लिव्हर सिरोसीस – Liver Cirrhosis
आपल्या आपण नवीन पेशी तयार करून पुन्हा वाढू शकणारा असा यकृत हा शरीरातील विशेष अवयव. पण जेव्हा ही प्रक्रिया यकृताला वारंवार करावी लागते, तेव्हा कधी तरी पेशींची फेरनिर्मिती करण्याची त्याची क्षमता संपते.
लिव्हर सिरोसिस म्हणजे काय?
लिव्हर सिऱ्हॉसिस आजारामध्ये प्रथम यकृताच्या पेशी फुटतात. त्यांचे कार्य मंदावते आणि हळूहळू त्या नष्ट होतात. त्याची जागा तंतुमय पेशींनी भरून येते. हे तंतू यकृताचे नेहमीचे कार्य करण्यास असमर्थ असतात.
त्यामुळे यकृताचे कार्य कमी होते. त्यानंतर यकृताच्या पेशी मृत होत राहिल्या तर अशा पेशींच्या गाठी बनतात. यकृतात जिथे-जिथे असे घडते, तो भाग अशा रीतीने खराब होत जातो. यकृत प्रमाणाबाहेर खराब होऊन त्यात गाठी होणे यालाच वैद्यकीय भाषेत ‘लिव्हर सिऱ्हॉसिस’ असे म्हणतात.
हा यकृताचा एक गंभीर आजार असतो.
लिव्हर सिरोसिस होण्याची कारणे:-
लिव्हर सिऱ्हॉसिस आजारामध्ये प्रथम यकृताच्या पेशी फुटतात. त्यांचे कार्य मंदावते आणि हळूहळू त्या नष्ट होतात. त्याची जागा तंतुमय पेशींनी भरून येते. हे तंतू यकृताचे नेहमीचे कार्य करण्यास असमर्थ असतात.
रोजच्या जीवनासाठी आपले शरीर यकृताच्या केवळ ३० टक्के क्षमतेचाच वापर करते. उर्वरित ७० टक्के क्षमता नेहमी अतिरिक्त असते, आणि अडीनडीच्या वेळी शरीर ती वापरते. त्यामुळे यकृत जेव्हा ६०-७० टक्के खराब होते तेव्हाच त्याची पहिली लक्षणे दिसू लागतात.
- अशक्तपणा व थकवा हे यकृत खराब होण्याचे पहिले लक्षण असू शकते.
- सुरुवातीस वजन कमी होणे
- थकवा जाणवणे अशी लक्षणे दिसतात.
- आजार वाढू लागल्यावर कावीळ होणे, जलोदर (पोटात पाणी होणे ), पायाला सूज येणे अशी लक्षणे दिसतात.
- या आजारात रुग्णास वारंवार जुलाब तसेच अपचन होते.
- पोटाच्या उजव्या बाजूस दुखते व भूकही मंदावते.
- यकृतात तंतुमय पेशी निर्माण झाल्याने ते आकसते आणि घट्ट होते. त्यामुळे यकृतातील रक्तप्रवाह कमी होतो. परिणामतः
- यकृतातील पोर्टल व्हेनमधील रक्तदाब वाढतो.
- सिऱ्हॉसिसचे प्रमाण वाढत गेल्यावर अपचनाचे त्रास होतात, भ्रम होतो आणि रुग्ण बेशुद्ध होऊ शकतो.
- दारूचे व्यसन असणाऱ्यांमध्येही ताजेतवाने न वाटणे, कामात लक्ष न लागणे, रात्री झोप न येणे या तक्रारी प्रामुख्याने दिसतात. यावर उपाय म्हणून अनेकदा ही मंडळी दारूचे प्रमाण वाढवतात.
पण त्यामुळे यकृताची स्थिती बिघडत जाते. त्यानंतर पायावर सूज येणे, पोट फुगणे, पोटात पाणी होणे, वजन कमी होणे, स्नायू सैल पडणे, त्वचा कोरडी व काळसर पडणे, अंगात शक्ती नसल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसतात.
रक्ताच्या उलटय़ा होणे, मूत्रपिंडावर ताण येणे, फुप्फुसात पाणी होणे, मेंदूच्या गोंधळलेल्या अवस्थेपासून ‘कोमा’पर्यंतही लिव्हर सिऱ्हॉसिसच्या रुग्णांची लक्षणे जाऊ शकतात.
लिव्हर सिरोसिस उपाय :-
- लिव्हर सिऱ्हॉसिसमध्ये सुरुवातीला यकृत खराब होऊ लागलेले असते, पण पायावर सूज येणे किंवा पोटात पाणी होण्यासारखी लक्षणे या रुग्णांना नसतात. या अवस्थेत औषधोपचारांनी यकृत आणखी खराब होण्यापासून थांबवता येते.
- इथे एक महत्वाची बाब लक्षात घ्यायला हवी, सिऱ्हॉसिस झाल्यानंतर ते पूर्णत: बरे होत नाही, पण औषधांनी त्यावर नियंत्रण मिळवता येते.
- आरोग्यदायी जीवनशैली अवलंबणे हाच लिव्हर सिऱ्हॉसिस होऊ नये यासाठीचा उत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे.
- दारू पिण्याची सवय असल्यास कुठे थांबावे याचा वेळीच विचार करणे गरजेचे.
- मद्यपी व्यक्तींमध्ये वेळोवेळी यकृतासाठीच्या तपासण्या आवश्यक आहेत.
- सिऱ्हॉसिसच्या दिशेने प्रवास सुरू आहे असे लक्षात आले तर यकृत आणखी खराब होणे टाळण्यासाठी दारूचे सेवन थांबवून जीवनशैलीत सकारात्मक बदल करावे.
- हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात आणि बदललेल्या जीवनशैलीत चाळीस वर्षांवरील व्यक्तींनी पन्नास वर्षांचे होईपर्यंत प्रत्येक तीन वर्षांनी प्रतिबंधक तपासणी करणे,
- तर पन्नास वर्षांनंतर प्रतिवर्षी तपासणी करून घेणे चांगले. यात काही रक्तचाचण्या व यकृताच्या अल्ट्रासाऊंड चाचणीचा समावेश होतो.
- हिपॅटायटिस ‘बी’ व ‘सी’ झालेला असल्यास त्वरित तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
- लिव्हर खराब करू शकतील अशी औषधे वैद्यकीय सल्ल्यानेच घेतलेली बरी.

संपर्क
9175069155
9028191155
वेळ
सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00
पत्ता
ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे