सायटिका / गृध्रसीवात
आपल्यापैकी बरेच जण आपल्या आयुष्यातील काही टप्प्यांवर वेदना, दुखणे आणि जखडणे यांचा सामना करतात. आजची धावपळीची जीवनशैली आणि अयोग्य खाण्यापिण्याची सवय यांमुळे आपणच आपल्या हाडे व स्नायूंशी संबंधित समस्यांसाठी जबाबदार असतो.
सायटिका ही मानवी शरीरात सापडणारी सर्वात मोठी आणि सर्वात लांब मज्जातंतू ( नर्व ) आहे. ती खाली कंबरेपासून सुरू होते आणि पुढे खाली संपूर्ण पायपर्यंत आढळते. ह्या संख्येत दोन असतात आणि एल 4 एल 5 एस 1 एस 2 आणि एस 3 स्पाइनल मज्जातंतूंच्या एकत्रीकरणातून बनलेली आहे.
सायटिका हा कोणत्याही प्रकारचा रोग नसून तर त्यामध्ये लक्षणे समुच्चय दिसतात ज्यामध्ये वेदना, मुंग्या येणे, पायात बधीरपणा, पायात कमकुवतपणा येतो जो कंबरेपासून सुरु होऊन नितम्बातून खाली पायापर्यंत पसरतो. मणक्यात मज्जातंतु दबणे हे सायटिकामध्ये वेदनेचे मुख्य कारण असते.
आयुर्वेदिक दृष्टीकोन :- गृध्रसी वात
स्फिकपूर्वा कटिपृष्ठोरूजानुजंघापदं क्रमात् ।
गृध्रसी स्तम्भरुकतोदैगृह्वाति स्यन्दते मुहु ।।
वाताद्रातकफात्तद्रागौरवारोचकान्वित ।।
– च.चि. २८/ ५३,
गृध्रवत चलते यस्मिन् – गिधाडाप्रमाणे असणारी चाल ज्या व्याधित असते तो गृध्रसी रोग होय. गृध्रसीत रोगी हा एका पायावर जोर देऊन चालतो. यामध्ये वात प्रकोपक कारणानी प्रकुपित झालेल्या वायुमुळे वंक्षणसंधीचे ठिकाणी शूल, सशुलक्रिया, क्रियाल्पता वा क्रियाहानी यांसारखी लक्षणे उत्पन्न होत असतात. वंक्षण संधिचे विकृतीमुळेच रुग्णाला तो पाय नीट टेकवता येत नाही. रुग्ण चांगल्या बाजुच्या पायावर जोर करून चालतो व म्हणूनच गिधाडाप्रमाणे चाल येत असते.
प्रकुपित झालेल्या वायुमुळे स्फिकप्रदेशी असणार्या मज्जातंतु वाहिन्यांचा प्रक्षोभ उत्पन्न होतो व त्यामुळे स्फिक प्रदेशातून वेदना सुरु होऊन त्या क्रमाने कटी, उरु, जानु, जंघा आणि पाय यांच्या मागील बाजूने अंगुलीपर्यंत संचारित होतात. ज्यास व्यावहारिक भाषेमध्ये चमक निघणे म्हटले जाते, अशा प्रकारची ही वेदना असते, याचबरोबर पायामध्ये स्तंभ, तोद (सुई टोचल्याप्रमाणे वेदना) आणि स्पंदन हीही लक्षणे आढळतात.
सायटिका होण्यास खालील कारणे कारणीभूत ठरतात:-
आघात
कंबरेवर पडणे
अपघात
पचनाचे आजार
पोट सुटणे
मणक्यातील गादी सरकणे
मणक्याची झीज होणे
मणक्यांना सूज येणे
संधिवात
स्पाइनल स्टेनोसिस
गर्भधारणा
ट्यूमर
कटीश्रोणि भागात संसर्ग
कटीश्रोणि हाडाचे फ्रॅक्चर ई.
सायटिकाचे लक्षण:-
सायटिकामध्ये दुखणे हे एक सर्वात मोठ लक्षण आहे आणि ते दुखणे कारणानुरूप सौम्य ते गंभीर स्वरूपात बदलू शकते.
पायाचे ठिकाणी तीव्र वेदना, जानु-उरु-कटी संधींच्या ठिकाणी स्तंभ आणि स्फुरण जाणवणे
कंबरेत, पायात संचारी वेदना होत असतात आणि त्या बसून, उभे राहून आणि झोपल्यावर देखील वाढतात.
पायात मुंग्या आणि सुया टोचल्यासारखे जाणवणे
पायात कमकुवतपणा जाणवतो
पायाची हालचाल करण्यामध्ये अडचण येत
सायटिकामध्ये उपाय:-
- सायटिकामध्ये दुखणाऱ्या भागाला तेल लावणे, शेकणे, पंचकर्मातील बस्ति आणि अग्निकर्म चिकित्सा हे महत्वाचे उपक्रम आहेत. यामध्ये केसांच्या दिशेने औषधी तैलाने मसाज करावे. त्यानंतर शेकावे करावे. शेकण्यासाठी गरम पाणी, बर्फ यांचा वापर करावा.
स्फिक् प्रदेशी ज्या ठिकाणी सर्वाधिक स्पर्शासहत्व / दुखत असते त्या जागी तेलाने प्रतिसारण करुन अग्नीकर्म केल्याने वेदना त्वरेने कमी होतात.
वैद्याचा सल्ल्यानुसार सायटिका मधील दुखणे कमी करण्यासाठी औषधांचा, पंचकर्माचा प्रभावी करून घ्यावा. ज्यामुळे कोणावरही अवलंबून न राहता आपली नित्यनियमित कामे स्वत करता येतात
४ तोळे एरंडेल व २ चिमुट सुंठ हे मिश्रण घेतल्यास उत्तम लाभ होतो.
आल्याचा रस + हिरा हिंग व भीमसेनी कापूर हे मिश्रण वेदनायुक्त भागावर चोळून लावावे व संपूर्ण आराम करावा.
वांग्याचे फळ चिरून आतील गर चेपून जागा करावी व त्यात ओवा, हिंग, सैंधव, सुंठ घालून ते दोऱ्याने बांधावे व एरंडेलात किवा तिळाचे तेलात शिजवावे. यात चवीपुरता जुना गूळ घालावा.
आराम अत्यावश्यक.आहे
अत्यधिक नरम गादी वापरू नये. याने पृष्ठवंशावर ताण येतो व त्यामुळे सायटिकातील लक्षणांमध्ये वाढ होते.
उकिडवे बसू नये.
दिवसा झोपणे-चालणे,
मलमूत्रादी वेगधारण करू नये.
गृध्रसीवेदनेत आराम न मिळाल्यास तत्काळ तज्ज्ञाचा सल्ला अवश्य घ्यावा.
वेदाकेअर हे औंध पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. जे सर्वोत्तम आयुर्वेदिक उपचार देते. वेदाकेअर औंध पुणे येथे सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.
संपर्क
9175069155
9028191155
वेळ
सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00
पत्ता
ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे