बेल फळ – आयुर्वेदिक उपयोग

बेलफळाचे कच्चे आणि पक्के असे दोन प्रकार असतात. आयुर्वेदिक औषधांमध्ये नेहमी याप्रकारे यांचा उपयोग केला जातो. अर्धवट पिकलेले बेलफळ वाळवून ठेवतात त्यालाच बेल काचरी असे म्हणतात. ज्या वेळेस संडासला पातळ होते किंवा संडास बांधून होत नसेल.फक्त होत नसेल आणि जर वारंवार पाण्यासारखे जुलाब होत असतील तर त्यावर उत्तम उपयोगी पडते. संपूर्ण पिकलेले बेल फळ हे गोड, थंड असते.

बेल काचरी जर संडासवाटे चिकट रक्तस्त्राव होत असेल तर उपयोगी पडते. धान्यपंचक या आयुर्वेदातील उत्तम पाचक औषधांमध्ये बिल्व फळाचा समावेश आहे.

ताप उतरवण्यासाठी बेलफळाचा उपयोग केला जातो यामध्ये बेलाच्या मुळांची साल + बेलाची वाळलेली पाने यांचा काढा करून दोन वेळा घ्यावा लागतो. तसेच तापामध्ये हृदयाचे फडफडणे, हृदय धडधडणे यावरही यांचा उपयोग चांगल्या पद्धतीने दिसून येतो.

आयुर्वेदातील सर्वोत्कृष्ट औषधांमधील दशमुळ यामध्ये याचा समावेश आहे. सुजेसाठी बेलाचे मूळ व एरंडमूळ एकत्र दिले जाते.

शक्ती येण्यासाठी बेलाच्या पानांचा रसाचा उपयोग करतात. यामध्ये साधारणत पंचवीस ग्रॅम बेलाची पाने वाटून त्यामध्ये आवश्यक तेवढे पाणी टाकून त्याचा रस काढला जातो आणि तो खडीसाखर टाकून नियमित सेवन केल्यास उत्तम शक्ती वाढते व शरीरामध्ये उष्णतेमुळे किंवा अतिरिक्त पित्तामुळे आलेली कडकी कमी होण्यास मदत होते.

बेलाचा मुरब्बा तसेच बेलाचे सरबत हे नियमित वापरणाऱ्या असतात.

बेल मुरब्बा कसा बनवावा

अर्धवट पिकलेल्या बेलफळाचे आतील गिर काढून त्याला चाळणीवर ठेवून वाफ द्यावी म्हणजे तो गर मऊ होतो मग अशा मऊसूत गिराला फडक्यामधुन काढून त्यातील बिया वेगळ्या करून गिराच्या वजनाच्या चौपट खडीसाखर पाक करून त्यामध्ये तो गर टाकावा यामध्ये केसर, जायफळ व जायपत्री असे आवश्यकतेनुसार वरून घालावे. दोन महिने हवाबंद डब्यामध्ये ठेवून चांगले मुरु द्यावे अशाप्रकारे बनलेला उत्तम पद्धतीचा बेलाचा मुरब्बा ज्यांना परशाला वारंवार होते, पोटात दुखून संडास वाटे चिकट स्राव होतो किंवा रक्तीआव आहे यावर उत्तम प्रकारे लागू पडते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!