best-ayurvedic-treatment-for-spine

मणक्याचे आजार व आयुर्वेदिक उपचार
SPINE PROBLEMS AND AYURVEDA

ayurvedic treatment for spine

पूर्वीच्या काळी चुलीसमोर खाली बसून स्वयंपाक केला जाई. दररोज संपूर्ण अंगाला तैल लावून गरम पाण्याने स्नान केले जाई. मासिक पाळीवेळी बाहेर बसून शरीर व मन यांना संपूर्ण विश्रान्ति देत असत, त्यासहच दूध तूप यांची आवड असून शारीरिक कष्ट देखील होत असत. त्याचा परिणाम म्हणून आयुर्वेदीय स्नेहन - स्वेदन वातशमन होऊन पर्यायाने कंबर, पाठ, मान, गुडघेदुखी कमी दिसे, या उलट सध्याचे जीवन आढळते. अंगाला तेल लावले जात नाही. फक्त साबणाने त्वचा रुक्ष बनत जाते. घोडयासारखे सतत उभे राहून, पुढे झुकून गॅसवर स्वयंपाक केला जातो. बाळंतपणात शेक शेगडी नाही, संस्कार विरुद्ध चित्र विचित्र बाहेरील अन्न खाण्याने वजन वाढलेली याचा परिणाम म्हणून वेगात धावणाऱ्या या जगाला पछाडलंय ते पाठीच्या मणक्याच्या विकारांनी.

पूर्वी गुडगे धरून चालणे, हाडे दुखणे याचा म्हातारपणाशी संबंध असायचा. पण सध्या तरूणांमध्ये, लहान मुलांमध्ये, नोकरी करणाऱ्यांमध्ये, स्त्रियांमध्ये, ठराविक एका पद्धतीने बसणार्‍या, एकसुरी बैठकीची कामे करणाऱ्यांमध्ये. त्यातच पंख्याचा सततचा वारा, ए.सी., एअर कुलर ,सततचा प्रवास, यामुळे वात प्रकोप होऊन अस्थि, संधी, मांस, स्नायु इत्यादीची दुखणी, पाठीच्या मणक्याचे विकार वाढलेले अधिक आढळतात.

मणक्याचा आजार होण्याची कारणे

दुचाकीवरून प्रवास, कॉम्प्युटरसमोर काम, खांद्यावर ओझे घेणे, सतत मान खाली करून काम, कंपन्यांमध्ये विशिष्ट हालचालीत काम करणे, वजन उचलणे, शेतात पुढे वाकून काम करणे, पाटी उचलणे, उच्चपदस्थ व्यक्‍तींमध्ये मान खाली ठेऊन विशिष्ट स्थितीत बसून रहाणे, या बरोबरच अतिस्थुलपणा, अतिव्यायाम, अतिशुक्रक्षय, अति रुक्ष वातुळ पदार्थांचे अतिरिक्त सेवन, चुकीच्या पद्धतीने झोपणे-बसणे-उठणे-व्यायाम करणे,

पाठीच्या मणक्यात दिलेली इंजेक्शने, मणक्याचा जन्मजात विकृती व नंतर आलेल्या विकृती, मुळव्याध, रक्ताल्पता, पांडुरोग, डोक्यावर फार ओझे वाहुन नेणे, मांसगत वात, सिरागत वात, मधुमेह, सततची होणारी गळवे, जुनाट संग्रहणी, कोम्बाची आणि रक्ताची मुळव्याध, फिशर, मुतखडा, पित्ताश्मरी, मणक्याचा टी. बी., पांडुरोग, मूर्दुस, माती खाणे, सततचा खोकला, जागरण करणे, दिवसा झोपणे, अंथरूणाचा आकार बदलणे, दंश, अन्नातील विषार, व्यायामाचा अभाव, जुनाट ज्वर, आघात.

रजप्रवृत्तीच्या विकृती, श्वेत प्रदर, स्रियांच्या बाबतीत मासिक पाळी व गर्भाशयाच्या तक्रारी, मलाशयाचे आजार, गर्भाशय मूत्राशय खाली सरकणे, कॅन्सर, वृक्क विकृती, पोट फार सुटणे, या व्यतिरिक्त संधीवात, आमवात, वातरक्त , तृतीयक आणि चातुर्थिक ज्वर (तापाचे प्रकार) याचा परिपाक म्हणुन सुद्धा लक्षणरुप पाठीचे दुखणे आढळते. काही वेळा मानेतील जास्तीची बरगडी या आजाराचे कारण असु शकते. डाव्या हातातील, मानेतील, खांदयातील वेदना बर्याचदा हृदयविकाराची शक्यता दर्शवतात. खुप जळजळीत, तिखट, आंबट, खारट पदार्थ खाणारया लोकांच्या बाबतीत रक्त, मांस, मेद बिघडून आजार उत्पन्न होऊ शकतात.

चिंता हे पाठदुखीचे महत्त्वाचे कारण असू शकते. चिंता दीर्घकाळ टिकू शकते. चिंतेमुळे पाठीचे स्नायू आकुंचित पावतात. दीर्घकाळ आकुंचित पावलेले स्नायू थकतात. या थकण्यामुळे ते दुखू लागतात. काळजीचे कारण दूर झाल्यावर पाठदुखी थांबते.

सतत सोफ्यावर, खुर्चीवर किंवा मोटारीत बसणे, दिवसभर संगणकासमोर बसून काम करणे अशा प्रकारच्या बैठय़ा जीवनशैलीत मानसिक कष्ट वाढले आणि शारिरिक कष्ट कमी झाले. त्यामुळे मणक्यांच्या जडणघडणीसाठी आवश्यक असणारे चांगले ओझे त्यांवर पडणे बंद झाले आणि चुकीच्या पद्धतीने मणक्यांवर येणारे ओझे वाढले. ‘आम्ही बारा तास संगणकावर बसून काम करतो’, असे जेव्हा तरूण अभिमानाने सांगतात तेव्हा आपला मणका बारा तास बसण्यासाठी बनलेला नाही ही बाब त्यांच्या लक्षात आलेली नसते.

पाठदुखी, कंबरदुखी आणि मणक्यांचे आजार केवळ वाढत्या वयातच होतात असे नाही. तरूण आणि अगदी लहान वयातही चुकीची जीवनशैली या आजारांना कारणीभूत ठरू शकते. मणक्यांच्या आजारांचे प्रकार कोणते, त्यांची लक्षणे काय, कोणते उपचार फायदेशीर ठरतील याविषयी सांगताहेत वेदाकेअर आयुर्वेदाचे तज्ज्ञ वैद्य. हर्षल नेमाडे

ayurvedic treatment for spine problems

मणक्याच्या आजारांची लक्षणे:-

मणक्‍यांची रचना पाहिल्यास एस आकाराचा वळण घेत जाणारा एक बाक दिसतो. मणक्यांमध्ये नैसगिकत: चार वेगवेगळे बाक असतात. मानेला पुढच्या दिशेने, पाठीला मागच्या दिशेने, कंबरेला पुढच्या दिशेने आणि माकडहाडाला मागच्या दिशेने बाक असतो. हे चार बाक मिळून मणक्यांचा पूर्ण स्तंभ तयार होतो. हे बाक जोपर्यंत टिकून असतात तोपर्यंत मणक्यांच्या स्तंभाची लवचिकता टिकून राहते. बरेचदा याचा आकार बदलणे ही देखील विकृती असते. 

मानेचे, पाठीचे, कंबरेचे, कटीचे असे मिळून संपुर्ण मेरूदंड स्पायनल कॉलम बनतो. निसर्गाने ते अशा पद्धतीने एकमेकांत बसवले आहेत की त्यांच्यामधील पोकळीतून सुषुम्ना जाते. यापासून निघालेले मज्जारज्जू सर्व शरीराला संवेदना पुरवतात. कोणत्या मणक्‍यामध्ये, त्याच्यामधील चकतीमध्ये, तेथील वंगणामध्ये आलेल्या विकृतीमुळे त्या मणक्‍यातून ज्या ठिकाणी संवेदना जाते, त्या त्या भागावर लक्षणे दिसू लागतात. सुरूवातीला दुखणे, जड होणे, मुंग्या येणे, कळ लागणे अशी लक्षणे दिसतात.

मानेच्या भागामध्ये याला मानदुखी (सर्वायकल स्पॉडिलायसिस) म्हणतात, कंबरेच्या भागात कंबरदुखी (लंबर स्पॉडिलायसिस) वेगवेगळी नावे असली तरी आयुर्वेदीय निदान पद्धतीमध्ये ढोबळ मानाने संधिवात, आमवात, वातरक्त, तृतीयक आणि चातुर्थिक ज्वर ( तापाचे प्रकार ) या निदानात याचा समावेश होतो.

अस्थिधातुच्या कमतरतेमुळे पाठीचा मणका कमजोर होणे, मानदुखी, मान जड होणे, मानेत कळा येणे, डोकेदुखी मागे सुरु होऊन डोक्याच्या वर पसरते, कवटीच्या तळाशी मानेत दुखणे, हाता-पायामध्ये मुंग्या येणे, कंप येणे, अवयव बधीर होणे, त्यांच्यात कळा येणे, कंबरेत दुखणे, सकाळी उठताना त्रास होणे, कुशीवर वळताना त्रास होणे किंवा पाठीच्या मणक्यातून कूस बदलताना कड कड आवाज येणे, कूस बदलताना पाठीचा मणका एकदम अवघडल्यासारखं होणे, चालताना त्रास होणे किंवा चालता न येणे, कंबरेच्या मागील बाजूने पायाच्या तळव्यापर्यंत शीर दुखणे, मांडी घालून खूप वेळ बसू न शकणे, पायाच्या पंजाची ताकद कमी होणे, पायातील स्पर्शज्ञान कमी होणे, शौचाला बसता न येणे, चक्कर येणे, नसांवरील असह्य़ दबावामुळे लघवीचे नियंत्रण जाणे, खांद्याच्या भागात दुखणे, चेतातंतूंवर दबाव आल्यास पाठीचा चौकोन, खांदा, दंडाचा पुढील भाग, मनगटाचा भाग, अंगठा, इ. ठिकाणी वेदना जाणवते.

हे सर्व भाग मानेच्या मणक्यातून निघणा-या चेतातंतूंशी संबंधित आहेत. या भागातले स्नायू पुढे दुबळे होत जातात. चेतातंतू हाडांच्या-गुठळयांनी दाबले-रगडले जाणे हे त्याचे कारण आहे. काही जणांना मान पुढे वाकवल्यावर विजेचा झटका हातापर्यंत चमकतो. याच भागात मुंग्या येतात. टोचल्याप्रमाणे संवेदना होतात. कूर्चा चेतारज्जूवर दाबल्यामुळे विशिष्ट लक्षणे दिसतात. हाता-पायात दुबळेपणा जाणवतो, शक्ती कमी होते. लघवी, गुदद्वाराचे नियंत्रण कमी होते. अर्थातच हा आजार आता जास्त झालेला असतो. मणक्याजवळच्या रक्तवाहिनीवर दाब आल्यास यात मुख्यत: चक्कर (मेंदूकडे रक्त कमी पडल्याने) हे लक्षण असते. चक्कर तात्पुरती किंवा सतत येते. चक्कर येण्याचे आणखी एक कारण म्हणजे मानेभोवतीच्या स्नायू व पडद्यांचा सतत ताण हे असते.

मणक्यांच्या विकारांमध्ये बसून उठताना, उठून बसताना, झोपून उठताना चक्कर येणे, फेकल्यासारखे होणे ही लक्षणे हल्ली आढळतात. वातनाडीवरील दाबामुळेच ही लक्षणे निर्माण होतात. परंतु ही लक्षणे कमी होऊन नष्ट होईपर्यंत असंख्य विचार मनात घोळतात, चिंतेत भर पडते.

सतत फॅन व ए.सी.चा वापर केल्याने वात वाढतो, स्नायू जखडतात, व्यायामाचा अभाव, वाढते वजन, चरबी मणक्यांना अधिक दुर्बल करते. उंच उशी घेऊन झोपणे, पुस्तक वाचताना मान तिरकी करून झोपणे, मान सतत मोडणे, हलवणे यामुळे देखील लक्षणांना सुरूवात होते.

पाठीच्या मणक्यांमध्ये सहजासहजी अधिक आघात झाल्याशिवाय बदल होताना दिसत नाहीत. त्यामुळे ह्या मणक्यांच्या गादीचे पोषण झाल्याशिवाय व्याधी पूर्ण बरी होत नाही. वार्धक्‍याबरोबर सगळीच हाडे कमजोर होतात. त्याचे प्रमुख कारण हाडांतील अस्थि धातूचा क्षय सुरु झालेला असतो. मणक्‍यातील चकत्या मऊ होऊ लागतात. परिणामी व्यक्तीला पोंक येते, पुढे वाकले जाते. काही वृद्ध व्यक्ती, विशेषतः स्त्रिया कमरेतून पुढे वाकतात. हे टाळण्यासाठी तरुण वयापासूनच पाठीची काळजी घेणे आवश्‍यक असते. त्यामुळे वेळेवर उपचार, पूर्णपणे आजाराची वाढवणारी कारणे बंद करणे व संपूर्ण विश्रांती हे चिकित्सा सूत्र ठरते.

ayurvedic treatment for spinal cord injury

आयुर्वेद उपचार :-

पाठीचे आजारांमध्ये व्यक्तीप्रमाणे निदान बदलते. त्यानुसार औषधी चिकित्सा, पंचकर्म चिकित्साही बदलते. वेदनाशामक औषधांनी तात्पुरते बरे वाटते. पण पुन्हा आजार वाढतो व त्या भागातील संवेदना नष्ट व्हायला सुरूवात होते. सुरुवातीस बरेच दिवस वेदनाशामक औषधी खाऊन रुग्ण आयुर्वेदाकडे येतो. वेदनाशामक औषधींनी तात्पुरते बरे वाटते, परंतु वेदनाशामक औषधी ही काही मणक्याच्या आजाराची परिपूर्ण चिकित्सा नाही. वेदनाशामक औषधी घेणे, शरीराला- पाठीला वजन लावल्याने तात्पुरता दाब कमी करून लक्षणे आणि वेदना कमी होतात व ऑपरेशन करणे, हा क्रम ठरलेलाच. परंतु आयुर्वेदीय पंचकर्माद्वारे बरीच मणक्याची ऑपरेशन निश्चित टळू शकतात.

चिकित्सेचा विचार करताना रूग्णांच्या प्रकृतीप्रमाणे वातशामक औषधे वैद्यकीय सल्ल्यानुसार वापरावी लागतात. यामुळे वेदना कमी होतात, वातनाड्यांचे पोषण उत्तम होऊन आराम मिळतो. ही पोषणकल्पना आयुर्वेदाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

ayurvedic treatment for spine problems

शरीरातील वाताची विकृत वृद्धी ही देखील मणक्यांना त्रास देते. वाताच्या विकृतीने अस्थिधातू व मज्जाधातूंची विकृती होते. सतत कोरडा, रूक्ष आहार घेणे, अतिश्रम, हालचाल, स्निग्धतेचा अभाव दिसून येतो. उठल्यावर पोट साफ होणे व त्यानंतर हलकेपणा वाटणे हे वात नियमित असल्याचे लक्षण आहे. शौचाला दिवसभर कधीही होणे किंवा १ ते ३ दिवस न होणे व त्यासाठी परस्पर कोणते तरी रेचक दिर्घकाल घेत रहाणे ही गोष्ट सर्रास दिसून येते. सततची रेचके घेतल्याने आतड्याला रूक्षता येते व कालांतराने मलावष्टंभ अधिक वाढतो.

मलावष्टभाकरिता एरंड तेलासारखे औषध नाही. कोरडेपणा आणून वात वाढवणारी रेचके घेऊ नयेत. रोज रात्री झोपताना १ ते २ चमचे एरंडेल गरम पाणी, गरम दूध, चहातून घेतल्यास फायदा होतो. एरंड स्नेह सांध्यांना स्निग्धता देऊन स्तंभता, जखडणेही दूर करते. स्थूल, रूक्षपणा असलेल्या व्यक्‍तींनी गंधर्व- हरितकी हे रेचक घ्यावे.

पंचकर्म चिकित्सा हे आयुर्वेदातील अगदी गरज असल्याप्रमाणे काम करणारी इंस्टंट उपाययोजना आहे. औषधे पोटातून देऊन शरीरस्थ त्रिदोष साम्य करणे हा एक प्रकार व अधिक वाढलेले दोष शरीराबाहेर काढणे, त्या दोषांच्या मूळ निर्मितीस्थानातच सरळ उपचार करणे म्हणजे पंचकर्म. या पंचकर्माचा उपयोग मणक्‍यांचा विकारांमध्ये एखाद्या चमत्कारासारखा होताना दिसतो. ह्या पंचकर्मातील स्नेहन, स्वेदन, बस्ती, पिझिंचील, कटीबस्ती, तेलधारा, रक्तमोक्षण, जलौकावचरण, अग्निकर्म (सुवर्ण शलाका), पाठ बांधणे आणि पोटीस बांधणे यांचा पोटातील औषधांसह साकल्याने उपयोग केल्यास काही अपवाद वगळता आयुर्वेदाने सर्व प्रकारचे पाठीचे दुखणे या उपायांमुळे तात्काळ फरक पडून थांबते. तसेच विविध वातनाशक औषधींनी, आयुर्वेदिक उपचार, सुवर्ण कल्प, नैसर्गिक अस्थिधातु वर्धक, अस्थिधातु पोषक कल्प यांनी मणक्याच्या आजारावर मात केली जाऊ शकते.

आखडलेले मणके व त्याच्या पेशींसाठी तेलाने मसाज स्नेहन करणे फायद्याचे असतो. पोटातून घेतलेले तूप, तेल हे देखील शरीराला आतून पोषण देते. यामुळे शरिरातील वाढलेला वात कमी होण्यास मदत होते.

उपचारांमध्ये वेदनेवर तात्काळ नियंत्रण ठेवणारा उपचार म्हणजे स्वेदन म्हणजेच वाफेने शेकणे. विविध आयुर्वेदीक वनस्पती, ओवा, मीठ, आलं अशा साध्या घरगुती पदार्थांची वाफ मणक्‍यांना देता येते. तेलानंतर दिलेल्या या वाफेने लगेच उपशम मिळतो. घरच्या घरी निर्गुडीच्या पानांच्या काढ्याने दिलेले स्वेदन लगेच सूज कमी करते. त्याचा काढाही बरेचदा पोटात देतात.

पिंडस्वेदामध्ये दुखऱ्या भागावर तेलाची धार धरून भाताच्या पोट्टलीने काढ्याचा शेक देतात. पत्रपोटलीस्वेदामध्ये विविध वातशामक औषधी उदा. एरंडपत्र, निर्गुडीपत्र, शिग्रुपत्र, चिंचपत्र इत्यादी पानाची पोटली करून शेक दिला जातो. यामुळे शिरा मोकळ्या होण्यास मदत होते, वात कमी होतो. स्नायूंना आलेला कठीणपणा नष्ट होऊन ते लवचिक होतात. हा उपाय वैद्यकीय देखरेखीखाली करावा.

पंचकर्मापैकी बस्ती ही देखील उत्तम फलदायी, वात दोषावरील प्रमुख व खात्रीशीर उपचार पद्धती आहे. विविध औषधी तेल, तूप, काढे हे गुदद्वारावाटे पक्‍वाशयात पाठवतात. पक्‍वाशय वाताचे मूळ उत्पतीस्थान असल्याने बस्तीने पक्‍वाशय शुद्ध होते. बस्ती शरीरात राहून मणक्यांचे, सांध्यांचे, वातनाड्यांचे पोषण करते. मणक्याच्या विकारात प्रामुख्याने निरूह-अनुवासन-मात्रा बस्ती, तिक्तक्षिर घृत बस्ती, यापन बस्ती, मज्जा बस्ती या बस्ती प्रकारांचा अद‌्भुत लाभ होतो. नियमित वर्षातून एक वेळा वरील बस्ती घेतल्यास व्याधी पुन्हा पुन्हा होत नाही.

कटी बस्ती, मन्या बस्ती – कंबर व मान या प्रदेशी औषधी सिद्ध तेल काही काळ ठेवले जाते. या सर्व बस्ती प्रकारामुळे हाडांची झीज भरून येण्यास मदत होते. मणक्यामधील वंगणासारखा पदार्थ तयार होण्यास मदत होते. यांमध्ये औषधी तेल रूग्णांच्या दुखणाऱ्या अवस्थेप्रमाणे त्या त्या भागावर ३०-४५ मिनिटे स्थिर करतात.

नस्य या उपचारादरम्यान नाकामध्ये औषधी सिद्ध तूप किंवा तेल नाकात सोडले जाते. यामुळे मणक्यांमधील गॅपमुळे असणारे दुखणे, मुंग्या येणे कमी होते.

वातव्याधी पूर्ण बरा होत नाही. कारण हेतूसेवन चालूच असते. त्यामुळे प्रत्येक ऋतूबदलात सांधे जपणे, स्नेहन स्वेदन करणे हे आजार टाळता येण्यासाठी आवश्यक असते. मानेचे व कंबरेचे विशिष्ट व्यायाम तेथील मांसपेशींना ताकद देतात. पूर्ण बरे झाल्यावर सूर्यनमस्कार, पवनमुक्‍तासन, भुजंगासन ही आसने मणक्‍यामध्ये लवचिकता आणतात. अस्थिंची झीज थांबणे, मांस पेशींना बळकटी आणणे, स्नायूबंध कणखर करणे, कुर्चा तरुणास्थितील सूज, संकोच कमी करणे, मज्जातंतू वरील दबाव कमी करणे, पोटातील हायड्रोलिक आणि न्युम्याटीक दाब प्राकृत ठेवणे, रक्ताची शुद्धी नियमित होणे, स्त्रियांमध्ये नियमित चालणे, धावणे व व्यायामाने वजन कमी ठेवल्यास चांगला फरक पडू शकतो आणि औषध, आहार, व्यायाम यांनी वाताचे शमन करणे इतक्या विविध प्रकाराने उपाय करता येतात. क्वचितच क्रियाहानी झाल्यास शस्त्रकर्माला पर्याय नसतो. औषध, आहार, व्यायाम ही त्रिसूत्री मणक्याच्या विकारांमधुन मुक्‍तता देऊ शकते.

शरीरातील वात दोष दररोज संध्याकाळी, उत्तररात्री, वर्षा ऋतूत, ग्रीष्म ऋतूत थोडा थोडा बदलत जातो कारण वाढत जातो त्यासाठी प्रत्येकाने निदान पुढील गोष्टी पथ्यापथ्य करून तरुणपण टिकवावे आणि वाताचे आजार टाळावेत

मणक्याचे आजार झाल्यास पाळावयाचे पथ्य :-

  • नियमित आहारात मधुर, अम्ल, लवण रसात्मक स्निग्ध, उष्ण असा आहार.
  • गहू, तांबडी साळ, एक वर्ष जूना साठी तांदूळ, मूग, (मुगाचे पाणी), तूर-डाळ, नाचणी, उडीद, लसूण, आले, एरंड तेलाची चपाती, यव, कुळीथ, उडीद, जवस, पटोल, शेवगा, लसुण, सुंठ निब, पडवळ, दुधी, भेंडी, कोवळी वांगी, आले, हळद, लसूण, कांदा, गाजर, कोवळा मुळा वापरावी.
  • बोकड, कोंबडा, पंचमूळसिद्ध क्षीर, आंबट फळांचा रस, धान्ययूष, मुद्रयूष, मांसरस, जांगल मांसरस, भरपूर स्नेह घातलेले धान्ययूष व मांसरस, दुधात केलेली आंबट व सैंधवयुक्त कृशरा, दशमूळ क्षीरपाक, दशमुळसिद्ध मांसरस, जेवणानंतर गरम पाणी पिणे हे उपायसुद्धा फायद्याचे ठरतात.
  • गायीचे दूध, तूप
  • फल :- डाळिंब, आंबा, ताडगोळा, फालसा, महाळुंग, बोरे, द्राक्षे, संत्री, चिंच, लिंबू
  • तिळाचे किंवा इतर प्रकारचे तेल, एरंडेल, खडीसाखर, पीयूष, विविध प्राण्यांची वसा, मज्जा, नारळाचे पाणी, मोहरी, मेथ्या, हळीव. गुगुळ, खडीसाखर.
  • सतत संगणकासमोर बसून करायचे काम असल्यास, दर पाऊण ते एक तासाने ब्रेक घेऊन हात वरच्या दिशेने ताणून स्नायू मोकळे करावेत.
  • मऊ गादीचा त्याग करून कडक पण उबदार बिछान्यावर झोपणे सुरू करावे.
  • विहारीय कारणांमध्ये चुकीच्या पद्धतीने प्रवास त्यामुळे विशिष्ट स्नायूंवर येणारा अति ताण, विकृत ताण हा त्या पद्धतीच्या सवयी बदलण्यामुळेच टाळला जाऊ शकतो.

खुर्चीत वगैरे बसताना आपली कंबर त्या खुर्ची वा सोफ्याच्या पाठीला टेकते आहे ना याकडे विशेष लक्ष द्यावे. नसल्यास पाठीमागे एखादी पातळ उशी घेऊन बसण्यास सुरुवात करावी. खुर्चीवर बसताना जितके मागे सरकून बसता येईल तेवढे मागे सरकावे. खुर्चीची पाठ सरळ असावी. बसतानासुध्दा खुर्ची कशी आहे, तिला आपली पाठ बरोबर चिकटत आहे की नाही आणि एकंदरीत बसण्याच्या पध्दतीमध्ये आपल्याला आराम मिळत आहे की नाही हे पहावे. त्याचबरोबर आपण एखाद्या खुर्चीवर कितीवेळ बसणार आहोत यालाही महत्त्व असते. आपण दीर्घकाळ खुर्चीवर बसणार असू तर दर दोनतीन तासांना १५ मिनिटांचा मध्यंतर केला पाहिजे. तेवढा वेळ खुर्चीतून उठून चालावे किंवा फेर्‍या माराव्या किंवा नुसतेच उभे रहावे. त्याऐवजी आपण कायम बसूनच राहिलो तर त्या बसण्याचा ताण आपल्या पाठीवर पडतो. तेव्हा खुर्ची चांगली असली पाहिजे, आपले बसणेही चांगले असले पाहिजे आणि बसण्याची वेळसुध्दा थोडी असली पाहिजे.

झोपताना व्यवस्थित झोपा झोपल्यानंतर डोक्यापासून पायाच्या टाचेपर्यंत सगळे अवयव गादीला लागतात. ते लागत असताना सगळ्या अवयवांवर समान दबाव पडावा याची दक्षता घेतली पाहिजे. काही वेळा डोकेच उंच राहते तर काही वेळा केवळ खांद्यावर जास्त भार पडतो. असा असमतोल होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे.

व्यायाम आणि योगासने यांचा वापर वेदना कमी झाल्यानंतरच करावा.

योगासन :
भुजंगासन, पादपश्चिमोत्तासन, धनुरासन, सुप्तरासन, पवनमुक्तासन इत्यादी योगासने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावी.

प्राणायाम :
अनुलोम विलोम, कपालभाती आणि उज्जायी या तीन प्राणायामांचा उपयोग करावा.

मणक्याचे आजार झाल्यास पाळावयाचे अपथ्य:-
  • जास्त तिखट पदार्थ, तुरट पदार्थ, जास्त खारट पदार्थ, रताळी, साबुदाणा, बटाटे, कमलकंद, अळू, अतिशीत जल, वरी-नाचणी यासारखी रुक्ष धान्ये, क्षुद्र धान्ये,
  • पालेभाज्या जाड बीज असलेल्या परवरसारख्या भाज्या, कारली, हरबरा डाळ, वाटाणे, चवळी, मुगाचे घट्ट वरण, मटकी, वाल, वाटाणे, मटार, चणे ( अखंड-संपूर्ण-सालीसकट) कटाक्षाने टाळावीत. शुष्क मांस, सुकविलेले मासे. टाळावेत
  • सुपारी, भाजकी माती किंवा विरुद्ध आहार, दुष्टजल किंवा पेय सेवन, अनशन, विषमाशन, पोहे.
  • अतिव्यायाम, अतिमैथुन, लांबवर फिरावयास जाणे, ( फिरण्याचे श्रम ) रात्री जागरण, शीतल जलस्नान, पोहणे ( थंड पाण्यात थंड काळात पोहणे ), दिवसाची झोप, 
  • अति परिश्रमाची कामे टाळावीत, जड वजनाच्या वस्तू उचलू नये. जास्त मोटारसायकल प्रवास टाळावा. वेडेवाकडे बसणे निक्षून टाळावे.
  • रात्रीचे जागरण व दिवसा जेवणानंतर झोप या आजाराला वाढवते.
  • आंबट रसामुळे हाडांची व मणक्यातील चकत्यांची झीज लवकर होते. त्यामुळे आंबट पदार्थ, दही, चिंच व
  • आम्ल रसाचे विदाही पदार्थ उदा. इडली, ढोकळा, पाव, डोसा बंद करावे.
  • वेगांचे धारण व उदीरण या दोन्ही गोष्टी वातप्रकोप करतात, म्हणून वेगोदीरण व धारण कटाक्षाने टाळावे.

वाताच्या दुखण्यांमध्ये आयुर्वेदिय उपचारांची दिशा पुढील प्रमाणे असते.

o आयुर्वेदिक दिनचर्या ऋतुचर्या रात्रीचर्या पाळणे.

o दररोज सर्वांगाला औषधी सिद्ध तेल लावणे.

o तेल कोमट करून पाठीच्या कण्याला वरून खालच्या दिशेने लावावे आणि नंतर सुमारे दहा मिनिटांनी गरम पाण्याच्या पिशविने किंवा फडक्याने शेकुन घ्यावे किंवा गरम पाण्याने अंघोळ करावी.

o दर १५ दिवसांनी पोट साफ करण्याचे औषध घ्यावे. कोठ्याची याप्रमाणे शुद्धी झाल्यानंतर आयुर्वेदिय औषधे चांगला गुण देतात.

o वसंत ऋतूत वमन, शरद ऋतूत विरेचन, वर्षा ऋतूत बस्ति असे पंचकर्म करावेत.

o निरनिराळ्या प्रकारे अवयवांना शेक दयावा.

o वेदना व आजारांची मूळ कारणे शोधून उपचार करणे.

o वैद्याच्या देखरेखीखाली प्रथम पंचकर्मातील उपचार करून घ्यावे.

o पाठीच्या मणक्यातील गाठी , टी.बी इत्यादी आजारांसाठी तज्ञ वैद्याचा सल्ला घ्यावा.

o पाठीच्या मणक्यावर पेनकिलर आणि कॅलल्शिम, व्हिटॅमिन डी च्या गोळ्या हा काही यावरील इलाज नव्हे हे
वेळीच लक्षात घ्या.

o वेडेवाकडे बसणे निक्षून टाळावे.

o सतत संगणकासमोर बसून करायचे काम असल्यास, दर पाऊण ते एक तासाने ब्रेक घेऊन हात वरच्या दिशेने ताणून स्नायू मोकळे करावेत.

o मऊ गादीचा त्याग करून कडक पण उबदार बिछान्यावर झोपणे सुरू करावे.

o विहारीय कारणांमध्ये चुकीच्या पद्धतीने प्रवास त्यामुळे विशिष्ट स्नायूंवर येणारा अति ताण, विकृत ताण हा त्या पद्धतीच्या सवयी बदलण्यामुळेच टाळला जाऊ शकतो.

o खुर्चीत वगैरे बसताना आपली कंबर त्या खुर्ची वा सोफ्याच्या पाठीला टेकते आहे ना याकडे विशेष लक्ष द्यावे. नसल्यास पाठीमागे एखादी पातळ उशी घेऊन बसण्यास सुरुवात करावी. खुर्चीवर बसताना जितके मागे सरकून बसता येईल तेवढे मागे सरकावे. खुर्चीची पाठ सरळ असावी. बसतानासुध्दा खुर्ची कशी आहे, तिला आपली पाठ बरोबर चिकटत आहे की नाही आणि एकंदरीत बसण्याच्या पध्दतीमध्ये आपल्याला आराम मिळत आहे की नाही हे पहावे. त्याचबरोबर आपण एखाद्या खुर्चीवर कितीवेळ बसणार आहोत यालाही महत्त्व असते.

आपण दीर्घकाळ खुर्चीवर बसणार असू तर दर दोनतीन तासांना १५ मिनिटांचा मध्यंतर केला पाहिजे. तेवढा वेळ खुर्चीतून उठून चालावे किंवा फेर्‍या माराव्या किंवा नुसतेच उभे रहावे. त्याऐवजी आपण कायम बसूनच राहिलो तर त्या बसण्याचा ताण आपल्या पाठीवर पडतो. तेव्हा खुर्ची चांगली असली पाहिजे, आपले बसणेही चांगले असले पाहिजे आणि बसण्याची वेळसुध्दा थोडी असली पाहिजे.

o झोपताना व्यवस्थित झोपा झोपल्यानंतर डोक्यापासून पायाच्या टाचेपर्यंत सगळे अवयव गादीला लागतात. ते लागत असताना सगळ्या अवयवांवर समान दबाव पडावा याची दक्षता घेतली पाहिजे. काही वेळा डोकेच उंच राहते तर काही वेळा केवळ खांद्यावर जास्त भार पडतो. असा असमतोल होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे.

वैद्य. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद
9175069155

वेदाकेअर हे औंध पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. जे सर्वोत्तम आयुर्वेदिक उपचार देते. वेदाकेअर औंध पुणे येथे सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संपर्क

9175069155
9028191155

वेळ

सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00

पत्ता

ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे

4 thoughts on “पाठीचा कणा व आयुर्वेद – SPINE PROBLEMS AND AYURVEDA”

    1. बाळु मोरे

      मला मणक्यांच्या आजारांवर आयुर्वेदिक औषधे पाहीजेत
      तुंम्ही रिपोर्ट बघुन औषधे देनार का

  1. Pingback: पोटाचे आजार व आयुर्वेद - www.harshalnemade.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!