वर्षा ऋतुचर्या- पावसाळ्यात पाळावयाचे नियम

वर्षा ऋतुचर्या- पावसाळ्यात पाळावयाचे नियम

वर्षा ऋतुचर्या- पावसाळ्यात पाळावयाचे नियम

ग्रीष्म कालामध्ये रस आणि स्नेह हे शोषले गेल्याने शरीरस्थ जाठराग्नी दुर्बल होतो. तसेच वर्षांकालामध्ये वातादि दोषामुळे दुर्बल झालेला हा अग्नि अधिकच दुषित वा मंद होतो. या ऋतुतील अम्ल विपाकी जल व मंद जठराग्नी मुळे वातदोष प्रकुपित होतो. यासाठीच वर्षा ऋतूत सर्वसाधारण विधी म्हणजेच ज्याने वात, पित, कफाचे शमन होईल आणि अग्नि प्रदीप्त होईल अशा सर्व क्रिया प्रशसनीय मानल्या जातात.

उन्हाळ्यातल्या कोरडेपणामुळे वाढलेल्या वाताला- पावसाळ्यातल्या थंडीची जोड मिळताच वात अधिक प्रकुपित होतो.

या वेळी वातावरणातला ओलावा , शरीरातले कमी झालेले बळ , स्वभावतः मंदावलेली भूक यांमुळे शरीर फारच मरगळलेले व थकलेले वाटु लागते.

पावसाळ्यात थकवा असल्याने ताकद देणारे पदार्थ खावेत असे करू नये, कारण असते ती मंदावलेली भूक तसेच ताकद वाढवणारे बहुतेक पदार्थ पचायला जड व स्वभावाने थंड असतात. म्हणून असा आहार पावसाळ्यात  सुरुवातीला उपयोगाचा नाही. पहिल्यांदा भूक वाढवून पचनशक्ती सुधारल्यावर असा आहार घेतला तर फायदा होईल; नाहीतर भूक लागणे अजुन कमी होईल व अपचन झाल्याने वात-पित्त-कफांची फाजील वाढ होऊन अनेक विकार होऊ शकतात. म्हणून, वर्षा ऋतुत(पावसाळ्यात) योग्य मात्रेत पचण्यास हलका आहार घ्यावा.

पथ्य

उघड्यावरील पाणी/पदार्थ सेवन करू नये; शुद्ध पाणीच प्यावे; पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटी व तुळशी वापर करावा. वॉटरफिल्टरचा वापर करावा. किंवा पाणी उकळून व गाळून घ्यावे.
संध्याकाळचे जेवण शक्‍य तेवढ्या लवकर करावे.(सुर्यास्तापुर्वी),की ज्यामुळे रात्री झोपे पर्यंत पचनक्रिया व्यवस्थित होईल. अन्यथा पचन योग्य न झाल्यास अपचन व बद्धकोष्टता निर्माण होऊ शकते.

जेवणामध्ये गायीच्या साजूक तूपाचा सदैव वापर करावा.

2. आमचूर किंवा कोकम सिद्ध सूप घ्यावे. भाजलेल्या तांदळाचाच भात खावा, रात्री भाजकेच पदार्थ आहारात असावे.

३. कडधान्यमध्ये फक्त मूग व मसूर यांचा भाजुन वापर करावा.

4.प्रामुख्याने आंबट, खारट व स्निग्ध पदार्थांचे सेवन करावे. जूने जव, गहू यांचे पदार्थ तसेच तांबडा तांदुळ, जांगल देशातील पशुपक्षांचे संस्कृत मांसाचे सेवन करावे.

5. आठवड्यातून एकदा अवश्य उपवास (लंघन) करावा, उपवासादरम्यान सकाळी एकदाच जेवावे व रात्री मुगाचे कढण घ्यावे.

6. उकळून गार केलेले पाणी प्यावे. मधाचा उपयोग अवश्य करावा.

7. देशी फळांचेच सेवन करावे. किवी, लीची, आलुबूखारा, ई. विदेशी फळांचे सेवन करु नये.

अपथ्य (अयोग्य) :-

पचण्यास जड पदार्थ जसे मासे, मांस, दूधापासून निर्मित पनीर, खवा, श्रीखंड,दही न खाणे.

चहा/कॉफी:-वारंवार उकळलेला चहा/कॉफी पिल्याने अम्लपित्त-अनिद्रा-बद्भकोष्टता-भूक मंदावणे हे व्याधी होतात.

चण्याच्या डाळीचे पदार्थ

ईडली, डोसा, ढोकळा, ई. आंबवलेले पदार्थ

पालक ई. पालेभाज्या वर्ज्य करणे.

विदेशी फळे

कोल्ड ड्रिक्स, फास्ट फूड

दिवसा झोपू नये. रात्री जागु नये.

व्यायाम

उन्हात बसणे

मैथुन पावसाळ्यात निषिद्ध आहे.

पथ्य विहार :-

सर्दी, ताप, खोकला नसल्यास नित्य तिळाचे तेल अंगाला चोळावे. पावसात भिजल्यास संपूर्ण शरीरास वेखंड चुर्ण चोळावे. रूक्ष, खर अशा कापडी वस्त्राने शरीर मर्दन करणे, खान, सुगंधी पदार्थ लेपन, सुवासिक फुलांच्या माला धारण, शरीरावर स्वच्छ वस्त्राचे धारण करणे आवश्यक असते. ज्या ठिकाणी क्लिन्नता किया ओलेपणा नाही अशा स्थानी निवास करणे जरुरीचे आहे.

वैद्य. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद
91750 69155

वेदाकेअर हे औंध पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. जे सर्वोत्तम आयुर्वेदिक उपचार देते. वेदाकेअर औंध पुणे येथे सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संपर्क

9175069155

वेळ

सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00

पत्ता

ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!