प्रोस्टेट तक्रारी व आयुर्वेद
Prostate Problems Treatment in Ayurveda
पन्नास वर्षापेक्षा जास्त वयातील पुरुषांची प्रोस्टेटच्या त्रासांमुळे ग्रस्त असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. प्रोस्टेट ग्रंथी ही एक नर ग्रंथी आहे, आणि आकारात मोठ्या अक्रोडसारखे आहे. प्रोस्टेट मुत्रपिंडाच्या खाली स्थित एक लहान ग्रंथी आहे आणि मुत्राशयच्या पायथ्याजवळ, मुत्रमार्गाच्या सुरूवातीस मुत्रमार्गाभोवती स्थित आहे. हि ग्रंथी लैंगिक आणि लघवीच्या कार्यांमध्ये भूमिका आहे.
आयुर्वेदानुसार याला अष्ठिला म्हणतात. बस्तिप्रदेशी प्रकुपित झालेला वातदोष बस्ति आणि गुदभागी वात वाढवुन मुत्राशय आणि मलाशय यांचा अवरोध करून त्याठिकाणी तीव्र वेदना, वातसंचय, मुत्रावरोध आणि अल्पमुत्रप्रवृत्ति अशी लक्षणे उत्पन्न करून व बस्तिमुखाच्या ठिकाणी अष्ठिलेप्रमाणे कठीण, दगडाप्रमाणे दिसणारी चल व उन्नत अशी ग्रंथीला सुज उत्पन्न होते. अशा या ग्रंथीला मुत्राष्ठिला असे म्हटले जाते.
प्रोस्टेटचे विविध विकार आढळतात, यामध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढणे, बिनाईन प्रोस्टॅटिक हायपरट्रॉफी (बीपीएच) आणि प्रोस्टेट ग्रंथीमध्ये सुज किंवा जळजळ होणे.
प्रोस्टेट विकार झाल्यास मुत्रप्रवृत्ती होण्यास अडचण जाणवते आणि रात्रीच्या झोपेच्या वेळी वारंवार मुत्रप्रवृत्ती टाळण्याची गरज निर्माण होणे, कमरेच्या खालच्या भागामध्ये आणि मांड्या, पाय आणि पायामध्ये वेदनादायक वेदना जाणवतात.
प्रोस्टेट विकारांची कारणे / Causes of prostate disorders :-
वृद्धत्व मुख्य कारण आहे
काही व्यवसायामध्ये दीर्घ काळापर्यंत बसुन राहण्यामुळे मुत्राशयाच्या भागामध्ये दबाव वाढतो आणि परिणामी प्रोस्टेट ग्रंथीच्या आसपास आणि आसपासच्या पेशींना सुज येते.
लैंगिक उत्तेजनसाठीच्या औषधीमुळे सततच्या लैंगिक उत्तजनेमुळे ग्रंथीची सतत जळजळ झाल्यामुळे, सतत हस्तमैथुनाची सवय असणे.
दिवसभरात पुरेसे पाणी न पिण्यामुळे शरीरात पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ नसणे, यामुळे मुत्राचे आजार होणे.
मुत्राचा वेग सतत अडवुन ठेवण्याची सवय असणे.जास्त प्रमाणात अल्कोहोल किंवा कॅफीनयुक्त पेये पिण्याची सवय, मद्यपान.
दीर्घकाळापासून एकाच आधुनिक औषधीच्या सेवनाने
दैनंदिन आहार विहार चुकीचा असणे, वेळेवर जेवण न घेणे, यामुळे शरीरात आमविष तयार होऊन रोगनिर्मितीचा पाया रचला जातो.
प्रोस्टेट विकारांचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे मलावस्तंभ,सततच्या मलावस्तंभामुळे जेव्हा मल आतड्यात साचुन राहतो ज्याचा प्रोस्टेट ग्रंथीवर दबाव पडुन तिला सुज येते.
वाढलेल्या प्रोस्टेटचे लक्षणे / Enlarged Prostate Symptoms:-
मुत्र मुत्राशयातुन सुरू होण्यास अडचण येते – मुत्र सुरु होण्यासाठी ताण द्यावा लागतो. मुत्राशय योग्यरित्या रिकामे होत नाही आणि काही मुत्र मागे राहते आणि त्यामुळे मुत्रप्रवृत्ती अर्धवट राहिल्याची संवेदना होते.
मुत्रप्रवृत्तीचा आकार आणि प्रवाह कमी होणे.
मुत्राशयावर वेदना जाणवते, मुत्राचे असंतुलन.
मुत्रप्रवुत्ती झाल्यावरही थेंब थेंब होणे, कमकुवत मुत्रप्रवाह, थांबुन थांबुन होणे.
मुत्रप्रवृत्तीसाठी रात्रभर उठावे लागणे.
मुत्रप्रवृत्तीची संवेदना जाणवते.
पेशीची ताकद – त्वरित जाण्याची गरज, मुत्र नियंत्रित करणाऱ्या पेशीची ताकद कमी होणे.
मुत्राशयाच्या खराब फ्लशिंगमुळे मुत्रमार्गात येणारे संक्रमण.
वारंवार लघवी, विशेषत: रात्री प्रमाण जास्त असणे.
मुत्रप्रवृत्तीची अनिश्चितता, मुत्रप्रवृत्तीवर ताबा नसणे.
मुत्राशय दीर्घकाळ रिकामे राहणे, मुत्रप्रवृत्ती जास्त वेळ थांबुन होणे.
मुत्रातून रक्त जाणे.
बहुतेक प्रोस्टेट समस्यांना संतुलित जीवनशैली आणि आहारातील बदल करून नियंत्रित केले जाऊ शकते.
Pingback: पित्ताशयातील खडय़ाचे आयुर्वेदिक उपाय - www.harshalnemade.com