पित्ताशय म्हणजे काय
पित्ताशय हा एक लहान, नाशपातीच्या आकाराचा अवयव आहे जो उजव्या बाजूला पोटात यकृताच्या खाली स्थित आहे. पित्ताशय यकृताद्वारे तयार केलेला पाचक द्रव- पित्त साठवते आणि लहान आतड्यात सोडते.
पित्ताशय खडे का होतात
आपल्या शरीरात पित्ताची निर्मिती ही यकृतामध्ये होत असते. यकृताच्या खालच्या बाजूला एक छोटीशी फुग्याच्या आकाराची पिशवी असते त्याला पित्ताशय (गॉल ब्लॅडर) असे म्हणतात, यामध्ये जास्त तयार झालेले पित्त साठवून ठवले जाते आणि प्रत्येक जेवणाच्या वेळी अन्न पचनासाठी ते पित्तनलिकेवाटे लहान आतडय़ात सोडले जाते. आहारात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण जास्त झालं किंवा तंतुमय पदार्थाचं प्रमाण कमी झालं तर पित्तरसाची घनता वाढते व पित्ताशयाचे आकारमान वाढून तेथे दूषित झालेल्या वातामुळे अवरोध निर्माण होऊन तेथे संचित असलेल्या कफपित्ताचे रूक्ष, खर, विषद, लघु या वातांच्या गुणांमुळे पित्ताशयात छोटे छोटे खडे तयार होतात व हे खडे पित्ताशयाठिकाणी होत असल्याने याला पित्ताचे खडे म्हटले जाते.
पित्ताशयातील खडे लक्षणे
पोटात कळ येऊन दुखणे- पोटाच्या बेंबीच्या वर उजव्या बाजूस कळ येऊन तीव्र वेदना होते. त्याठिकाणी स्पर्श केल्यास वेदना अधिक जाणवणे. तसेच ही वेदना पाठीकडेही जाऊ शकते. वेदनासमयी उलटी होणे, मळमळणे, थंडी वाजून ताप येणे.
पित्ताशयात खडे पडून राहिल्यास सहसा कोणतेही लक्षणे जाणवत नाहीत. मात्र जेंव्हा खडे पित्ताशयातून पित्तवाहिनीत सरकतात तेंव्हा लक्षणे जाणवू लागतात.
पित्ताशय काढून टाकण्याचे नुकसान
पोस्ट-कॉलेसिस्टेक्टॉमी सिंड्रोम:
ही अशी स्थिती आहे जिथे पित्ताशय काढून टाकल्यानंतर रुग्णाला सतत वेदना आणि पाचन समस्या जाणवत राहतात. लक्षणांमध्ये सूज येणे, गॅस, अतिसार आणि अपचन यांचा समावेश असू शकतो. पित्ताशय काढून टाकल्याने कोलनमध्ये पित्त ऍसिडचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे अतिसार होतो. ही अल्पकालीन किंवा दीर्घकालीन समस्या असू शकते.
पचनविषयक समस्या:
पित्ताशय पित्त साठवते आणि सोडते, ज्यामुळे चरबीचे पचन होण्यास मदत होते. पित्ताशय काढून टाकल्यानंतर, पित्त थेट लहान आतड्यात वाहते, ज्यामुळे अतिसार, शौचास पातळ होणे, पोटात गोळा येणे, गॅस आणि अपचन होऊ शकते. पित्ताच्या कमतरतेमुळे फुगणे, गॅस आणि अपचन यांसारख्या पाचन समस्या उद्भवू शकतात.
पित्ताशयातील खडे होण्याचा धोका: पित्ताशय काढून टाकला असला तरी पित्त नलिका किंवा यकृतामध्ये पित्ताशयाचे खडे तयार होणे शक्य आहे. यामुळे पोटदुखी, मळमळ आणि कावीळ होऊ शकते.
पित्त नलिकांना दुखापत: शस्त्रक्रियेदरम्यान, पित्त नलिकांना इजा होण्याचा धोका असतो, ज्यामुळे ओटीपोटात पित्त गळती होऊ शकते. यामुळे संसर्ग, वेदना आणि ताप येऊ शकतो.
पित्ताच्या वाढत्या उत्पादनामुळे काही रुग्णांमध्ये यकृताच्या समस्या उद्भवू शकतात जसे यकृतात चरबी जमणे- फटी लिव्हर. याशिवाय स्वादुपिंडाचा दाह किंवा आतडे दुर्बल होणे अश्या दीर्घकालीन समस्या दिसू शकतात.
फॅट मालशोषण: पित्त चरबीचे पचन आणि शोषण करण्यास मदत करते. पित्ताशयाशिवाय, यकृत सतत पित्त तयार करते ज्यामुळे चरबीच्या पचनात अडचणी येतात. पित्ताच्या अनुपस्थितीमुळे चरबी-विघटनशील जीवनसत्त्वे A, D, E आणि K सारख्या आवश्यक घटकांचे पोषण होण्यास मदत होते.
ओटीपोटात दुखणे: काही रुग्णांना पित्ताशय काढून टाकल्यानंतर हलक्या ते मध्यम पोटदुखीचा अनुभव येऊ शकतो.
पित्ताशयात खडे होण्याची कारणे
1) कफ कारक कारणे:- स्निग्ध, मधुर, पिच्छील, गुरु आहार सेवन, दिवसा झोपणे, व्यायाम न करणे, दही, तूप, मांस, तिळाचे पदार्थ, अभिष्यदी पदार्थ, अध्ययन, समशन.
2) पित्तज कारणे:- उपवास, तिळ सेवन, कटू अम्ल, लवण आहाराचे सेवन.
3) पांडू व कामला रोग कारणे:- अम्ल, लवण, उष्ण आहार सेवन, तीळ तेलाचे सेवन, क्षार सेवन, काम, क्रोध, भय, शोक.
4) आधुनिक शास्त्रानुसार पित्ताशयातील खडे तयार होण्यासाठी कारणे:- जास्त चरबी युक्त आहार सेवन, स्थूलता, लठ्ठपणा, पटकन वजन कमी करणे, स्त्रियांमध्ये हार्मोनंसमध्ये विकृती. पित्ताशयाची गती मंदावणे, उपवास, गर्भधारणा.
पित्ताशय खडे उपाय
पित्ताशय खडे अस निदान झाल्यावर घाईघाईनं ऑपरेशनचा निर्णय न घेता आयुर्वेदिक उपचारांचा उपयोग केल्यास रुग्णांचं ऑपरेशन टळू शकतं. अत्यायिक अवस्थेमध्ये तत्काळ ऑपरेशन करणे आवश्यक असते. पित्ताचे खडे झाल्यावर होणाऱ्या उलट्या आणि पोटदुखी तर आयुर्वेदिक औषधोपचारांनी कमी होते
संपर्क
9175069155
वेळ
सोम -शनी
10.00-2.00
06.00-8.30
पत्ता
ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे
वेदाकेअर हे औंध पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. येथे आयुर्वेदिक उपचार मिळतात. पुणे येथील सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.