आरोग्यास गुणकारी पानक- सरबत

पानक - सरबत

उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले कि सगळ्याचे पाय थंड पेयांच्या दिशेला वळू लागतात. उन्हाळ्याच्या काळात वातावरणातील सूर्याची तेजस्वी किरण आणि अति-पातळ गरम हवा शरीरातील ओलसरपणा कमी करते. वाढलेली उष्णता, अग्नीच्या ज्वाळेप्रमाणे वाहत असलेली गरम वाऱ्याची झळ, खूपच कष्टदायक व स्वास्थ्यास हानिकारक ठरते. यामुळे शरीरातील जलीय अंशाचा नाश होऊन शरीरात अशक्तपणा, अस्वस्थता, चिंता, थकवा इत्यादीची लक्षणे दिसतात आणि तहान जास्त जाणवते.
या सौम्य जलीय अंशाचे रक्षण करण्यासाठी गोड, पातळ, हलके, पचण्यास हलके, जलीय, ताजे, थंड व स्निग्ध गुणयुक्‍त पदार्थांचे सेवन केले पाहिजे. म्हणून उन्हाळ्यात कमी अन्न घेऊन पुन्हा पुन्हा थंड पाणी आणि पेये पिणे फायदेशीर ठरते.
या थंड पदार्थांमध्ये सगळ्यांना आवडणारे असते सरबते. आयुर्वेदात यांचे वर्णन पानक म्हणुन केले आहे.
जे पिण्यास योग्य आहे ते पानक अशी पानकाची व्याख्या केली आहे. पानक हे प्राय: अम्ल, मधुर रसात्मक, थंड वीर्याचे असते. पानक तयार करण्यासाठी द्राक्षे, कैरी, खजूर, बोर, चिंच, फालसा, आंबा, आवळा, जांभूळ, लिंब इ. फळांच्या रसामध्ये यथावश्यक पाणी, साखर, गूळ घालून धने-जिरे पूड, मिरी, लवंग, कापूर, वेलदोडा इ. द्रव्यांचा प्रक्षेप घालतात. सामान्यपणे पानक बनवतांना द्रव्य १ भाग घेऊन त्यात १६ भाग पाणी घालून पानकं तयार करावे.
निम्बूपानक
घटक द्रव्ये :- लिंबाचा रस १ भाग, साखर, लवंग, मिरे, पाणी ६ भाग
उपयोग :- अम्लरसात्मक, रूचिकारक, अग्निदीपक, पाचक, वातनाशक, अरोचक, ह्य
विमर्श :- उत्तम पाचक असल्याने आहाराचे सुयोग्य पाचन करते.
धान्यक पानक
घटक द्रव्ये :- धनेपूड, कापूर, लंवग, मिरी, वेलदोडा, साखर, पाणी
कृती :- मातीच्या नवीन पात्रामध्ये थंड पाणी घेऊन त्यात यथावश्यक साखर, धनेपूड, कापूर, लंवग, मिरी, वेलदोडा घालून मिश्रण ढवळून घ्यावे.
उपयोग :- पित्तहर, रूचकर
शर्करोदक
हे बनवण्यास अत्यंत सहज व सोपे आहे
घटक द्रव्ये :- खडीसाखर, पाणी, वेलदोडा, लवंग, कापूर व मिरे
कृती :- थंड पाण्यामध्ये साखर घालून त्यामध्ये वेलदोडा, लवंग, कापूर व मिरे यांचे चूर्ण घालावे.
उपयोग :- थंड, सर, बल्य, रूच्य, लघु, वातपित्तघ्न, रक्तदोषनाशक, शुक्रल, मूर्च्छा, छर्दी, ज्वर, दाह, तृष्णा
खर्जुरादि पानक
घटक द्रव्ये :- अ) खजुर, फालसा, द्राक्षे, टेंभुर्णी, बोर, डाळिंब या फळांचा रस, उसाचा रस, गूळ, चातुर्जात, कापूर, मिरे
फालसा, चिंच, द्राक्षे इ. फळांचे पाणी(कोळ/रस), साखर, मिरी, आले, कापूर, चातुर्जात
उपयोग : हृदय, तृप्तिकारक, गुरु, वातपित्तनाशक, मलाव्ट्भक, मूतरशोधक, मूत्रल, ग्लानि, श्रम, तृषा, श्रम, छर्दि, दाह, मद, मोह
विमर्शं :- खर्जुरादि पानकाचे चवीनुसार आंबट व गोड हे दोन प्रकार पडतात. त्यास खडीसाखर, मनुके, साखर, चिंचेचा
कोळ, मिरे व कापूर घालून सेवन केल्यास त्रिदोषनाशक होते
धात्रीफलादि पानक
घटक द्रव्ये :- आवळे, द्राक्षा, साखर, मध प्रत्येकी ४६ ग्रॅम व पाणी २०० मि.लि.
उपयोग :- उलटी, मळमळ वाटणे.
सुपक्र आम्रफल पानक
घटक द्रव्ये :- आंबा, साखर, वेलची , लंवग, आले
कृती :- आंब्याच्या रसामध्ये साखर, लंवग, वेलची व आले घालावे
उपयोग :- गुरू, अम्ल, हृद्य, पित्तहर, कफ़कर, वर्ण्य, वीर्यवर्धक
जांभळाचे पानक
घटक द्रव्ये :- जांभूळ, साखर, पाणी, मिरी, दालचिनी, तमालपत्र
कृती :- पाण्यामध्ये जांभूळ कोळून बीया काढून टाकाव्यात. त्यामध्ये साखर, मिरी, दालचिनी आणि तमालपत्राचे चूर्ण घालावे.
उपयोग :- अम्ल, कषाय, अत्यंत ग्राही, वातकर, कफध्न
दुग्ध पानक
घटक द्रव्ये :- दूध, लिंबाचा रस, वेलदोड्याची पूड, चिंचेचा कोळ.
कृती :- दुधामध्ये लिंबाचा रस घालून दूध फाडावे आणि त्यात वेलदोड्याची पूड घालून फडक्याने गाळून घ्यावे. गाळून खाली पात्रात आलेल्या द्रव्यामध्ये चिंचेचा कोळ अथवा इतर फळांचा रस घालावा.
उपयोग :- संतर्पण, हृद्य, गुरू, विष्टम्भी, मूत्रल, क्षुधाहर, तृषाहर
दह्याचे पानक
घटक द्रव्ये :- यथायोग्य तापवलेल्या दुधापासून लावलेले दही, सैंधव, आले, जिरे
कृती :- दह्यामध्ये सैंधव, आले, जिऱ्याचे चूर्ण व कापूर घालून पानक तयार करावे
उपयोग :- भुक वाढवते, वातपित्तहर, रूचकर, धातुवर्धक, बलवर्धक व जाठराग्रिवर्धक आहे.
हेमकिरण पानक
घटक द्रव्ये :- नारळाचे पाणी, लिंबाचा रस व साखर
उपयोग :- गुरू, बल्य, स्निग्ध, रूचकर, वीर्यवर्धक, वातहर, ईषत्‌ कफकर.
करवंदाचे पानक
घटक द्रव्ये :- करवंदाची फळे १ भाग, लंवग, आले, पाणी, साखर सात भाग
कृती :- करवंदाची फळे पाण्यामध्ये भिजवून त्याचा कोळ काढून त्यातील बिया काढून टाकाव्यात. त्यामध्ये साखर, लंवग
व आले घालावे. हे पानक अत्यंत आंबट होते.
उपयोग :- बल्य, हद्य, वातहर, रक्तपित्तहर, कण्ठरोगकर
संत्र्याचे पानक
घटक द्रव्ये :- संत्री, साखर (प्रमाणत: अधिक घ्यावी), आले, कापूर
कृती :- संत्र्याचा रस काढून त्यामध्ये साखर, आल्याचा रस व कापूर घालावा
उपयोग :- मधुरविपाकी, मुखवैशद्यकर, स्निग्ध, वातपित्तहर
कैरी पानक
घटक द्रव्ये :- कैरी, दूध, साखर, मिरी
कृती :- दुधामध्ये अर्धे पाणी घालून त्यात शिजवलेल्या कैरीचा गर, साखर व मिरीपूड घालावी
उपयोग :- वातहर, अतिमात्रेते सेवन केल्यास कफपित्तवर्धक
विमर्शं :- दूध न घालता पाणी घालूनही पानक तयार करता येते.
चिंचेचे पानक
कृती :- अ) चिंचेचा पाण्यामध्ये कोळ काढून त्यात साखर, मिरी आणि लंवग घालावी.
ब) पिकलेली चिच ५ भाग, साखर ४ भाग, धणे व आले १ भाग, चातुर्जात अर्धा भाग या सर्वद्रव्यांच्या तीन पट पाणी घेऊन हे मिश्रण मातीच्या भांड्यात ठेवावे. त्यात गरम दूध घालून ते मिश्रण वस्त्राद्वारे गाळून घ्यावे. अगरु आदि द्रव्यांनी धूपन केलेल्या मातीच्या भांड्यात उपरोक्त मिश्रण ठेवावे. त्यात कापूर घालून पात्राचे तोंड बंद करुन काही काळ ते मिश्रण तसेच ठेवावे.
क) चिंचेचे पानक करून त्यात गूळ घालून नंतर दालचिनी, मिरे, वेलची यांची चूर्णे घालावीत.
ड) चिचेचा कोळ तयार करुन त्यात मुगाचे पाणी, दालचिनी पूड, वेलची पूड व मिरेपूड एकत्रित करावे.
उपयोग :- रूचकर, जाटराग्रिदीपन, वातनाशक, कफपित्तकर, अरोचक, अभक्त छंद
जीर लिंबूचे पानक
घटक द्रव्ये :- लिंबाचा रस एक भाग, जिरे १/२ भाग, पाणी आठ भाग, पिठीसाखर सात भाग
उपयोग :- विशद, कफवातहर, पित्तकर, मानस रोग, तृषाहर
बोराचे पानक
घटक द्रव्ये :- पिकलेली बोर १ भाग, चतुर्बीज चूर्ण (वेलदोडा,दालचिनी, नागकेशर,तमालपत्र), साखर
कृती :- पिकलेली बोरे उकळून, कोळून त्यामध्ये साखर व चतुर्बीज चूर्ण घालून ते मिश्रण वस्त्रगाळ करावे.
उपयोग :- मधुर, स्निग्ध, सर, पित्तहर, छर्दि, हद्य, विष्टंभी
पंचसारपानक – १
घटक द्रव्ये :- शिवणीची फळे, खजुर, द्राक्षे, फालसा, दालचिनी, तमालपत्र, वेलची, नागकेशर, कापूर, मिरे,
साखर, आल्याचा किस
कृती :- शिवणीची फळे, मोहाची फुले, खजुर, द्राक्षे, फालसा यांचे पाणी करून त्यात दालचिनी, तमालपत्र, वेलची, नागकेशर, कापूर, मिरी, साखर व आल्याचा किस घालून ते मिश्रण गाळून घ्यावे
उपयोग :- गुरु, शक्तिवर्धक, धातुवर्धक, तृषा, श्रम, दाह
फालसा सरबत
हे गुणाने हद्य,विष्टंभी असते.
पंचसार पानक – २
घटक द्रव्ये :- मनुका, खजुर, फालसा, मोहाची फुले, शिवणीची फळे
विमर्श :- हे पानक तर्पक, दाहशामक असून ग्रीष्म क्रतुचर्येत विशेष हितकर आहे.
रक्तपित्तनाशक पानक
घटक द्रव्ये :-.डाळिंब, फालसा, द्राक्षा
उपयोग :- रक्तपित्त
विमर्श :- पित्तनाशक, दाहनाशकं
द्राक्षादि पानक
घटक द्रव्ये :- दालचिनी, तमालपत्र, नारळाचे ओले खोबरे, पिकलेले केळे, मिरी, वेलची, नागकेशर, भोकरीची फुले व गळ द्राक्षाचा रस, सुगंधी द्रव्ये
कृती :- दालचिनी, तमालपत्र, नारळाचे ओले खोबरे, पिकलेले केळे, मिरी, वेलची, नागकेशर, भोकरीची फुले व गूळ याप
कल्क द्राक्षाच्या रसामध्ये एकत्रित करून ते मिश्रण गाळून घेऊन त्यात सुगंधी द्रव्ये घालावीत.
उपयोग :- मदात्यय
दाडिमादि पानक
घटक द्रव्ये :- द्राक्षा, कवठ, डाळिंब, महाळुंग या फळांचा रस, मध व साखर
उपयोग :- मदात्यय

वैद्य. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद
91750691555

वेदाकेअर हे औंध पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. जे सर्वोत्तम आयुर्वेदिक उपचार देते. वेदाकेअर औंध पुणे येथे सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संपर्क

9175069155
9028191155

वेळ

सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00

पत्ता

ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!