स्वरभंग- आवाज बसणे
सर्दी, पडसे, खोकला, जुनाट खोकला, अति आंबट थंड पदार्थ खाणे घशातील जंतुसंसर्ग (थ्रोट इन्फेक्शन), स्वरयंत्राला सुज, घशातील फोड, घशाचा दाह किंवा घशात खवखवणे, घशाला मार लागणे, फार जोरात बोलण्याची सवय इत्यादी कारणांनी घशातून आवाज निघण्यास अडथळा होतो व त्यामुळे बोलण्याची शक्ती कमी होते. एखादे वेळी तर रोग्याचा आवाजे इतका बारीक होतो की, रोग्याने बराच जोर लावून बोलल्यानंतर देखील ऐकणाऱ्याला मुळीच समजत नाही. बऱ्याच मनुष्याच्या आवाज जन्मताच इतका लहान असतो की, तो कोणत्याही औषधाने चांगला होत नाही. काही कारणामुळे आवाज नाहीसा किंवा खराब झाला असल्यास औषधोपचाराने फायदा होऊ शकतो.
उपाय योजना
- घशाची सूज उतरण्यासाठी आपल्याला गरम पाणी पिण्याचे व हळद मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा.
- तुळस, हळद, पुदिना, लवंग, सुंठ, गवती चहा, ज्येष्ठमध यांचा काढा / चहा प्या.
- गरम पाणी त्यात ओवा, लवंग, तुळशी पाने एकत्र करुन त्याची वाफ घेतल्यास घशाला आराम पडतो.
- वेखंडाचा तुकडा तोंडात ठेवून विड्याप्रमाणे थोडा थोडा चावून त्याचा रस पोटात जाऊ द्यावा. ह्याने आवाज चांगला होतो. परंतु वेखंड जास्त प्रमाणात खाऊ नये. जास्त खाण्याने वांती होते.
- मिरे ७, वेलदोडे ७, ज्येष्ठमध अर्धा ग्राम, कोष्ठ अर्धा ग्राम व गहु चुर्ण १० ग्राम ह्याचा काढा २५ ग्राम खडीसाखर घालून प्याला असता आवांज मोकळा होतो.
- खजुर, मनुका बारीक वाटुन त्यात खडीसाखर, मध, साजुक तुप एकत्र करून गोळ्या बनवुन ह्या गोळ्या नियमित खाल्ल्या असता आवाज फार लवकर बरा होतो.
- सकाळी उठताच २० जव चावून गिळून घ्यावे. ह्याने आवाज चांगला होतो.
- औषधांचे चूर्ण २ ते ४ मासे मधातून चाटल्यास आवाज मोकळा होतो.
- पेरूच्या पाने स्वच्छ धुवुन चाऊन खावे अथवा उकळून रस प्यावा.
- काथाची फुड गरम पाण्यात घेतल्यास घसा मोकळा होतो.
- गुळ भात तुपासह खाण्यात ठेवावा.
- जेष्ठमध, शतावरी दुधात उकळून त्यात तांदळाची खीर बनवुन खाणे याने आवाज सुधारण्यास मदत होते.
- ज्येष्ठमध, आंवळकठी, खडीसाखर यांचा काढा द्यावा.
- गाईच्या गरम दुधांत साखर व मिरपूड टाकून तें प्यावे.
- गाईच्या दुधांत आवळकाठीचें चुर्ण द्यावे.
- भोजन झाल्यावर तूप, मिरपूड घाळून प्यावयास द्यावे.
- पिंपळी, पिंपळमूळ, मिरे, सुंठ, यांचें चूणे गोमूत्रात द्यावे.
- सुंठ, मिरें, पिंपळी, हिरडा, बेहडा, आंवळकठी, जवखार, यांचें चूणे द्यावे.
- मध व जेष्ठीमध पावडर व हळद, कोरफडीचा गर आवाजा साठी एकत्र करून चाटावा.
- गुळासह / मधासह लवंग चुर्ण एकत्र करून खाणे. यांमुळे वेदना कमी होतील व घशाला आराम मिळेल.
- घसा दुखत असल्यास आल्याचा तुकडा तोंडात ठेऊन चावा. किंवा आल्याचा रस + मध + तुळशीचा रस घ्यावा.
- नियमित नाकात तेलाचे थेंब सोडल्यास आवाज सुधारतो. तसेच नियमित तीळ / खोबरेल तेलाच्या गुळण्या केल्याने आवाज सुधारतो.
वेदाकेअर हे औंध पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. जे सर्वोत्तम आयुर्वेदिक उपचार देते. वेदाकेअर औंध पुणे येथे सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.
संपर्क
9175069155
9028191155
वेळ
सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00
पत्ता
ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे
Pingback: तोतरे बोलणे उपाय - www.harshalnemade.com