लेप-उपचार
आपण रोजच्या जीवनात अनेक असे आजार पाहत असतो की त्यावर आपल्या घरातील थोर व्यक्ती अमूक अमूक गोष्टीचा लेप करा असे सांगत असतात.
लेप म्हणजे काय?
एखाद्या औषधाचे चूर्ण पाण्यात दुधात, ताकात किंवा इतर द्रव पदार्थात एकत्र करून दुखणाऱ्या भागावर लावणे किंवा औषधी वनस्पती पाण्यात, दुधात, ताकात इत्यादींमध्ये उगाळून त्याचा गंध दुखणाऱ्या भागावर लावणे म्हणजे लेप होय.
लेपाचे प्रकार :
१) शीत लेप :
हा स्पर्शाने किंवा गुणाने थंड असतो. शास्त्रीय भाषेत याला ‘प्रलेप’ असे म्हणतात. थंड लेप हा गरम लेपाच्या मानाने पातळ जाडीचा असावा.
उपयोग : शीत लेप हा पित्ताच्या आजारांमध्ये तसेच त्वचेला कांती आणण्यासाठी उपयोगी असतो.
२) उष्ण लेप :
लेपाचे औषध द्रव पदार्थात घालून अगम्निवर एकत्र केल्याने उष्ण लेप तयार होतो. याला शास्त्रीय भाषेत ‘प्रदेह’ म्हणतात.
उपयोग : वाताच्या व कफाच्या आजारांमध्ये या लेपाचा चांगला उपयोग होतो.
३) अनुष्ण लेप :
शास्त्रीय भाषेत ‘आलेप’ या नावाने ओळखला जाणारा हा लेपाचा प्रकार जास्त गरम किंवा जास्त थंड नसतो.
कोणास करावा – प्रामुख्याने नाजूक प्रकृतीच्या व्यक्ती, लहान मुले, गर्भिणी, बाळंतीण, वृद्ध व्यक्ती यांना लेप करायचा असल्यास या लेपाचा उपयोग होतो.
उपयोग : रक्त खराब होऊन झालेले आजार, त्वचेचे आजार, पित्ताचे आजार यामध्ये अनुष्ण लेपाचा उपयोग होतो.
४) मुखलेप :
चेहऱ्यावर केल्या जाणाऱ्या लेपाला “मुखलेप’ म्हणतात. सध्याच्या काळात ओळखला जाणारा ‘फेसपॅक’ म्हणजेच मुखलेप होय.
चेहऱ्याची त्वचा नाजूक असल्याने त्यावर लावायचे लेप काळजीपूर्वक लावावे लागतात.
चेहऱ्याची त्वचा कोरडी आहे की, तेलकट आहे त्याचा विचार करून योग्य ती वनस्पती मुखलेपात वापरली जाते.
मुखलेपाचे उपयोग –
- चेहऱ्याची कांती सुधारणे
- चेहऱ्यावरील पिम्पल्सचे /वांगाचे काळे डाग घालवणे.
- नेत्रदृष्टी सुधारते, गळा भरदार दिसतो.
- मुख तेजपुंज होते.
लेप लावण्याचे काही नियम –
- लेप रात्री लावू नये.
- एकदा केलेला लेप तो सुकण्यापूर्वी त्याला पाणी लावून किंवा पाणी न लावता काढावा. तोपूर्ण वाळू देऊ नये.
- एकदा लेपासाठी वापरलेले औषध पुन्हा वापरू नये.
- लावलेल्या लेपावरच तो पूर्णपणे न काढता दुसरा लेप लावू नये.
लेपाचे उपयोग –
आजार बरा करणे.
- त्वचेची कांती सुधारणे.
- त्वचेवरील विषाचा परिणाम घालवणे.
- मांस, रक्त, शुद्ध करणे.
- शरीरावरील सूज, आग, खाज, वेदना नाहीशा करणे.
- पुढील आजारांमध्ये लेपाचा चांगला उपयोग होतो.
- खोकला (छातीवर लेप लावणे), मूळव्याध, शरीरावर फोड येणे. सूज, नागीण, त्वचेचे
- आजार, संधीवात, वातरक्त, आमवात इत्यादी.
व्यवहारात वापरली जाणारी लेपाची काही उदाहरणे.
सुजेचा लेप –
सुंठ, मोहरी, शेवग्याची साल, उन्हाळी सर्व वनस्पती पाण्यात वाटून किंचित गरम करून सुजेवर लावणे.
चाई पडणे –
रानवांग्याचा रस मधात मिसळून त्याचा लेप करावा किंवा धोत्र्याची पाने वाटून त्याच्या रसाचा लेप करावा.
डोळे येणे –
हिरडा, काळे मीठ, गेरू यांचा लेप डोळे बंद करून पापण्यांवर लावावा.
अर्धशिशी –
कावळी, कोष्ठ, यष्टीमधु, वचा, पिंपळी, कमल या सर्वांचा एकत्रित लेप डोक्याला लावणे.
पोटात दुखणे –
कुटकी ताकात कालवून गरम करून बेंबीच्या भोवती लेप करावा.
कानाभोवतीच्या गाठी –
सुजल्यास काळ्या मीठासोबत गोकर्णाची पाने वाटून त्याचा लेप करावा.
सांध्यांची सूज –
सुंठ व दालचिनी किंवा निर्गुडीच्या पानांचा वाटून लेप करावा.
गळ्याची गाठी –
सुजल्यास कांचनाराची साल उगाळून लावणे.
जुलाब होणे –
जायफळ उगाळून त्याचा बेंबीवर लेप करावा.
लघवी अडणे –
पळसाची फुले गरम करून बेंबी व बेंबीच्या खालचा भाग यावर लेप करावा.
डोकेदुखी, सर्दी –
लवंग, सुंठ उगाळून कपाळावर लेप करावा.
हे व इतर कोणतेही लेप करण्यापूर्वी वैद्यांचा सला घेणे फायदेशीर ठरते.
वेदाकेअर हे औंध पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. जे सर्वोत्तम आयुर्वेदिक उपचार देते. वेदाकेअर औंध पुणे येथे सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.
संपर्क
9175069155
9028191155
वेळ
सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00
पत्ता
ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे