Raktamokshan रक्तमोक्षण

रक्तमोक्षण

रक्तमोक्षण
रक्तमोक्षण म्हणजे त्याग करणे, सांडणे, वाहविणे, विकारकारक दृष्ट रक्ताचा त्याग केल्यावर आजाराचा जोर कमी पडून रुग्णास बरे वाटावे हा आयुर्वेद चिकित्सकांचा नेहमीचा अनुभव आहे.
रक्तमोक्षण :
ज्या चिकित्सा पध्दतीमध्ये रूग्ण शरिरातून दूषित झालेले रक्‍त बाहेर काढले जाते त्या क्रियेस रक्‍तमोक्षण असे म्हणतात.
रक्त हे लाल असते हे खरे पण जे लाल असते ते रक्तच ही कल्पना चूक आहे.
कारण जसे अम्ल रसाचे पित्त तसेच रक्त रंगाचे पित्तही असू शकते. म्हणूनच असा संभ्रम उत्पन्न झाल्यास ‘शुने काकाय वा दद्यात्‌,’इत्यादि उपाय सांगितला आहे,
रक्तात दोषांचा उद्रेक झाला असता आपण शिराव्यध न केला तर निसर्ग तो रक्तपित्ताच्या रूपाने करतो, अशावेळी दोष रक्तरंगाचे पित्त बाहेर दबडत असते. ते थांबवू नये, उपेक्षा (उप–ईक्षण-जवळ राहून पहाणे) करावी पण थांबवू नये, निसर्गच हा मौलिक उपाय करीत असता आपण जर तो दोष- तो रक्तधातू आहे असे समजून थांबविला तर अनेक रक्तगत विकार उत्पन्न होतात असे म्हणतात.
निसर्गाने केलेल्या या उपचायावरून शिराव्यधांची कल्पना जशी सुचली तशीच गेंडा, पाणघोडा, रानडुकर आदी प्राणी वेळूच्या तीक्ष्ण टोकावर आपले पाय, आपले अंग आपटून शरीरांतील रक्त जाऊ देतात व मग त्यांना बरे वाटते, किंवा ज्या पाण्यात जळवा आहेत तेथे जाऊन शरीराला जळवा लागून त्यांनी बरेचसे रक्त घेतले म्हणजे (त्या सुटतातच व मग) ह्या प्राण्यांना बरे वाटते.
यावरून रक्त काढण्याची कल्पना विविध तऱ्हेने काढण्याची कल्पना माणसाने उचलली.
दुष्ट कफपित्त हे रक्तधातूचे वैरी ते रक्तातून काढावयाचे तर त्यासाठी वमन-विरेचनाचे हे उपाय हे दूरचे, डायरेक्ट उपाय शिराव्यधाचाच, रक्तावृत वायू असताही शिराव्यधाने (रक्त काढण्याने) धातू उत्पत्ती वा धातुपरिपोषणातील स्थगितता कमी होते व त्या गोष्टी सुधारतात.
रक्तमोक्षण ही एक नैसर्गिक प्रवृत्तीही आहे. जेव्हा गेंड्यासारखा रानटी प्राणी उन्मत्त होतो तेव्हा तो सैरावैरा, विध्वंस करीत धावतो; पण काही केल्या उपशम भेटत नाही. टोकदार पाषाण, काटेरी झुडुप यावर आपले अंग रगडून थोडे रक्त वाहविल्यास त्याच्या मनाची घालमेल शांतत्व पावते.
उन्हाळ्यामध्ये अथवा ऑक्टोबर हिट (शरद ऋतु) दरम्यान सुद्धा प्रकुपित रक्ताचा उफाळून बाहेर येण्याचा गुणधर्म आपण घोळणा फुटण्याच्या स्वरूपात अनुभवतो.
अशा वेळेस रक्त वाहून गेल्याने किंवा थंड पाण्याच्या फटकाऱ्याने रक्तस्त्राव थांबतो. अशा सवयीत सार्वदेहीक रक्तमोक्षण फायदेशीर ठरते.
मुळव्याधीच्या विकारात व्याधिस्वभावाने मोडांमध्ये दुष्ट रक्त संचित होऊन ठणका लागतो. मोडामधील दुष्ट रक्त वाहून गेल्याने किंवा जळू लावून ते काढून टाकल्याने रुग्णास सुसह्य होते आणि रक्तमोक्षणाचे सद्यफलदायित्व रुग्ण आणि वैद्य उभयतास अनुभवयास मिळते.
रक्‍त हा शरिरातील एक महत्त्वाचा धातू आहे. जीवनाचे सर्व कार्य रक्‍ताभिसरणामुळे घडते. या रक्‍ताच्या आश्रयाने पित्तदोष व रसधातू रहातात. किंबहुना आयुर्वेदामध्ये रक्‍त हे रस व रक्‍त या धातूंचा संयोग असल्याचे मानले जाते.
रक्‍तधातूच्या दुष्टीमुळे अनेक प्रकारचे व्याधी उद्भवतात.
अर्थातच पित्तदोष व रसधातू यांचीही आश्रयाश्रयी भावाने दुष्टी होत असते.
अशा वेळी लंघन, पाचन, शमन यांचा उपयोग न झाल्यास दुष्ट झालेल्या रक्‍तधातूला शरिराबाहेर काढून टाकणे हे महत्त्वाचे असते. रक्‍तमोक्षण हे म्हणूनच व्याधीपरिमोक्ष व शरीरस्वास्थ्यरक्षण ही दोन्ही कार्ये करते.
मात्र त्यामध्ये रक्‍तदुष्टीचा विचार महत्त्वाचा आहे.
स्तंभन, स्वेदन, बृंहण, लंघन इ. उपक्रम करूनही एखादी संप्राप्री भंग पावत नसेल तर ती रक्‍तमोक्षणाने भंग पावते.
ज्या व्याधींच्या संप्राप्तीमध्ये दोषांचे प्राबल्य कमी असून धातूचे प्राबल्य अधिक आहे. त्या व्याधींमध्ये रक्‍तमोक्षण हा उपचार फायदेशीर ठरतो.
वातदोषांच्या चिकित्सेसाठी स्नेहन, स्वेदन व बृंहण हे महत्त्वाचे उपक्रम आहेत.
पित्तदोषाच्या चिकित्सेकरिता स्नेहन व स्तंभन हे उपाय आहेत, तर कफदोषाकरिता रक्षण, स्वेदन व लंघन हे उपचार आहेत. एखाद्या चिकित्सकाने हे उपाय करूनही अपेक्षित परिणाम दिसत नसतील तरं त्यावेळी रक्‍तमोक्षण केले जाते.
‘रक्‍तमोक्षणामध्ये दूषित रक्‍तधातू हा ‘ अग्रे स्त्रवति दुष्टास्रम्‌ ‘ या तत्वाप्रमाणे शरीराबाहेर निघून जातो.
त्यामुळे रक्‍तदुष्टी ही त्वरेने कमी होते. परंतू त्याचबरोबर जीवरक्‍त शरिरराबाहेर जात असल्याने या चिकित्सेचा मिथ्यायोग घडल्यास आत्ययिक अवस्था निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने वैद्याने योग्य ती दक्षता घेऊनच हे कर्म रुग्णांसाठी करावयाचे आहे.
ग्रामीण समाज जीवनात रक्तमोक्षण उपक्रमाचा वापर आपण ज्येष्ठ मंडळीकडून ऐकून असतो.
गावोगावी फिरणारे वैदुलोक हे जळवा लावणे, तुंबड्या, शिंगे लावून रक्त काढण्यात कुशल असतात.
त्यांच्या या चिकित्सेने लोकांची दुर्धर डोकेदुखी, जुनाट गुडघेदुखी, इसब बरी झाल्याची उदाहरणं आढळून येतात.
त्यामुळे आजही वैहु लोकांची परंपरा गावोगावी टिकून आहे.
दोन प्रमुख पद्धती : ( स्थानिक व सार्वदेहिक )
अशाप्रकारे नैसर्गिक, सद्यफलदायी, शास्त्रोक्त आणि जनाधार असलेली रक्तमोक्षण चिकित्स स्थानिक आणि सार्वदेहीक अशा २ प्रमुख पद्धतीने अवलंबिली जाते.
स्थानिक रक्तमोक्षण जळू, अलाबू (भोपळा), शृंग (शिंग), घटीयंत्र, प्रच्छान यांच्या सहाय्याने कुशल वेद्याद्वारे केले जाते तर
सार्वदेहीक रक्तमोक्षण शास्त्रोक्त पद्धतीने शिरेवाटे केले जाते.
रक्त दुषित होण्याची कारणे :
दही, गूळ, फरसाण, कच्चे शेंगदाणे, पावभाजी, वडापाव, लोणचे, पापड, मीठ, इडली, बडा, उत्तप्पा, सामोसे, मांसाहार आदी आंबट, तिखट, खारट पदार्थांचा वापर आहारात अतिप्रमाणात असल्यास त्याच्या परिणामी रक्तदुष्टी होते आणि अनेक आजारांची बीजे शरीरात रुजण्यास मदत होते.
दुषित रक्तामुळे होण्यारे विकार :
उच्च रक्तदाब, त्वचारोग, सोरियासिस, डोकेदुखी, यकृताचे विकार, वांग, चेहऱ्यावरील मुरुम, गळवे, नागीण, चाई पडणे, गळ्याचे आजार, टॉन्सिल्सची दुखणी आदी अनेक विकार होतात.
या विकारांवर रक्तमोक्षणाचे विधान ऋषीमुनिनी आयुर्वेद ग्रंथात (इ.स. पूर्व ३००० वर्षांपूर्वीच) कथित केले आहेत.
काही वैयक्तिक अनुभव कथन केल्यावर वाचकांना याची प्रचिती येईल.
एक रुग्ण अनेक दिवसांपासून अंगावर पित्ताच्या गांधी उठतात, भयंकर खाज आणि निद्रानाश ही लक्षणे घेऊन चिकित्सालयात आला.
संपूर्ण परिक्षणोत्तर रक्तमोक्षण करायचे ठरविले. शास्त्रोक्त रितीने तात्काळ सार्वदेहिक रक्तमोक्षण केल्यावर आजारात काही अंशी उतार पडला आणि झोप लागली.
पुन्हा २-३ वेळा रक्तमोक्षण आणि औषधी चिकित्सा केल्यावर रुग्णास बरे वाटले.
याचप्रमाणे एक १३ वर्षीय मुलगा उपचारासाठी रुग्णालयात आला. त्याला लहानपणापासून दर हिवाळ्यात कोरडे इसब उठत असे आणि अर्वाचीन औषधांचा कोर्स केल्यावर जात असे; पण पुन्हा पुढच्या हिवाळ्यात पुन्हा हा विकार आ वासून पुढे उभा रुग्णाचे परिक्षण करून काही घडणारी रोगकारक आहारविहारातील सवयींचा त्याग करण्यास सुचविले.
त्यास अवस्थेनुरूप सार्वदेहिक रक्तमोक्षण आणि औषधोपचारांचा वर्षभर अवलंब केल्यावर पुन्हा हिवाळ्यात त्रास झाला नाही आणि त्याच्या मातापित्यास समाधान वाटले.
संपूर्ण डोक्यावर चाई पडलेला रुग्ण दवाखान्यात आला. त्याचे डोक्यावरचे केस, मिशा, दाढी इतकेच काय तर भुवयांचे केसही पुर्णत: गायब झालेले.
त्यास दवाखान्यातून औषधी (पोटातून) चालू झाली आणि माझ्याकडे आवठवड्यातून दोन वेळा डोक्यास जळू लावावयास सांगितले आणि आश्‍चर्यकारकरित्या जसजसे रक्तमोक्षण घडत गेले तस तसे त्यांच्या गुळगुळीत टकलावर केसांची लव वाढताना दिसू लागली, भुवयांचे केस पूर्णत: आले. अविश्वसनीय स्वरूपाचा उपशय या रुग्णात चिकित्सेने पाहावयास मिळाला.
अर्वाचीन शास्त्रामध्ये सुद्धा यकृतांच्या विकारावर व्हेनिसेक्शन, व्हेनोलायसिस नावचे रक्तमोक्षणांशी साधर्म्य असणारे उपचारापुर्वी केले जात असत.
प्रख्यात क्रिकेटपटू अभिनेत्री सुद्धा सौंदर्यवान, चिरतरुण राहण्यासाठी लीच थेरपी (जलौकारचरण) (जळू) चा वापर करते हे जगजाहीर आहे.
रक्तमोक्षण या उपचाराची उपयुक्तता साक्षात दिसत असताना सुद्धा काही रुग्ण म्हणतात की आमच्या रक्ताच्या तपासण्या तर पूर्ण नॉर्मल आहेत. मग ही रक्तदृष्टी कशी काय? आणि एवढेच आमचे रक्त खराब आहे तर मग ते डायलिसीसने सुद्धा शुद्ध करून घेऊ
पण वाचकहो ! रक्ताची होणारी दुष्टी, त्यामुळे होणार आजार यांची मांडणी ही आयुर्वेदाच्या तत्त्वानुसार आहे त्यामुळे रक्तमोक्षणाने काढलेल्या रक्तात प्रत्येक वेळी सुक्ष्मदर्शक यंत्राने विपरीत काही दिसणार नाही.
याउलट आजाराबाबत शंभर टक्के यशाची खात्री राहते. ज्याप्रमाणे झाडाच्या फांद्या छाटल्यास त्यास चांगल्याप्रकारे पालवी फुटते आणि झाडाच्या वाढीस नवा जोर चढतो तद्वतच रक्ताच्या बाबतीतही अनुभवण्यास मिळतो.
रक्त निर्दोष बनते आणि रक्त बनवण्याची प्रक्रिया सुधारण्यास मदत होते.
तसेच रक्तमोक्षणा दरम्यान काढल्या जाणाऱ्या १० ते ३० मि.ली. रक्ताने शरीरास कोणतेही नुकसान होत नाही.कारण प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात साधारणपणे ५ लि. रक्त अविरतपणे भ्रमण करत असते.
अशाप्रकारे आयुर्वेदाच्या या शास्त्रीय, निरूपद्रवी, सद्यफलदायी उपचाराने अनेकविध आजारामध्ये लाभ होतो;
पण त्यासाठी गरज आहे ती आयुर्वेद चिकित्सकाकडे जाण्याची, पथ्य पाळण्याची आणि नियमित औषधोपचार घेण्याची !


best-ayurvedic-clinic-in-aundh

वैद्य. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद
9175069155

1 thought on “रक्तमोक्षण”

  1. Pingback: शितपित्त- अंगावर पित्त उठणे - www.harshalnemade.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!