पित्ताशयाच्या विविध आजारांपैकी पित्ताशयातील खडे सर्वसामान्यपणे नियमित आढळणारा एक त्रास आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो.
आयुर्वेदात पित्ताश्मरी चे वर्णन पित्तज अश्मरी असे केलेले आढळते. आचार्य सुश्रुतांनी वर्णन केलेल्या सात आशयांपैकी पित्ताशय वर्णन केले आहे. पित्ताशयाला काही ठिकाणी क्लोम असे म्हटले असून आचार्य डल्हणानुसार क्लोम म्हणजे यकृताखाली उजव्या बाजूला तिळाच्या आकाराप्रमाणे दिसणारा अवयव.
Cholelithiasis- पित्ताशयातील अश्मरी हा सर्वसामान्यपणे आढळणारा आजार असून आयुर्वेद संहितांमध्ये याचे लक्षणे पित्तज उदरशुल, यकृतदाल्योदर, शाखाश्रित कामला, सन्निपात उदर यासारखे दिसते.
पित्ताशयातील खडे होण्याची कारणे :-
1) कफ कारक कारणे:- स्निग्ध, मधुर, पिच्छील, गुरु आहार सेवन, दिवसा झोपणे, व्यायाम न करणे, दही, तूप, मांस, तिळाचे पदार्थ, अभिष्यदी पदार्थ, अध्ययन, समशन.
2) पित्तज कारणे:- उपवास, तिळ सेवन, कटू अम्ल, लवण आहाराचे सेवन.
3) पांडू व कामला रोग कारणे:- अम्ल, लवण, उष्ण आहार सेवन, तीळ तेलाचे सेवन, क्षार सेवन, काम, क्रोध, भय, शोक.
4) आधुनिक शास्त्रानुसार पित्ताशयातील खडे तयार होण्यासाठी कारणे:- जास्त चरबी युक्त आहार सेवन, स्थूलता, लठ्ठपणा, पटकन वजन कमी करणे, स्त्रियांमध्ये हार्मोनंसमध्ये विकृती. पित्ताशयाची गती मंदावणे, उपवास, गर्भधारणा.
आयुर्वेदानुसार पित्ताशयातील खडे संप्राप्ती :-
पित्तकारक निदान सेवन याबरोबर कफ प्रकोप करणारे आहार विहारांचे सेवन यामुळे शरीरात कफ संचय सुरू होतो. ज्यामुळे पचनशक्ती कमी होणे आळस, अंग जड वाटणे असे लक्षणे दिसतात.
पित्ताशयात आधीपासूनच अस्तित्वात असणारे कफ आणि पित्त पित्ताशयाची गती मंदावल्यामुळे चिकट पदार्थात रूपांतरित होतात. वाताच्या रूक्षादी गुणांमुळे विकृत होऊन पित्ताशयात जमलेल्या या चिकट पदार्थाला कोरडे व घन स्वरूपात रूपांतरित करतो ज्याला पित्ताश्मरी किंवा पित्ताचे खडे असे म्हणतात.
आचार्य डल्हणानुसार जे लोक नियमित शरीर शुद्धी – पंचकर्म करत नाही, जे चुकीचा आहार विहार नियमित करत असतात. त्यांच्या शरीरात कफ प्रकोपित होऊन पित्ताशयात संचित होऊन पित्तज अश्मरी तयार करतो. आचार्य सुश्रुत असे म्हणतात की अश्मरी लहानपणापासूनच तयार होण्यास सुरुवात होते.
Bile – पित्त ग्रंथांमध्ये Hepatic bile यांचा संबंध आयुर्वेदात वर्णीत पित्ताशी साधर्म आढळतो. पिगमेंन्टेस ऑफ बाईल अर्थात बिलीरुबीन व बिलीवर्डिन हे हिमोग्लोबिनचे घटक आहेत
अच्छपित्त- पचनाच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये अच्छपित्त तयार होते. ज्याचे साधर्म पित्ताशयातील बाईलशी करता येऊ शकते. म्हणूनच गॉल ब्लैडर याला पित्ताशय असे म्हटले जाते. साधारणपणे 500 ते 600 मिली हेपॅटिक बाईल यकृतातून स्त्रवत असते. जे अन्नपचन व चरबीचे पचन करणे असे कार्य करत असते. आयुर्वेदानुसार हे पाचनकार्य अच्छपित्ताचे असते. बाईल पासून तयार होणारे स्टरकोबिलीन व युरोपबिलीन हे मलमुत्राला त्यांचा प्राकृत रंग देत असतात. आयुर्वेदानुसार हेच रंजन कार्य रंजक पित्ताचे वर्णन केलेले आढळते.
आयुर्वेदानुसार पित्ताशयाचे खडे
१) प्रथम अवस्था :- विकृत कफ संचिती
मानवी शरीरात जठरअग्नी अन्नाचे पचन होण्यास कारणीभूत असतो. पचनाच्या पहिल्या अवस्थेमध्ये आहाराचे मधुर रस व कफामध्ये रूपांतरित होते. एखाद्या अग्निमांद्य असलेल्या रुग्णांने कफ प्रकोपक आहाराचे सेवन केल्यास पचनाच्या पहिल्या अवस्थेत तयार होणारे कफ विकृत होऊन आमकफ तयार होतो. आहार रसासोबत हा आम कफ व्यानवायूमुळे संपूर्ण शरीरात पसरविला जाते. हा कफविकृत आहार रस स्त्रोतसामध्ये संचित होऊन स्रोतोरोध निर्माण करतो व खवैगुण्य युक्त पित्ताशयात हा आमकफ अडकतो.
२) दुसरी अवस्था: – कफपित्त संसर्ग
काल समप्राप्तीनुसार जर पचनाची प्रथम अवस्था लांबल्यास द्वितीय अवस्था सुद्धा विकृत होते. ज्यामुळे पित्ताशयातून बाहेर पडणारे आम कफ लवकर बाहेर न पडल्यामुळे तेथे साठून संचित होऊन चिकट द्रव्यात रूपांतरित होते. प्रथम अवस्था पाकातील तयार झालेल्या विकृत आम कफामुळे अन्नपचनाच्या द्वितीय अवस्था पाकात तयार होणारे पित्त नीट बनत नाहीत. ज्यामुळे पित्ताशयात या पित्तांचे संपर्क जेव्हा या आम कफाशी येतो तेव्हा चिकट बोळ – द्रव तयार होतो (बिलीअरी स्लज).
3) तिसरी अवस्था: – मार्गावरोधजन्य वातप्रकोप
पित्ताशयाचे विलंबित रिकामे होणे पित्ताशयातील खड्यांच्या निर्मितीतील सर्वात महत्त्वाचे कारण आहे. पित्ताशयाची स्वत:ची हालचाल जर सुयोग्य पद्धतीने चालू असल्यास पित्ताशयाचे रिकामे होण्याचे कार्य नियमित सुरु राहते ज्यामुळे पित्ताशयात खडे बनु शकत नाहीत.
तिसरी अवस्था: – पित्त संसर्गित कफ
पचनाच्या दुसऱ्या अवस्थेत तयार झालेले होते पित्त संसर्गित कफ (बिलिअरी स्लज). पित्ताशयातून वाहणाऱ्या वातदोषाला हा पित्त संसर्गित कफ अवरोध निर्माण करतो, या अवरोधामुळे वायु दुषित होऊन स्त्रंस, व्यास, व्यध व संघ निर्माण करतो.
1) स्त्रंस- पित्ताशयाचे प्राकृत कार्य न होणे.
2) व्यास- पिताशयाचे आकारमान वाढवून पित्ताशयात पित्त संचिती जास्त होणे.
3) व्यास व संघ- पिताशयाच्या ठिकाणी दुखणे व अवरोध होऊन पित्ताशय अयोग्यरीत्या रिकामी होणे.
पित्ताशयाचे आकारमान वाढून तेथे दूषित झालेल्या वातामुळे अवरोध निर्माण होऊन तेथे संचित असलेल्या कफपित्ताचे रूक्ष, खर, विषद, लघु या वातांच्या गुणांमुळे खड्यांमध्ये परिवर्तन होते व हे खडे पित्ताशयाठिकाणी होत असल्याने याला पित्ताचे खडे म्हटले जाते.
आयुर्वेद शास्त्रानुसार पित्ताश्मरीचे प्रकार
अश्मरी प्रकार | रंग | स्पर्श | आकार | सदृष्य |
कफ | श्वेत | स्निग्ध | मोठ्या अंड्यासारखे | मधुक पुष्य वर्ण |
पित्त | पितावभास | मऊ | भल्लातकास्थी | मधु वर्ण |
वात | श्याव | कठीण | विषम, खर काट्याप्रमाणे | कदंब पुष्य |
पित्ताश्मरीचे आधुनिक शास्त्रानुसार प्रकार
अश्मरी प्रकार | रंग | पृष्ठभाग | रचना | आकार | संख्या | घटक |
कोलेस्टेरॉल | पीत सफेद | चमक | गोल | मोठे | एक | कोलेस्टेरॉल |
मिक्स | तपकिरी | पैलू असलेला | गोल | लहान | अनेक | कोलेस्टेरॉल, पिगमेंट |
पिगमेंट | श्याव | निस्तेज, काटेरी | विषम | लहान | अनेक | बिलीरुबिनेट, पिगमेंट, पॉलिमर |
पित्ताचे खडे व आयुर्वेद उपचार
वैद्य. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद
91750 69155
संपर्क
9175069155
वेळ
सोम -शनी
10.00-2.00
06.00-8.30
पत्ता
ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे
वेदाकेअर हे औंध पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. येथे आयुर्वेदिक उपचार मिळतात. पुणे येथील सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Pingback: पित्ताशय खडे आयुर्वेद उपाय - www.harshalnemade.com