सातु – यव
प्राचीन काळापासून सातुचा उपयोग केला जात आहे. तृणधान्यांपैकी सर्वाधिक प्रसारित झालेले व जगातील जवळजवळ सर्व देशांत पिकविले जाणारे सातूचे पीक फार पूर्वीपासून ज्ञात आहे.
सातू हे धान्य एक दिव्य औषध आहे. सातु स्वाद आणि आकाराच्या दृष्टीने गव्हापेक्षा अगदी वेगळा आहे, परंतु हे गव्हाच्या जातींतील धान्य आहे. गुणधर्मात सातु गव्हापेक्षा हलके धान्य आहे.
सातु भारतात सर्वत्र होतो. गुजरात व राजस्थानमध्ये सातुचे पीक अधिक प्रमाणात होते.
सातुचे रोप गव्हाच्या रोपासारखेच व तेवढ्याच उंचीचे असते. त्याची पाने मऊ, लांब ब अणकुचीदार असतात. सातुचे पीक पावसाळ्यात व हिवाळ्यात असे दोनदा घेतले जाते.
सातुच्या मुख्यत: तीन जाती असतात : अणकुचीदार, बोथट आणि साधारणत: हिरव्या रंगाचा ब लहान सातु. अणकुचीदार सातुला ‘यव’, बोथट (साधारणत: काळसर लाल रंगाच्या) सातुला ‘अतियव’ व हिरवट, बोथट व लहान सातुला “तोक्य’ असे म्हणतात. गुणवत्तेच्या दृष्टीने सातुपेक्षा अतियव अतियवापेक्षा तोक्य सातु कमी प्रतीचा समजला जातो.
आयुर्वेदात चरकाचार्यानी प्रायः यव, सातुचे पीठ ह्या अर्थाने सातु हा शब्द वापरला. यवाबरोबर तांदूळ, गहू, मसुर, लाह्या, उडीद, हरभरा यासारख्या पीठांचाही मिश्र करून वापर केला जातो. धान्याच्या गुणधर्माप्रमाणे त्याच्या पीठाचे गुणधर्म दिसून येतात. या धान्याचे पीठ करण्यापूर्वी ते धान्य भाजून घेणे आवश्यक आहे.
सातु पीठ तुपात परतून नंतर प्राय: दूध, मध, पाणी, ताक ई. पैकी एकामध्ये कालवून त्यात, साखर, सैंधव घालून केली जाते.
सत्तु भक्षणाचे निषेध :-
भोजनानंतर, दातांनी चावून, रात्री तसेच अतिप्रमाणात सातु खाऊ नये.
सातु खाते वेळी मधे मधे पाणी पिऊ नये.
दिवसातुन दोन वेळा व केवळ सातुच खाऊ नये.
सातु सेवन करताना मांसभक्षण, दुग्धपान, उष्ण पदार्थ वर्ज करावेत.
ग्रीष्म ऋतुत सातु व साखर अथवा सातु, तुप व साखर चाटवावे.
लहान बालकांना सातु, साखर व तुप एकत्रित करुन त्याचा लाडू तयार करुन द्यावा. हा लाडू सद्य तर्पण करणारा आहे.
सातु थंड, जठगग्नी प्रदीप्त करणार, लघू (हलका) जुलाबावर गुणकारी, कफ व पित्तनाशक, रूक्ष आणि मलावरोधावर गुणकारी आहे. उन्हाने त्रासलेल्या व व्यायामाने थकलेल्या लोकांसाठी सत्तूचे सेवन अत्यंत हितकारक असते.
सातु तुरट, मधुर, थंड, कडवट मलावरोधावर गुणकारी, कोमल, व्रणावर हितकारक, रुक्ष बुद्धी व जठराग्नी प्रदीप्त करणारा, आवाजासाठी लाभदायक, बलवर्धक, वायुवर्धक, व शरीराचा रंग टिकवणारा व चिकटपणा असणारा असा असतो. सातुमुळे कफ होत नाही. घशाचे रोग, त्वचेचे रोग, कफ, पित्त, मेद, दमा, खोकला, कफप्रकोप, सर्दी इत्यादी कफजन्य रोगांवर, रक्तविकार इत्यादी रोगांत गुणकारी आणि तृषाशामक असतो.
सातुची चपाती रुची उत्पन्न करणारी, मधुर, स्वच्छ, हलकी, बलवर्धक, वीर्यवर्धक, वायुकारक, कफकारक व रोग दूर करणारी असते.
काही जण सकाळी सत्तूची खीर घेतात. या सत्तूचा व सातूचा काहीही संबंध नाही. सत्तूचे पीठ म्हणजे गहू, हरबरा डाळे असे भाजून केलेले मिश्रण असते.
जवाचे सत्त्व एकाच वेळी पाचक आणि पोषक आहे. हे गव्हाच्या सत्त्वापेक्षा सहज पचते. हे सत्त्व रोज खाल्ल्याने मधुमेहातील साखर नाहीशी होते, कारण या सत्त्वाच्या साहाय्याने धान्याहार अंगी पडतो आणि धान्याहारापासून रक्त बनेपर्यंत ज्या विनिमयक्रिया होत असतात, त्या सुधारतात. पचनक्रिया नीट होत नसल्यास आणि फुप्फुसाच्या रोगात अशक्तता आल्यास जचावे सत्त्व देतात. हे लहान मात्रेतच द्यावे. कारण मात्रा मोठी झाल्यास जुलाब होऊ लागतात. पू वाहत असणाऱ्या रोगात हे फार उपयोगी पडते.
जव रात्री गरम पाण्यात भिजत ठेवून सकाळी त्यात दूध-साखर घालून मंदाग्नीवर उकळावे. अशा रीतीने केलेली जवाची पेज थोडेसे मीठ टाकू प्यावयास द्यावी. याने उत्तम शरीर भरून येते.
मधुमेह असणाऱ्यांसाठी सातुची किंवा गहू व सातुयुक्त पिठाची चपाती अगर भाकरी अधिक हितकारक असते. त्यामुळे त्याच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढत नाही. ज्यांच्या शरीरत मेद वाढला असेल ते लोक जर गहू व भात खाणे वर्ज्य करून सातुची चपाती किंवा भाकरी आणि ताक किंवा सातुची भाकरी आणि तांदुळजाची किंवा मेथीची भाजी हा आहार चालू करतील, तर त्यांची चरबी हळूहळू कमी होईल व बेडौल दिसणारे शरीर सुंदर व घाटदार बनेल.
चरबीमुळे त्रासलेले अनेक लोक जीव घाबरा होतो, बेचैनी वाटते अशा तक्रारी करीत असतात. ते जर सातुची चपाती किंवा भाकरी, मलई काढलेल्या दुधापासून बनविलेल्या दह्याचे ताक आणि मुगाचे पाणी घ्यायचे चालू ठेवतील तर त्यांचा मेद निश्चितपणे कमी होईल व त्यांना शारीरिक उत्साह वाटेल.
सातु मूत्रल आहे त्यामुळे लघवी साफ होते. विद्यार्थ्यांसाठी सातु अत्यंत हितकारक असतो.
यव सातु :-
मधुर, शीत, लघु, रोचक, सारक, रूक्ष, लेखन, सद्यबलकर, वृष्य, बृंहण, भेदक, तर्पण, वातकर, कफनाशक, पित्तनाशक, श्रम, क्षुधानाशक, तृषा, व्रण, नेत्ररोग, अतिस्वेद, दाह, व्रणीतास हितकर
सातुचे पीठ पाण्यात कालवून चाटण केले असता लवकर पचते. सातुच्या पीठाचे कठीण असे लाडू केले असता गुरू गुणाचे तर मऊ लाडू केले असता लघु गुणाचे असतात. सातुच्या पीठात कमी पाणी घालून तयार केलेले पिंड गुरु असतात तर जास्त पाणी घालून केलेला अवलेह लघु असतो.
भाजलेल्या तांदळाचे पीठ सत्तु :-
लघु, शीत, मधुर, ग्राही, रुचकर, पथ्यकारक, बलवर्धक, अग्निदीपक, शुक्रवर्धक
लाह्यांचे पीठाचे सत्तु :-
फलश्रुती :- कषाय, मधुर, दीपन, बल्य, लघु, तृप्तिकारक, संग्राही, शीत, पथ्यकर, त्रिदोषनाशक, रक्तदोषनाशक, स्वेदनाशक, छर्दि, तृष्णा, दाह, वेदनानाशक, ज्वर, उर्ध्वग रक्तपित्त (उर्ध्वग रक्तपित्तात मुर्हु मुर्ह सेवन करावे )
तूप व मध एकत्रित करुन त्यात साखर व लाह्यांचे पीठ घालून ते मिश्रण एकजीव करावे.
लाजा तर्पण :-
लाजा सातु द्रव पदार्थामध्ये ( उसाचा रस इ.) एकत्रित करुन द्यावा.
चणकयव सत्तु :-
हरभऱ्याच्या डाळीमध्ये चतुर्थाश यव मिसळून ते मिश्रण भाजून नंतर त्याचे पीठ तयार करावे.
शीत, रूक्ष, तृप्तिदायक, ग्राही, वातकर, पित्तनाशक, कफनाशक, रक्तप्रसादक, धातुवर्धक, लघु, बलदायक, शीत, तृप्तिदायक॑ व रूच्य
चरबी कमी करणारे सत्तु :-
घटक द्रव्य :- चवक, जीरे, सुंठ, मिरे, पिंपळी, हिंग, सौवर्चल, चित्रक समभाग एकत्रित १.५ ग्रॅम, १०० मि.ली. दह्याचे पाणी, सातु २५ ग्रॅम
मेदोनाशक, अग्निदीपक
वेदाकेअर हे औंध पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. जे सर्वोत्तम आयुर्वेदिक उपचार देते. वेदाकेअर औंध पुणे येथे सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.
संपर्क
9175069155
9028191155
वेळ
सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00
पत्ता
ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे