पित्त उठणे उपाय
शरीराच्या नियमित कार्यांसाठी पित्त प्रमाणात असणे हे आरोग्यास हितकर आहे.
परंतु हेच बिघडल्यास त्वचेवर व डोक्यावरसुद्धा कोठेही वर्तुळाकार पित्त चकंदळे अथवा मंडल उठणे, शितपित्त होय.
क्वचित ही मंडले तोंडावर व आतुन घशातील त्वचेवरही उठतात.
हा एक लवकर पसरणारा रोग असून यामध्ये त्वचेवर लहान, मोठी, तांबुस मंडले उठतात.
अंगावर लाल फोड येणे, अंगावर खाज येणे उपाय,अंगावर लाल फोड येणे
यामध्ये त्वचेला आग व खाज फार सुटते त्यामुळे अगदी बेचैन होते.
शरीरावर कोठीही खाजावल्यास, खरचटल्यास किंवा धक्का लागल्यास त्वचेवर लालसर पण वाढून खाज येऊन पित्त-पित्ताचे चकंदळे अथवा मंडले उठतात.
ही मंडले ज्या ठिकाणी उठतात त्या ठिकाणी त्वचेला तीव्र अथवा वाटोळया आकाराचा शोथ येतो.
पित्ताची मंडले लहान, मोठी असून त्यांचा रंग एकसारखा नसतो.
ही पित्तप्रकृतीच्या मनुष्यास किंवा दुष्ट्य झालेल्या वातानेही उठतात.
वाताने उठणारी चकंदळे रुक्ष असून लाली कमी असते. जंत, अवष्टंभ आणि अपचनानेही उठत.
लहान मुलांना अंगावर पित्त उठणे, अंगावर लाल चट्टे येणे ही तक्रार आढळते.
अंगावर पित्त उठणे / अंगाला गांधी येणे उपाय
पित्त उठण्याचे मुळ कारण तपासून त्याप्रमाणे औषध आहार व विहार यांची सुयोग्य योजना करावी.
सकाळचे जेवण सकाळी ११ वा. चे पूवी व सायंकाळचे जेवण सायं.८ वा. चे पूर्वी होणे अपेक्षित आहे.
रात्री उशीरा जेवु नये. तसेच उशिरा जेवण केल्यास पोटभरून खाऊ नये.
रात्रीचे जागरण व दिवसाची झोप पूर्णत: वर्ज्य करणे.
जेवण केल्यावर लगेचच कोणतेही कष्टाचे काम करू नये
पंचकर्माने शुद्धि केल्यास या रोगाची पुनःपुन्हा होण्याची प्रवृत्ती टाळता येऊन याचा समुळ नाश करता येतो.
आमसुलाचे पाणी, वातामुळे पित्त उठल्यास मिऱ्याच्या पुडीत तूप घालून खलुन चोळावे.
सौम्य विरेचक द्यावे. हिरड्याचे चुर्ण साखरेबरोबर खावे.
घशातील त्वचा पित्ताने बिघडली असल्यास-मोहरीची पुड व जसदभस्म तुपातुन लावावे.
८ भाग कळीचा चुन्याच्या निवळीत १ भाग शुद्ध जसदभस्म एकत्र करून अंगावरीलं पित्तास लावावे.
मेंथाल पाण्यात मिसळून लावावे अथवा पापडखार पाण्यात विरघळून अंगास चोळावी.
पित्त उठल्यावर पित्तघ्न उटणे लावल्याने पित्तगांधी जातात.
रिठे पाण्यात कुस्करून त्याचा फेस अंगास लावावा अथवा कडुनिंबाचा किवा कवठीचा पाला पाण्यात वाटून अंगास लावावा.
गुळवेलीचा काढा मध घालून प्यावा.
आंबवती (आमटी)चा पाला वाटून मिरपूड घालून, अंगास चोळावा. किंवा नुसते मीठाचे पाणी लावावे
लिंबू चिरून अंगास चोळावे. अथवा टाकणखाराचे पाणी लावावे. काकवी किवा गूळ याबरोबर ओवा खावा.
Pingback: शितपित्त- अंगावर पित्त उठणे - www.harshalnemade.com