शिळे खाद्य पदार्थ, कोरडे, उकळते, मसाल्याचे पदार्थ, तेलकट. 
 • खारट,चीजयुक्त पदार्थ किंवा प्रक्रिया केलेले अन्न खाणे, वेळेवर जेवण न करणे किंवा सतत उपवास करणे.
 • भोजनातील अनियमितता, राग, ईर्ष्या, ताणतणाव आणि मानसिक चिंता, मद्य आणि कॅफिनेटेड पेये.
 • आधुनिक औषधांच्या अति व चुकीच्या वापरामुळे, दीर्घ मुदतीसाठी परस्पर सतत डोकेदुखीचे औषध घेणे.
 • स्त्रीयांमध्ये हार्मोनचे संतुलन बिघडणे, गर्भ निरोधक गोळ्या आणि हार्मोनल थेरपी, ट्यूमर, जंतुसंक्रमण.
 • आघाताने मेंदुचे नुकसान, मेंदुत रक्तस्त्राव, मणक्यामधील किंवा मेंदुतील विष आणि विषारी संसर्ग.
 • मेंदुतील रक्तवाहिन्यांच्या समस्या, हवामानातील बदल व वंशपरंपरा हेही या रोगास कारणीभूत ठरतात.

मायग्रेनची लक्षणे:-

वरील कारणांनी प्रकुपित झालेला वायु स्वतंत्रपणे किंवा कफाबरोबर शिर:प्रदेशाच्या अर्ध्या भागामध्ये स्थानसंश्रय करतो. त्यामुळे मन्या, भृप्रदेश, शंख, कर्ण, नेत्र व ललाट तथा मस्तिष्काचा अर्धा भाग यामध्ये शस्त्राने कापल्याप्रमाणे, अग्निने जाळल्याप्रमाणे किंवा घुसळल्याप्रमाणे अत्यधिक प्रमाणात तीव्र स्वरूपाच्या वेदना उत्पन्न होतात. 

डोकेदुखी शंखप्रदेशात सुरू होऊन पसरतो. डोकेदुखी बहुतकरून पाळीने येतो. प्रथम मानेच्या शिरा जाड होतात व ताठतात, नंतर एक कान, एक डोळा यात दुखावा सुरू होऊन संबंध अर्धे डोके दुखते. 

आवाज सहन होत नाही. बोलवत नाही.

 थोडा ताप येतो. तीन दिवस ते एक आठवडा ही लक्षणे राहून एकदम डोके दुखणे थांबते व पुन्हा महिना पंधरा दिवसांनी सुरू होते. 

डोक दुखताना मळमळ, उलट्या, प्रकाश आणि आवाज यांच्या अतिसंवेदनशीलतेमुळे डोक्याच्या एका भागात थरथरणारा आणि धक्कादायक संवेदना होतात. 

मायग्रेनच्या डोकेदुखीदरम्यान रोग्याला शांत आणि अंधारात बसणे आवडते. गंभीर प्रकरणांमध्ये पीडा संचारी व विदारणवत्‌ असते. 

रोगी भुकेलेला असेल तर वेदना अधिक असतात. शिर:स्पंदन घडते आणि नाकातून स्रावही वाहत असतो. 

ज्यावेळी वाताचे आधिक्य असेल त्यावेळी स्पंदन व पित्ताचे आधिक्य असेल तर स्त्राव अधिक प्रमाणात येतो.

best ayurvedic treatment for migraine in india

शिर:शूल हा रात्री, दिवसा, कोणत्याही वेळी उत्पन्न होतो. 

डोकेदुखी काही तासांपासून काही आठवड्यांपर्यंत सतत असू शकते. हा शूल १० दिवस, १५ दिवस वा एक महिन्याने पुनःपुन्हा सुरु होतो. 

काही विशिष्ट वेळानंतर हा आपोआप थांबतो. त्रिदोषात्मक असलेल्या या रोगात वाताचे प्राधान्य असते, पण कफ, पित्ताचा अनुबंधही अनेक वेळा आढळतो. 

कफाचा अनुबंध असेल तर सकाळी व पित्तानुबंध असेल तर मध्यान्हकाळी डोकेदुखी सुरू होते. हा विकार फार दिवस राहिला तर डोळा अगर कान यांची शक्ती कमी होते, अथवा ते निकामी होतात. 

मुकता, एकांगवात, नेत्रपेशीघात व अर्धांगवायु यासारखे अनेक उपद्रव यामध्ये उत्पन्न होताना दिसतात.

व्यवहारात हा व्याधि वृद्धांपेक्षा तारुण्यावस्थेत किंवा बालकात अधिक प्रमाणात आढळून येतो. अनेक वेळा पालकांना माइग्रेन असल्याचा कुलज इतिहासही मिळतो, सामान्यत: पुरुषांपेक्षा स्त्रिया तीनपट जास्त पीडित असतात. 

मायग्रेन कोणत्याही वयात असू शकते, परंतु बहुतेक लोकांना वयाच्या चाळीश्यावा वर्षी माइग्रेनची शक्यता जास्त असते.

तर या मायग्रेन डोकेदुखीवर उपाय बघुया

मायग्रेन आयुर्वेद उपचार :-

1) शिरोविरेचन, नाडीस्वेदन आणि अनुवासन बस्ति हे प्रमुख उपचार केले जातात.

2) अवपीडक नस्य (नाकात औषध सोडणे) हाही यावर उपयुक्‍त ठरणारा एक चांगला उपक्रम आहे.

3) विविध प्रकारचे शिरोबस्ति (डोक्यावर औषधि तेल धारण करणे) वापरले जातात.

4) औषधि कल्क / लेप डोक्याला लावण्यासाठी वापरतात.

5) वरील उपचाराने उपशम झाला नाही, तर शंखप्रदेशी दहनकर्म ( धातूच्या शलाकेने चटका देणे ) केल्यानेही त्वरेने फायदा होताना दिसतो.

6) सिराव्यध करून रक्तमोक्षण करणे हेही फायद्याचे ठरते.

7) अभ्यंतरः निदानापरत्वे आयुर्वेदिक औषधींचा प्रामुख्याने उपयोग केला जातो.

8) जास्त बिया असलेले भाज्या, मटार, टोफू, सोया सॉस, पिझ्झा, पनीर, चीज केक्स, चीज स्लाइस, लोणचे, रेडी टू इट पदार्थ इत्यादीमुळे माइग्रेन वेदना वाढू शकते. म्हणून मायग्रेन असताना हे पदार्थ टाळले पाहिजेत.

9) मायग्रेन टाळण्यासाठी संतुलन जीवनशैलीचा राखणे आवश्यक आहे. वेदना टाळण्यासाठी वेदानाहर औषधांचा अतिवापर टाळणे गरजेचे आहे कारण ते समस्या वाढवतात, त्यांच्या प्रभावामुळे डोकेदुखी वारंवार होते व वाढते

10) आपण वेदनाहर औषधींच्या दुष्टचक्रात न अडकता या समस्येच्या मुख्य कारणांकडे लक्ष देऊन उपचार करणे आवश्यक आहे.

11)औषधी दुकानांतुन परस्पर औषधे न घेता आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगले आहे.

वैद्य. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद
9175069155

6 thoughts on “मायग्रेन एक डोकेदुखी व आयुर्वेद Ayurvedic Treatment for Migraine Headache”

 1. Pingback: गणपतीला दुर्वा का प्रिय आहेत? जाणुन घ्या. - www.harshalnemade.com

 2. Pingback: किडनी फेल्युअर आणि आयुर्वेद - www.harshalnemade.com

 3. Pingback: किडनी फेल्युअर आणि आयुर्वेद - www.harshalnemade.com

 4. Pingback: बस्ति-आरोग्याचे प्रवेशद्वार

 5. Pingback: नेत्रधावन - www.harshalnemade.com

 6. Pingback: आनाह (बद्धरोग) - www.harshalnemade.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!