वेदना आणि आयुर्वेद

आपल्या शरीराला आणि मनाला वेगवेगळ्या पद्धतीच्या दुखण्याची जाणीव होत असते. सांधेदुखी, पोटदुखी, पाठदुखी, कंबरदुखी इ. दुखणे हे शरीरात त्या त्या स्थानानुसार वेगवेगळ्या प्रकारचे असते आयुर्वेदामधे याचे प्रकार सांगितले आहे. जसे टोचल्याप्रमाणे फुटल्याप्रमाणे, पिळल्याप्रमाणे, मुंग्या येणे, बधिर होणे अश्या अंतर्बाह्य वेदना शरीरात असतात.

शरीरातील वातदोष व दुषित रक्‍त हे दोन प्रधान घटक प्राधान्याने वेदनेस कारणीभूत असतात. आमवात, वातरक्त, संधीवात, टाचदुखी, गुडघेदुखी, मान-पाठ-कंबरदुखी, हातापायांना मुंग्या, सायटिका इ. विकारामधे वाताच्या व रक्‍ताच्या आयुर्वेदिक उपचारांना अनन्य साधारण महत्त्व आहे.

कोणत्याही शरीरावयाच्या रचनेमध्ये हाडे, मांस, रक्‍त, मेद, कंडरा, शिरा, स्नायू, तरुणास्थि, कफ, पित्त यांचे अंश, श्लेष्मल त्वचा इ. समावेश असतो. त्यामुळे वरील प्रकारच्या रोगामधे या सर्वांवर काम करणारी उपचार प्रणाली, औषधे, खाणे, पिणे, वागणे, व्यायाम, पंचकर्म यांचा वापर करावा लागतो.

आपण जसे अन्न खातो त्यापासून शरीरात ठराविक अंतराने पचनसंस्थेत कफ, पित्त, वात दोष तयार होत असतात व त्यांच्या प्राकृत स्थितीवर शरीराचे आरोग्य अवलंबून असते. त्यामुळे प्रकृती व रोगाचा विचार करून योग्य प्रकारचे अन्न खाणे हा पहिला उपचार असून साक्षात आजार बरा करण्यासाठी औषधी कल्प, औषधीसिद्ध तेल, तूपे यांचा अंतर्बाह्य उपयोग करावा लागतो. यासह पंचकर्मातील वमन, विरेचन, बस्ति, रक्‍तमोक्षण, नस्य, अग्निकर्म, उपनाह यांचा उपयोग केल्यास वेदनांचा नाश होतो.

वेदनांचा विचार करतांना बर्‍याचदा घसादुखी, संग्रहणी, पोटाचा त्रास, आव, मुळव्याध, दंश, अतिचिंता, त्वचा रोग, स्थौल्य अनुवंशिकता, आघात, रक्‍ताल्पता, अर्बुद, ग्रंथी, गर्भाशयाचे आजार, रजोदृष्टी, बाळंतपण, मधुमेह, ब्लडप्रेशर, रक्‍तपित्त, मद्यपान, धुम्रपान, स्थूलपणा, कृ शपणा, अस्थिविकृती, जन्मजातविकृती अशा साधारण रोगांचा विचार आयुर्वेदात केला गेला आहे. त्यामुळे फक्त वेदनाशामक ओषधे घेऊन बरे होतो. असा विचार कोणीही करु नये अशा प्रकारची औषधे घेऊन तात्पुरता आराम मिळत असला तरी त्याने वृक्क, जठर, रक्तवाहिन्या, मस्तिष्क, यकृत, मेद, शुक्रधातू यावर घातक परिणाम होऊन त्याचे निराळे आजार वेदनेसह शरीरात घर करून राहतात.

मनूष्य एक दिवसात कधीही एकदम आजारी पडत नाही. सर्व आजारांची पायाभरणी ही वर्षांपासून शरीरात सुरू असते. त्यामुळे योग्य निदान, औषधे, योग्य खाणे-पिणे-वागणे, पंचकर्म उपचार, रसायन चिकित्सा यांची योजना झाल्यास ‘रुग्णवेदना’ कमी होणार.

वेदना कमी करण्यासाठी उपचारांचा विचार करतांना शरीरात असणारी इतर कारणे शोधणे, त्यासाठी आवश्यक तो औषध उपचार करणे व प्रामुख्याने वेदनेस कारणीभूत असणाऱ्या वात दोषाचा विचार करणे आवश्यक असते. आयुर्वेदानुसार आपल्या मोठ्या आतड्यात वात दोष बनत असतो व कफ व पित्त या इतर दोन दोषांना काम करण्यास प्रवृत्त करत असतो. अशा वात दोषासाठी सिद्ध तेले अंतर्बाह्य वापरणे आवश्यक असते. त्याचबरोबर “ बस्ति उपचार ” ही प्रत्येक आजराची निम्मी उपचार पद्धत आहे. यासाठी आयुर्वेदात अनेक व्याधींसाठी निरनिराळे बस्ति कल्प सांगितले आहेत.

बस्ति उपचारांमुळे आजार कमी होतांनाच हृदय, मस्तिष्क व वृक्क या तीन मर्मांचे आरोग्य आपोआपच सुधारले जाणे. या गोष्टीची गरज कमी जास्त प्रमाणात पस्तीशीनंतर भासतेच. यामुळे हार्टअटॅक, अर्धागवायु, किडनीचे आजार, मस्तिष्क विकार यासारख्या दुर्धर व्याधी भविष्यात उत्पन्न न होण्याची व्यवस्था आपोआपच होते. यासारखा फायदा क्वचितच इतर उपचारांनी लाभू शकतो. बस्ति उपचारांमधे दुखणे, खुपणे, पथ्यपाणी, वेळेचा अपव्यय या गोष्टी फारशा घडत नाहीत. नियोजन मात्र आवश्यक असते. रुग्ण आजारासाठी बस्ति घेतो आणि त्याचा बल, वर्ण, स्मृती इतर शरीर मानस भावात आमुलाग्र बदल होऊन शरीराचा कायाकल्प होतो. ज्यामुळे शरीरात असणाऱ्या वेदना कमी होणार हे नक्कीच.

वैद्य. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद
9175069155

best-ayurvedic-clinic-in-Pune

संपर्क

9175069155
9028191155

वेळ

सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00

पत्ता

ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे

वेदाकेअर आयुर्वेद पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. येथे आयुर्वेदिक उपचार मिळतात. पुणे येथील सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.

1 thought on “वेदना आणि आयुर्वेद”

  1. Pingback: लेपाचे शास्र आणि वेदना - www.harshalnemade.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!