लठ्ठपणा …….एक गंभीर समस्या
चंद्र ज्याप्रमाणे कले कलेने वाढतो, त्याप्रमाणे सध्याच्या स्त्री –पुरुष आणि लहान मुलांमुलींचे वजन हे किलो किलोने वाढत आहे. बदललेली जीवनपद्धती,चंगळवाद यांच्या पाठोपाठ वजनाची समस्या कधी आपल्या आयुष्यात दबक्या पावलांनी आली आणि वरकरणी छोटी वाटणाऱ्या या समस्येचा कधी भस्मासूर झाला हे समझलेच नाही. वजन वाढवणाऱ्या कारणांच्या जागरूकतेचा अभाव आणि त्यामुळे झालेले चुकीचे मार्गदर्शन यामुळे वजनाच्या समस्येची पायामुळे आपल्या आयुष्यात समाजात खुप खोलवर रुजली गेली आहेत. उपाशी राहून वजन कमी करण्याचा जो अघोरी प्रकार रुग्णाकडून आणि डॉक्टरांनकडून केला जातो त्यामुळे मोठ्याप्रमाणावर रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि वजन कमी होणे तर सोडाच पण हाडे मात्र नक्की ठिसूळ होतात.
Obesity Weight Loss…..
१) पुरुषांमध्ये वजन वाढण्याची कारणे = व्यसनाधीनता,मांसाहाराचा अतिरेक ,व्यायामाचा अभाव, प्रचंड मानसिक ताणतणाव, रात्रीचे जागरण, मोठ्याप्रमाणावर होणारा गाडीवरचा प्रवास, अनुवांशिकता, बैठेकाम, अब्रम्हचर्य, जुने आजार, रासायनिक औषधाचा अतिरेक, शिफ्ट्च्या डूट्य़ा, हॉटेलिंग इत्यादी अनेक कारणांनी वजन वाढते.
२) स्रीयांमध्ये वजन वाढण्याची कारणे = पाळीच्या तक्रारी, पाळीत अंगावरून कमी जाणे,पाळी आणणाच्या गोळ्या घेणे, पाळी लांबवण्याच्या/चुकवण्याच्या गोळ्या घेणे, थायरॉईड, अबॉरशन, मिसकॅरेज, हार्मोनल प्रोब्लेम, मेनोपॉजनंतर, P.C.O.D. ,सीझरसारखे ऑपरेशन, बाळंतपणानंतर झालेली हेळसांड, वारंवार रक्त कमी होणे, उपवास, व्यायाम न करणे, दुपारची झोप,अनुवंशिकता, इत्यादी कारणांनी वजन वाढते.
३) लहान मुलांमध्ये वजन वाढण्याची कारणे = प्रोटीन डाएट च्या नावाखाली होणारा खाद्यपदार्थांचा मारा,बिस्कीट,पिझ्झा,पाव,ब्रेड यांसाखी बेकरीचे,शिळे आणि मैदाच्या पदार्थांचा वाढलेले वापर, दुग्धजन्य,गोड,जड,खुप थंड पदार्थांचा मारा,व्यायामाचा अभाव, मैदानी खेळाचे कमी झालेले प्रमाण,FAST FOOD संस्कृती,HEREDITY,नियमित होणारे कफाचे आजार,वारंवार होणारा जंतांचा त्रास,उंची कमी राहणे इत्यादी कारणांनी वजन वाढते.
४) वजन वाढण्याकडे दुर्लक्ष केल्याने होणारे अत्यंत भयावह दुष्परिणाम जसे ब्लडप्रेशर, हृदयविकार, डायबेटीस, वाताचे विकार / संधिवात / आमवात / वातरक्त, वंध्यत्व, गर्भधारणेत दुष्परिणाम, मासिक पाळीत विकृती / PCOD, स्तनात गाठी, पित्ताशयात-किडनीत खडे, किडनीचे विकार, यकृताचे विकार, कॅन्सर, मुळव्याध-भगंदर, मणक्याचे –गुडघ्याचे विकार, व्हेरिकोज व्हेन, त्वचा विकार, लहान मुलांची वाढ उशिरा होणे, आळस वाढणे, अनेक लैंगिक समस्या, पोटाचे घेर वाढणे, शरीराला बेढबपणा येणे यांसारखे अनेक दुष्परिणाम होतात.
५) तज्ञाच्या सल्ल्याशिवाय घरगुती उपाय नकोत = सध्या मोठ्याप्रमाणावर आयुर्वेदिक औषधांची पुस्तके वाचुन अथवा व्हाॅटस्अप, फेसबुक वरून वजनासारख्या आजारांवर आणि इतर आजारांवरसुद्धा घरगुती उपाय केले जातात. त्याने फायदा होतो की नाही माहित नाही पण त्रास झालेले अनेक रुग्ण उपचारासाठी माझ्याकडे आलेले आहेत. पित्ताशयात खडे होणे, रक्ती मुळव्याध, आतड्याला सुज/जखम होणे, केस खुप गळणे, खुप असिडीटी होणे, अंगाला खाज/RASHES येणे, हाडे खुप ठिसूळ होणे, हाडे दुखणे, यकृताचा त्रास होणे, रक्त कमी होणे इत्यादी अनेक त्रास तज्ञाच्या सल्ल्याशिवाय परस्पर आयुर्वेदिक औषधे घेतल्याने झालेले अनेक रुग्ण आहेत.
६) वजन कमी करण्यासाठी योग्य उपचार आणि मार्गदर्शन आवश्यक = वजन कमी करण्यासाठी कोणत्या कारणांनी वजन वाढले आहे ते अचूक शोधणे गरजेचे आहे,नाहीतर कितीही दिवस औषधे घेतली, पथ्य पाळली, व्यायाम केले, तरी उपयोग होत नाही. माझ्या दवाखान्यात वजन कमी करण्यासाठी आहाराचे योग्य मार्गदर्शन, नाडीपरीक्षनाद्वारे अचुक निदान, पोटातून योग्य औषधोपचार, प्रत्येक रुग्णानुसार व्यायामाचे आणि आसनाचे प्रकार, प्रकृतीनुसार पंचकर्म, रसायन चिकित्सा याद्वारे वजन वाढण्याचे जे कारण आहे ते दूर करून योग्य आणि सुरक्षित उपचार केले जातात तसेच भविष्यातही असे आजार होऊ नये यांसाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले जाते.
वेदाकेअर हे औंध पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. जे सर्वोत्तम आयुर्वेदिक उपचार देते. वेदाकेअर औंध पुणे येथे सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.
संपर्क
9175069155
9028191155
वेळ
सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00
पत्ता
ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे