पांढरे कोड हा फक्त त्वचेचाच विकार आहे व यापासून शरीर अगर जीवित यास अपाय नाही. हा विकार स्पर्शसंचारीही नाही. लोक याला मानतात तितका तो भयंकर नाही; एवढेच नव्हे तर दिसण्याला त्वचा विरुप दिसते यापेक्षा त्या विकारापासून त्रासही नाही. हा थोडासा आनुवंशिक आहे. हा विकार दोन प्रकारचा असतो.
एका प्रकारात त्वचा पांढरी दिसते व दुसऱ्या प्रकारात लालसर असते.
बहुधा या विकाराचा आरंभ ओठ, शिस्नावरील कातडी, कमर, डोळ्यांच्या पापण्या येथून होतो. कित्येकांस हात, पाय वगैरे ठिकाणी एखादा वाटोळा डाग येतो, तो सर्व बाजूंनी मोठा होत जातो. डाग असलेल्या जागेवरचे केस काही दिवसांनी पांढरे होतात व पुढे गळून पडतात. केव्हा केव्हा हा विकार सर्व अंगभर असतो व तेव्हा तो मनुष्य विद्रूप दिसतो. पांढऱ्या कोडाचे डाग लहान लहान व वेगळ्या वेगळ्या ठिकाणी दहापाच असले तर औषधांनी बरे होतात.
परंतु ओठावरील, तळहातावरील व शिस्नावरील डाग जात नाहीत. पांढरे कोड या विकाराविषयी पसरलेल्या गैरसमजुतीमुळे बऱ्याचदा त्रास भोगावा लागतो.
वेदाकेअर हे औंध पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. जे सर्वोत्तम आयुर्वेदिक उपचार देते. वेदाकेअर औंध पुणे येथे सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.
संपर्क
9175069155
9028191155
वेळ
सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00
पत्ता
ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे