सात्विक आहार व आरोग्य
आहाराचे सात्विक, राजस आणि तामस असे तीन प्रकार होतात. त्यातील राजस आणि तामस आहार हा आरोग्यासाठी आणि योगशास्राच्या हिशेबाने जवळ जवळ त्याज्यच आहे. सात्विक आहार हा शरीर आणि मन यांचे आरोग्य उत्तम ठेवतो. आपल्या शरीराची जडण घडण देशकालपरत्वे बदलत असली तरी सात्विक आहार घेवून त्यातून उत्पन्न झालेले शरीर व मन हे शरीर प्रकृती आणि मन प्रकृती उत्तम ठेवण्यास कारणीभूत ठरते.
शरीरातील वातदोष आणि पित्तदोष यामध्ये राजस आणि तामस आहाराने संहारशक्ती उत्तम होऊ शकते परंतु सात्विक आहाराने जीवनशक्तीला बल मिळते. सुश्रुताचार्यांनी प्राकृत कफ हा सत्व गुणांचा धरला आहे. आणि पित्त हे देखील सत्व गुणाचे धरले आहे. बिघडलेला कफ आणि बिघडलेला वात यांनी अनंत आजार उत्पन्न होतात. त्यामुळेच सात्विक आहाराला महत्व आहे.
शरीरातील वातदोष आणि पित्तदोष यामध्ये राजस आणि तामस आहाराने संहारशक्त उत्तम होऊ शकते परंतु सात्विक आहाराने जीवनशक्तीला बल मिळते. सुश्रुताचार्यांनी प्राकृत कफ हा सत्व गुणांचा धरला आहे. आणि पित्त हे देखील सत्व गुणाचे धरले आहे. बिघडलेला कफ आणि बिघडलेला वात यांनी अनंत आजार उत्पन्न होतात. त्यामुळेच सात्विक आहाराला महत्व आहे.
कोणत्याही प्रकृतीच्या, वयाच्या आणि लिंगाच्या व्यक्तिंनी कोणत्याही पॅथीचे औषध घेत असताना पुढे दिलेले अन्नाचे प्रकार सेवन करून पहावे. अन्नाच्या उष्मांकापेक्षा प्रथिने, कर्बोदके, तैलवर्गीय द्रव्ये यांपेक्षा आयुर्वेदाने अन्नाच्या गुणांना महत्व दिलेले आहे.
कोणत्याही प्रकृतीच्या, वयाच्या आणि लिंगाच्या व्यक्तिंनी कोणत्याही पॅथीचे औषध घेत असताना पुढे दिलेले अन्नाचे प्रकार सेवन करून पहावे. अन्नाच्या उष्मांकापेक्षा प्रथिने, कर्बोदके, तैलवर्गीय द्रव्ये यांपेक्षा आयुर्वेदाने अन्नाच्या गुणांना महत्व दिलेले आहे.
1) दररोज सकाळी उत्तम पद्धतीचा च्यवनप्राश आहारीय मात्रेत घेवून तो पुर्णतः पचल्यानंतर आणि भुकेची जाणीव झाल्यानंतर मीठ न घातलेल्या, भाजलेल्या तांदळाचा भात व दुध असा आहार घ्यावा.
2) गव्हाची पोळी, ज्वारीची भाकरी, मुग / तुर याची धने, जीरे तुपाची फोडणी देवून केलेली आमटी, मसाला विरहीत कोणतेही एक फळभाजी, बटाटे, वांगे, टमाटर, रताळे सोडून आणि भाजलेल्या तांदळाचा भात यांचे सेवन भुकेपेक्षा दोन घास कमी करावे. पाणी उकळून गार केलेले प्यावे.
3) गाजर, काकडी, शतावरी, मुळा, बीट, लाल मूळा, कोबी सर्व प्रकारचे गोड फळे, आंबट फळे अजिबात नकोत, यांचे सेवन भूकेनुसार आणि दोन खाण्यामध्ये किमान ४ तासाचे अंतर ठेवून करावे. यासहच सुक्या मेव्याचा काजू व पिस्ते सोडून देखील वापर करावा.
आजार आणि प्रकृती यानुसार यातील पदार्थ कमी जास्त होऊ शकतात. धातुचे भांडे तापवल्यानंतर आतील पाणी देखील तापते. तसेच या सात्विक अन्नाने तयार झालेले शरीरातील मन व त्यांची रखरख कमी होऊन मनाचे देखील आरोग्य सुधारते आणि घेत असलेल्या औषधांचा अप्रतिम फायदा होतो.
संपर्क
9175069155
9028191155
वेळ
सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00
पत्ता
ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे