तोतरे बोलणे उपाय

तोतरं बोलणे उपाय

आपलं बोलण स्वच्छ आणि स्पष्ट असेल तर समोरच्या व्यक्तीवर छाप मारण्याचं काम सोपं होतं. पण काही मुलांना तोतर बोलण्याची समस्या सतावते आणि त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर चिंता दिसु लागते.

या समस्येपासून मुक्ती मिळविण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. या उपायाने फायदा न झाल्यास लवकरात लवकर तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर तोतरं बोलण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळेल.

आवळा : आवळा तोतरं बोलण्याच्या समस्येपासून मुक्ती देतो. त्यासाठी रोज सकाळी एक चमचा सुकलेल्या आवळ्याची पावडर एक चमचा देशी गाईच्या तुपात मिसळून खाण्याने फायदा होतो.

खजूर : तोतरं बोलण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळविण्यासाठी खजुराचं सेवन करा. झोपण्यापूर्वी तुपात भाजलेल्या खजुराचे सेवन करावं. एक गोष्ट लक्षात ठेवा, खजुराचं सेवन केल्यानंतर कमीत कमी दोन तास पाणी पिऊ नका.

बदाम : बदाम आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात. त्यासाठी १२ बदाम रात्रभर पाण्यात भिजवा आणि सकाळी त्याची सालं काढून बारीक करा. वाटलेले बदाम ३0 ग्रॅम गाईच्या लोण्यासह खा.

गाईचे तूप : गायीच्या तुपाचं नियमित सेवन करण्याने तोतर बोलण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळते. त्यासाठी सकाळी तोंड न धुता गायीच्या दुधाचं सेवन करावे.

काळे मिरे : या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी १0 बदाम आणि १0 काळे मिरे खडीसाखरेबरोबर पूड स्वरूपात दहा दिवस सेवन करावे. यामुळे तुमची तोतरं बोलण्याची समस्या कमी होईल.

जिभ अडखळत असल्यास- हळद, वेखंड, कोष्ट, विपळी, सुंठ,अजमोदा, जेष्टमध, सैंधव यांचे चूर्ण करून तुपाबरोबर खावे. म्हणजे जिभेचे जडत्व जाते. जिव्हास्तंभ व वायू जाऊन वाचाशुद्धी चांगली येते.

जिभेस चरे पडतात त्यासाठी शुद्ध तुरटीची लाही तुपातून जिभेस चोळावी.

जिभेचा तोतरेपणा जाण्यास जिरे, काळे जिरे, गजगा, हळद, समभाग चूणे करून निम्मे भाजून व निम्मे कच्चे दोन्ही मिसळून जिभेस चोळावे व मधातून खाण्यासही द्यावे.

लाल गळते त्यासाठी मोहरी व खडीसाखर तोंडात धरावी.

बोलतांना जिभ अवघडत असल्यास अक्कलकार पाण्यात उगाळून चोळावा.

जिभेच्या पुरळ, चट्टे, भेगांस मायफळाच्या वरची किवा हिरड्याच्या वरची किवा बाभळीची साल, किवा कात ह्यांच्या काढ्याने किवा दह्यात पाणी मिसळून त्याने गुळण्या कराव्या. कोणत्याही काढ्यात थोडी शुद्ध तुरटीची पुड घालावी.

तोंड आल्यास बाभूळ व बोराच्या काढ्याने गुळण्या कराव्या. हिरडा, बेहडा, आवळकाठी, मोचरस ह्यांचा काढा करून त्यात एरंडेल घालून त्याच्या गुळण्या कराव्या.

पांढरट बुरसटलेल्या जिभेस ईसबगोलाच्या पाण्याने किंवा काताची पूड तोंडात धरल्याने जीभ बरी होते. किंवा मसुरीची राख व काताची पूड लावल्यानेही जीभ बरी होते.

जिभेस बुळबुळीत सारा येतो त्यास कचोऱ्याचे पावडर चोळून तोंड धुवावे.

वैद्य. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद
91750 69155

वेदाकेअर हे औंध पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. जे सर्वोत्तम आयुर्वेदिक उपचार देते. वेदाकेअर औंध पुणे येथे सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संपर्क

9175069155
9028191155

वेळ

सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00

पत्ता

ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!