शीतपित्त (Urticaria/Hives) | अंगावर पित्त उठणे, खाज व आयुर्वेदिक उपचार
लेखक: डॉ. हर्षल नेमाडे | स्थळ: वेदाकेअर आयुर्वेद, औंध, पुणे
- शीतपित्त (Urticaria/Hives) | अंगावर पित्त उठणे, खाज व आयुर्वेदिक उपचार
- शीतपित्त म्हणजे काय?
- शीतपित्त-अंगावर चट्टे कसे उत्पन्न होते?
- शीतपित्त लक्षणे (Symptoms of Hives)
- वारंवार अंगावर पित्त उठणे का होते?
- शीतपित्त चिकित्सा आणि आयुर्वेदिक उपचार (Ayurvedic Treatment)
- उपचारांचा कालावधी आणि पथ्यापथ्य
- शीतपित्तामध्ये काय खाऊ नये?
- शीतपित्तासाठी Hives आयुर्वेदिक उपचार – पुणे
- लोक वारंवार विचारतात (FAQ)
- पुण्यात शीतपित्तासाठी तज्ज्ञ आयुर्वेदिक उपचार
- आमचा पत्ता
तुम्ही जुनाट पित्ताच्या त्रासाने त्रस्त आहात का, जो नेहमीच्या अँटीहिस्टामाइन औषधांना दाद देत नाही? आयुर्वेदात, पित्ताला शीतपित्त म्हटले जाते — ही एक अशी स्थिती आहे जी वाढलेल्या वात आणि कफ दोषांसोबत पित्ताच्या मिश्रणामुळे उद्भवते. तात्पुरत्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्याऐवजी, पुण्यातील आमचे शीतपित्तवरील आयुर्वेदिक उपचार मूळ कारणावर लक्ष केंद्रित करतात; रोगप्रतिकारशक्ती सुधारणे, आहारात सुधारणा करणे आणि पंचकर्माद्वारे शरीरातील खोलवरचे विषहरण करणे, जेणेकरून शीतपित्ताचा पुन्हा पुन्हा होणारा प्रादुर्भाव थांबवता येईल.
शीतपित्त म्हणजे काय?
आपल्यापैकी काहींना कधी ना कधी अंगावर खाज येऊन ‘शितपित्त’, ‘पित्त उठणे’, ‘चट्टे उठणे’, ‘गांधी उठणे’ असा त्रास जाणवला असेल. काहींना तापमान बदल्यावर, घाम आल्यावर, तणाव, चिंता, सूर्यप्रकाशात गेल्यावर, आणि गरम-थंड पाण्याचा संपर्क झाल्यावर, पित्त वाढल्यामुळे, शरीरातील इतर काही आजारांमुळे एखाद-दुसर्या वेळा असा त्रास होतो, तर काही लोकांना ऋतू बदलल्यावर, खूप दिवस सातत्याने किंवा काही महिन्यांपासून वर्षापर्यंत टिकू शकतो. तर काहींमध्ये जन्मतःच असलेल्या ऑटोइम्यून डिसऑर्डरमुळे सातत्याने हा रोग त्रास देताना आढळतो.
शीतपित्ताला आधुनिक वैद्यकात Urticaria किंवा Hives असे म्हटले जाते. यामध्ये त्वचेवर लालसर wheals, खाज, सूज, Skin Rash (त्वचेवरील पुरळ), angioedema किंवा histamine reaction दिसू शकते. काही रुग्णांमध्ये IgE allergy, autoimmune urticaria, dust allergy, food allergy किंवा Stress-induced Allergy (ताणामुळे वाढणारी allergy) ही कारणे आढळू शकतात.
सामान्यत: या त्रासाला ॲलर्जी (Allergy) म्हणतात, हे चट्टे 24 तासांच्या आत कोणत्याही डागाशिवाय, जखमेशिवाय कमी होतात. पापण्या, ओठ आणि जीभ यासारख्या भागातील श्लेष्मल त्वचेचा सहभाग हा या पित्ताचाच एक गंभीर प्रकार असतो.
आयुर्वेदात या लक्षणाने आढळणारे प्रकार:
- शीतपित्त: प्रामुख्याने ‘वात’ दोष लक्षणांसह.
- उत्कोठ: प्रबळ ‘पित्त’ लक्षणांसह.
- उदर्द: ‘कफ’ लक्षणांसह.
शीतपित्त-अंगावर चट्टे कसे उत्पन्न होते?
हा रोग कसा होतो, याची प्रक्रिया वर्णन करताना ‘शीतमारुत संस्पर्शात् ।’ असे वर्णन आयुर्वेदामध्ये केलेले आहे. याचा अर्थ, त्वचेवर थंड वारा सतत येत राहिल्याने असा त्रास होतो. व्यवहारातसुद्धा ACमध्ये काम करणारे, गाडीवरून सतत प्रवास करणारे यांना हा त्रास जास्त प्रमाणात होताना आढळून आलेला आहे. या थंडाव्यामुळे शरीरातील वात-कफ दोष बिघडतात.
या शिवाय पित्त दोष वाढवणारी / बिघडवणारी कारणे घडत असतील, जसे अवेळी जेवणे, तेलकट – तिखट – मसालेदार पदार्थ (चायनीज, फास्ट फूड, इ.), जेवल्यावर लगेच झोपणे, जागरण करणे अश्या अनेक कारणांनी पित्त वाढते. असे बिघडलेले त्रिदोष त्वचेच्या बाहेर आणि आत पसरून लक्षणे निर्माण करतात.
प्रकुपित झालेला वातदोष व कफदोष हे पित्त दोषाला आपल्यासोबत मिसळून जेव्हा त्वचेच्या ठिकाणी येतात त्यावेळी त्वचेवर मंडल किंवा चट्टे दिसतात.
शितपित्त: शीतपित्तामध्ये गार वारा, वेग धारण करणे यामुळे कफ आणि वाताचा प्रकोप होऊन यासोबत पित्त दोष यांचा संसर्ग झाल्यामुळे हे वाढलेले पित्तदोष वातामुळे शाखांकडे पसरले जाऊन म्हणजेच पोटातून बाहेर निघून त्वचेवर विविध ठिकाणी चट्टे उत्पन्न करते यांमध्ये प्रामुख्याने टोचणे हे लक्षणे अधिक असते याला शितपित्त असे म्हणतात.
उत्कोठ: ज्या वेळेस वरील कारणानेच कफाचा प्रकोप अधिक होऊन जो पित्तदोष त्वचेवर विविध ठिकाणी मंडल उत्पन्न करतो आणि या मंडलामध्ये कंडू किंवा खाज जास्त असते याला उत्कोठ असे म्हणतात.
शीतपित्त लक्षणे (Symptoms of Hives)
रुग्ण ज्याला अंगावर पित्त उठले / ऍलर्जी असे म्हणतो, ती एक विशिष्ट प्रकारची सूज असते. एखादी माशी / गांधीलमाशी चावल्यावर अंगावर ज्या स्वरुपाची मंडळे / सूज येते, अगदी तशाच प्रकारची सूज या आजारात रुग्णाच्या अंगावर उठते. त्या सोबत ‘खूप खाज’ हे महत्त्वाचे लक्षण दिसून येते. त्या ठिकाणी टोचल्यासारखे वाटणे, जळजळणे ही शीतपित्ता मध्ये प्रमुख लक्षणे आहेत.
याशिवाय या सोबत तहान लागणे, तोंडाला चव नसणे, मळमळल्यासारखे वाटणे, अंग दुखणे अशी लक्षणेही दिसतात. क्वचित स्वरूपी काही रुग्णांमध्ये तापही जाणवतो.
जिथे सूज असते त्या ठिकाणी टोचल्याप्रमाणे वेदना आणि आगही जाणवते. काही रुग्णांमध्ये खाज, सूज ही लक्षणे अचानक मोठ्या प्रमाणात निर्माण होतात आणि अचानक मावळूनही जातात. काही रुग्णांमध्ये ही लक्षणे खूप वेळ टिकतात. काही वेळा त्वचेवर एका ठिकाणची सूज मावळेपर्यंत दुसरीकडे सूज येते.
वेळेवर योग्य औषधोपचार केले नाहीत, तर बर्याच वेळा हा त्रास वरचेवर होऊ लागतो. काहींना रोज, दिवसातून ठराविक वेळी किंवा कधीही अशी खाज आणि सूज दिसून येते. रोगाने असे त्रासाचे चिवट स्वरूप आलेला रुग्ण ‘चट्टयामुळे – खाजेमुळे बाहेर कुणाकडे जायला लाज वाटते’ असे हमखास सांगतो. म्हणुनच वेळीच आयुर्वेद औषधोपचार करणे चांगले.
दाह, जळजळणे हे दोन्ही प्रकारच्या रुग्णांमधे समान असते. चिकित्सेचा विचार करताना अंगावर पित्त असेल तरीही ज्यांना टोचल्यासारखे वाटते त्यांची व ज्यांना खाज आहे अशांची चिकित्सा ही वेगवेगळ्या पद्धतीने करावी लागते.

शीतपित्त आणि आधुनिक विज्ञान (Modern Science of Urticaria)
आयुर्वेदात शीतपित्त हा वात, पित्त आणि कफ दोषांच्या बिघाडामुळे निर्माण होणारा त्वचारोग मानला जातो.
आधुनिक वैद्यकशास्त्रात यालाच प्रामुख्याने Urticaria किंवा Hives असे म्हटले जाते.
आधुनिक विज्ञानानुसार हा विकार शरीरातील प्रतिकारशक्ती (Immune System), Histamine नावाचे रसायन, त्वचेतील Mast Cells आणि काही वेळा Autoimmune प्रक्रियांशी संबंधित असतो.
Histamine म्हणजे काय?
आपल्या शरीरामध्ये Mast Cells नावाच्या काही विशेष पेशी असतात. शरीराला एखाद्या पदार्थाची संवेदनशील प्रतिक्रिया जाणवली किंवा प्रतिकारशक्तीने एखाद्या घटकाला धोकादायक समजले, तर या पेशींमधून Histamine नावाचे रसायन मोठ्या प्रमाणात बाहेर पडते.
जेव्हा Histamine अचानक वाढते, तेव्हा त्वचेखालील सूक्ष्म रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि त्यामुळे त्वचेवर लालसर चट्टे, सूज, जळजळ आणि तीव्र खाज निर्माण होते. काही रुग्णांमध्ये Histamine चे प्रमाण अचानक वाढल्यामुळे काही मिनिटांतच त्वचेवर पुरळ किंवा wheals निर्माण होतात.
यामुळे अनेक रुग्णांमध्ये:
- अचानक खाज सुरू होणे
- त्वचेवर उठावदार चट्टे दिसणे
- सूज येणे
- टोचल्यासारखे किंवा जळजळल्यासारखे वाटणे
अशी लक्षणे दिसतात आणि काही वेळानंतर ती आपोआप कमीही होऊ शकतात.
Immune Reaction म्हणजे काय?
काही वेळा शरीराची प्रतिकारशक्ती काही निरुपद्रवी गोष्टींनाही जास्त संवेदनशील प्रतिक्रिया देऊ लागते. उदाहरणार्थ:
- धूळ
- काही खाद्यपदार्थ
- औषधे
- तापमानातील बदल
- ताणतणाव
- संक्रमण (Infection)
अशा वेळी शरीरातील Immune System त्वचेमध्ये दाहजन्य प्रतिक्रिया निर्माण करते. आधुनिक वैद्यकात याला Hypersensitivity Reaction असे म्हटले जाते.
आयुर्वेदामध्ये हाच प्रकार दोषप्रकोप, रक्तदूष्टी आणि त्वचागतरोग या स्वरूपात वर्णन केलेला आढळतो.
Chronic Urticaria म्हणजे काय?
जेव्हा शीतपित्ताचा त्रास:
- ६ आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकतो
किंवा - वारंवार परत परत होतो
तेव्हा त्या अवस्थेला Chronic Urticaria असे म्हणतात.
अशा रुग्णांमध्ये:
- रोज खाज येणे
- ठराविक वेळी चट्टे उठणे
- रात्री त्रास वाढणे
- औषधे बंद केल्यावर पुन्हा लक्षणे सुरू होणे
अशी लक्षणे दिसून येतात.
अनेक रुग्ण वर्षानुवर्षे antihistamine औषधे घेत राहतात; मात्र शरीरातील मूळ कारण किंवा प्रतिकारशक्तीतील बिघाड कायम राहिल्यामुळे त्रास पुन्हा निर्माण होतो.
Autoimmunity आणि पित्त उठणे
काही रुग्णांमध्ये शरीराची प्रतिकारशक्ती स्वतःच्या ऊतींविरुद्ध असामान्य प्रतिक्रिया निर्माण करू लागते. यालाच Autoimmune Disorder असे म्हणतात.
अशा रुग्णांमध्ये खालील विकारांचा संबंध Chronic Urticaria सोबत दिसून येऊ शकतो:
- Thyroid विकार
- Vitiligo
- Rheumatoid conditions
- Autoimmune skin disorders
या अवस्थेत प्रतिकारशक्ती सतत Mast Cells सक्रिय ठेवते आणि त्यामुळे Histamine सतत तयार होत राहते. परिणामी रुग्णाला वारंवार खाज, त्वचेवर उठावदार चट्टे आणि सूज जाणवत राहते.
सर्व प्रकारचे शीतपित्त केवळ खाद्य Allergy मुळेच होते असे नाही; अनेक वेळा मानसिक ताण, पचनातील बिघाड, Autoimmune प्रवृत्ती किंवा अज्ञात कारणांमुळेही Chronic Urticaria दिसून येते.
आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान यातील साम्य
आधुनिक विज्ञानामध्ये ज्या प्रक्रियेला:
- Histamine release
- Immune overreaction
- Chronic inflammation
असे म्हटले जाते, त्याच प्रक्रियेचे वर्णन आयुर्वेदात:
- पित्तदोष प्रकोप
- रक्तदूष्टी
- वात-कफ संयोग
- त्वचागतरोग
अशा स्वरूपात केलेले दिसते.
म्हणूनच आयुर्वेदामध्ये केवळ खाज तात्पुरती कमी करणे हा उपचाराचा उद्देश नसून:
- दोष संतुलन
- रक्तशुद्धी
- पचन सुधारणा
- रोगाची पुनरावृत्ती कमी करणे
- शरीराची प्रतिकारक्षमता संतुलित ठेवणे
यावर भर दिला जातो.
वारंवार अंगावर पित्त उठणे का होते?
जर:
- चुकीचा आहार
- झोपेचा अभाव
- मानसिक ताण
- पचनाचे विकार
- Autoimmune प्रवृत्ती
- सततचे Allergy triggers
हे घटक दीर्घकाळ सुरू राहिले, तर शीतपित्त वारंवार परत येऊ शकते.
म्हणूनच योग्य निदान, पथ्य, जीवनशैलीतील आवश्यक बदल आणि वैद्यकीय उपचार यांना अत्यंत महत्त्व आहे.
शीतपित्त चिकित्सा आणि आयुर्वेदिक उपचार (Ayurvedic Treatment)
- बहुतेक लोक खाज कमी करण्यासाठी औषध सेवन करतात तरीपण अशा रूग्णामध्ये खाज सुटणे चालुच असते.
- आयुर्वेदिक उपचारामधे शीतपित्तामध्ये मूळ उपचार करताना रक्ताश्रित पित्तामध्ये उष्ण, तीक्ष्ण गुणांची वाढ झाल्यामुळे जे त्वचेच्या खाली असलेल्या पेशींना बिघडवून चट्टे उत्पन्न करते, या पित्ताच्या वाढलेल्या गुणांवर चिकित्सा करून कायमस्वरूपी उपचार मिळण्यासाठी आयुर्वेदीक औषध उपचार मदत करतो.
- शीतपित्त, उत्कोठ, कोठ, उदर्द या प्रत्येक प्रकारच्या अंगावर पित्त उठण्याच्या त्रासावर उपचार वेगळ्या पद्धतीने केले जातात.
- ‘शीतपित्त’ म्हणजे अंगावर पित्त उठण्याचे उपचार करताना त्याच्या पार्श्वभूमीला विशेष महत्त्व आहे. व्यवहारात घरगुती उपचार करताना सर्वसाधारणपणे पित्तशामक उपचार केले जातात. जसे आमसूल अंगावर चोळणे, कोकम सरबत पिणे, इ.
- परंतू, आपण आधी जी माहिती पाहिली त्यानुसार हा केवळ पित्ताचा व्याधि नाही; तर यात वात आणि कफ दोष सुद्धा बिघडलेले असतात. म्हणुनच घरगुती औषधांनी जरी त्रास तात्पुरता थांबत असला, तरी ज्यांना वारंवार असा त्रास होतो, त्यांना असे घरगुती उपचार पुरेसे नसतात.
- आयुर्वेद हे संपूर्ण शास्त्र आहे. आणि चिकित्सेच्या दृष्टीने यात सर्व बाजूंनी विचार केला जातो. म्हणुनच केवळ लक्षणे थांबवणे (खाज कमी करणे) एवढाच उपचाराचा हेतू नसून रोग मुळापासून नाहिसा करणे, शरीरातील दोषांमध्ये बदल घडल्यामुळे हा त्रास होतो, ते मुळापासून दुरुस्त करणे, हे आयुर्वेदात खरे ध्येय मानले जाते.
याशिवाय, जुनाट शितपित्ताच्या रूग्णांमधे पोटाचे आजार, जुनाट अम्लपित्त, जंतांचा त्रास, थायरॉईड विकार, तीव्र ताण ई.साठी उपचारांची आवश्यकता असते.
‘अभ्यङ्ग: कटुतैलेन स्वेदश्चोष्णेन वारिणा ।’ म्हणजेच, तिखट चवीच्या औषधीने युक्त तेल अंगाला लावणे व गरम पाण्याने शेक घेणे हे बाहेरून करायचे उपचार उपयुक्त आहेत.
दुर्दम्य लक्षणे असलेल्या रूग्णांसाठी, रुग्ण परीक्षणावरून दोषांच्या अवस्था लक्षात घेऊन शरीर शुद्धिकरण प्रक्रिया- पंचकर्म चिकित्सा आवश्यक असते जसे वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण वगैरे वापरता येते. बिघाड कमी प्रमाणात असेल, तर पंचकर्म न वापरतासुद्धा केवळ पोटात घ्यायच्या औषधांनीही रोग नियंत्रणात आणणे व पुनरावृत्ती कमी करण्यास मदत होऊ शकते.
शीतपित्त हा जीवघेणा आजार नक्कीच नाही. मात्र हा त्रास वरच्यावर होत असताना केवळ वरवर / तात्पुरती औषधे घेत राहून हा रोग कधीच बरा होत नाही; उलट हळूहळू याचे प्रमाण वाढतच जाते. म्हणुनच आपल्याला हा त्रास कसा झाला हे वैद्याकडून समजून त्यानुसार आहार विहारातील बदल, योग्य औषध व शोधन उपचार आवश्यक असते.
आणि शेवटी सर्वात महत्त्वाचे म्हणजे, रोग पूर्णपणे बरा होण्यासाठी जेवढे औषधांना महत्त्व आहे, तेवढेच पथ्य पाळण्यालाही आहे. कारण आपल्या खाण्यापिण्यात किंवा इतर सवयींमध्ये चुका असल्याशिवाय आजार होणारच नाही.
उपचारांचा कालावधी आणि पथ्यापथ्य
नव्या शीतपित्ताच्या त्रासासाठी बहुतेक रुग्णांवर आयुर्वेदिक औषधांचा वापर करून चार ते सहा महिन्यांत पूर्णपणे उपचार केले जातात. काहींना तर जुनाट शीतपित्ताच्या त्रासातून पूर्णपणे बरे होण्यासाठी एक वर्षही लागू शकतो. ऑटोइम्यून डिसऑर्डर असलेल्या रुग्णांना दीर्घ कालावधीसाठी सतत उपचारांची आवश्यकता असू शकते.
अचानक श्वास घेण्यास त्रास, ओठ किंवा जीभ सुजणे यांसारखी गंभीर लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी.
शीतपित्तामध्ये काय खाऊ नये?
उपचारांचा लवकर गुण येण्यासाठी सर्व कारणांचे अचूक निदान आणि ओळख अत्यावश्यक आहे. जीवनशैलीत योग्य बदल करणे आणि पुनरावृत्ती थांबवण्यासाठी माहित असलेले चुकीचे आहार विहार टाळणे तितकेच महत्त्वाचे आहे.
शीतपित्ता मध्ये प्रामुख्याने कुळथीचा सूप, कारल्याची भाजी, आंघोळीसाठी व पिण्यासाठी गरम पाणी वापरणे हे पथ्यकर आहे याशिवाय आग होत आहे म्हणून थंड पाण्याने आंघोळ, थंड हवा किंवा थंड पाणी यांचे सेवन करणे हे चुकीचे आहे.
कोणताही आजार हा आपल्या आहार विहारातील चुकीशिवाय होणार नाही म्हणूनच कोणत्याही रोगामध्ये पथ्यापथ्य पाळणे आवश्यक आहे. नुसते औषधांवर अवलंबून राहणे चुकीचे आहे आणि औषध फक्त आजार बरा करतात, रोग न होऊ देणे हे सर्वस्वी आपल्या सवयींवर अवलंबून असते. एकीकडे वैद्याकडून औषध घ्यावे व सोबत चुकीचे खाणे पिणे वागणे सुरु ठेवल्यास रोग बरा न होता तसाच राहतो.
शीतपित्तासाठी Hives आयुर्वेदिक उपचार – पुणे
Vedacare Ayurved, औंध, पुणे येथे Chronic Urticaria, Allergy, खाज, सूज व वारंवार अंगावर पित्त उठणे यासाठी वैयक्तिक प्रकृतीनुसार आयुर्वेदिक उपचार दिले जातात.
लोक वारंवार विचारतात (FAQ)
शीतपित्त (Urticaria/Hives) म्हणजे नेमके काय?
शीतपित्त म्हणजे त्वचेवर अचानक खाजयुक्त चट्टे, सूज किंवा लालसर पुरळ उठणे होय. आधुनिक वैद्यकशास्त्रात याला Urticaria किंवा Hives असे म्हणतात
शीतपित्त आणि Allergy एकच आहे का?
अनेक वेळा शीतपित्त हे ॲलर्जी (Allergy) मुळे निर्माण होते; परंतु प्रत्येक शीतपित्त केवळ खाद्य ॲलर्जीमुळेच होते असे नाही. काही रुग्णांमध्ये ताणतणाव, पित्त विकार, पचनाचे विकार, विरुद्ध आहार, तापमानातील बदल किंवा ऑटोइम्यून (Autoimmune) कारणांमुळेही हा त्रास होऊ शकतो.
शीतपित्तामध्ये तीव्र खाज का येते?
आपल्या शरीरात ‘हिस्टामाईन’ (Histamine) नावाचे रसायन अचानक वाढल्यामुळे त्वचेखालील सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये बदल होतात आणि त्या प्रसरण पावतात. याच प्रक्रियेमुळे त्वचेवर लालसर चट्टे, सूज आणि तीव्र खाज निर्माण होते.
Chronic Urticaria म्हणजे काय?
जेव्हा शीतपित्ताचा त्रास ६ आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकतो किंवा वारंवार परत परत होतो, तेव्हा त्या जुनाट अवस्थेला वैद्यकीय भाषेत Chronic Urticaria असे म्हटले जाते.
Autoimmune Urticaria म्हणजे काय?
काही रुग्णांमध्ये शरीराची प्रतिकारशक्ती स्वतःच्या ऊतींविरुद्ध असामान्य प्रतिक्रिया निर्माण करते. अशा अवस्थेला Autoimmune Urticaria असे म्हटले जाते. अशा रुग्णांमध्ये शीतपित्ताचा त्रास दीर्घकाळ टिकू शकतो.
अंगावर पित्त उठल्यावर काय करावे? डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
वारंवार पित्त उठत असल्यास केवळ तात्पुरती ॲलर्जीची औषधे (Antihistamines) घेण्याऐवजी त्यामागील मूळ कारण शोधणे महत्त्वाचे असते.
जर वारंवार चट्टे उठत असतील, खाज खूप वाढत असेल किंवा ओठ, जीभ, डोळ्यांभोवती सूज (Angioedema) दिसत असेल, तर त्वरित आयुर्वेद तज्ञांचा सल्ला घ्यावा.
शीतपित्तामध्ये ताणतणावाचा (Stress) संबंध असतो का?
होय. मानसिक ताण, झोपेचा अभाव (जागरण) आणि चिंता यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती असामान्य प्रतिक्रिया देऊ लागते, ज्यामुळे काही रुग्णांमध्ये शीतपित्ताचा त्रास वाढताना दिसतो.
शीतपित्तामध्ये थंड पाणी चालते का?
अनेक रुग्णांमध्ये थंड हवा, थंड पाण्याने आंघोळ करणे किंवा अचानक तापमानातील बदलामुळे त्रास वाढू शकतो. त्यामुळे वैद्यांच्या सल्ल्यानुसार कोमट पाण्याचा वापर करणे उपयुक्त ठरते.
शीतपित्तामध्ये Allergy reaction कोणते पदार्थ टाळावेत आणि आहार कसा असावा?
काय टाळावे?
तेलकट व तिखट पदार्थ
मसालेदार पदार्थ
फास्ट फूड
थंड पेये (Cold Drinks)
बेकरी पदार्थ
आंबट व आंबवलेले पदार्थ
अवेळी जेवण
काय खावे?
जुन्या साळीच्या लाह्या
मुगाचे वरण
कुळथाचे सूप
कारले
पडवळाची भाजी
कोमट पाणी
शीतपित्तामध्ये पंचकर्म उपयोगी आहे का? आयुर्वेद कसा मदत करतो?
होय. आयुर्वेदामध्ये केवळ खाज कमी करणे एवढाच उद्देश नसून दोष संतुलन, रक्तशुद्धी, पचन सुधारणा आणि रोगाची पुनरावृत्ती कमी करण्यावर भर दिला जातो.
रुग्णाच्या प्रकृती आणि दोषांनुसार वमन, विरेचन, बस्ती किंवा रक्तमोक्षण यांसारख्या पंचकर्म उपचारांचा उपयोग केला जाऊ शकतो. कोणता उपचार आवश्यक आहे हे वैद्यकीय परीक्षणानंतर ठरवले जाते.
अंगावर पित्त उठणे पूर्णपणे बरे होऊ शकते का?
योग्य निदान, काटेकोर पथ्य, जीवनशैलीतील बदल, दोषानुसार आयुर्वेदिक औषधोपचार आणि आवश्यक असल्यास पंचकर्म यांच्या मदतीने शीतपित्त नियंत्रणात आणणे व त्याची पुनरावृत्ती कमी करण्यास मदत होऊ शकते.
Stress मुळे allergy वाढते का?
होय. मानसिक ताणतणाव (Stress), चिंता, झोपेचा अभाव आणि सततचा मानसिक दबाव यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती (Immune System) असामान्य प्रतिक्रिया देऊ शकते. काही रुग्णांमध्ये Stress मुळे Histamine चे प्रमाण वाढून त्वचेवर खाज, चट्टे, सूज किंवा शीतपित्ताचा त्रास अधिक वाढताना दिसतो. त्यामुळे अंगावर पित्त उठणे यासाठी मानसिक आरोग्य, झोप आणि जीवनशैली यांनाही महत्त्व दिले जाते.
अंगावर अचानक पित्त का उठते?
अंगावर अचानक पित्त उठण्यामागे अनेक कारणे असू शकतात. काही वेळा खाद्य allergy, धूळ, औषधे, तापमानातील बदल, संक्रमण (Infection), ताणतणाव किंवा पचनाचे विकार यांमुळे शरीरामध्ये allergy reaction निर्माण होतो. या प्रक्रियेमुळे त्वचेखाली Histamine नावाचे रसायन वाढते आणि त्वचेवर लालसर चट्टे, खाज किंवा सूज दिसू लागते. काही रुग्णांमध्ये हे वारंवार होऊन Chronic Urticaria ची स्थिती निर्माण होऊ शकते.
Histamine म्हणजे काय?
Histamine हे शरीरामध्ये नैसर्गिकरित्या तयार होणारे एक रसायन आहे. जेव्हा शरीर एखाद्या पदार्थाला allergy trigger म्हणून ओळखते, तेव्हा Mast Cells नावाच्या पेशींमधून Histamine बाहेर पडते. यामुळे त्वचेवर खाज, सूज, लालसर चट्टे, wheals किंवा allergy reaction दिसू शकतो. शीतपित्त (Urticaria/Hives) मध्ये Histamine ची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते
पुण्यात शीतपित्तासाठी तज्ज्ञ आयुर्वेदिक उपचार
जर तुम्हाला वारंवार अंगावर पित्त उठणे, खाज, सूज किंवा Chronic Urticaria चा त्रास होत असेल, तर Vedacare Ayurved Pune येथे प्रकृतीनुसार आयुर्वेदिक उपचार व पंचकर्म मार्गदर्शन उपलब्ध आहे.
जर तुम्हाला वारंवार अंगावर पित्त उठणे, खाज, सूज, allergy किंवा चट्ट्यांचा त्रास होत असेल, तर पुण्यातील औंध येथील Vedacare Ayurved येथे तज्ज्ञ आयुर्वेदिक उपचार व पंचकर्म मार्गदर्शन उपलब्ध आहे. Chronic Urticaria, सतत येणारी खाज किंवा वारंवार होणाऱ्या allergy reactions साठी वैयक्तिक प्रकृतीनुसार उपचारांसाठी आजच संपर्क साधा. बाणेर, औंध, पिंपरी-चिंचवड (PCMC) तसेच पुण्यातील विविध भागांतील रुग्ण येथे उपचारासाठी भेट देतात.
आमचा पत्ता
📍 Get Directions to Clinicया लेखाविषयी
अस्वीकरण (Disclaimer): या लेखातील माहिती केवळ शैक्षणिक आणि माहितीच्या उद्देशाने दिली आहे; हा कोणत्याही व्यावसायिक वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. जुनाट शीतपित्त (Chronic Urticaria) पूर्णपणे बरे करण्यासाठी प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीचे वैयक्तिक परीक्षण करणे आवश्यक असते. कोणताही औषधोपचार सुरू करण्यापूर्वी कृपया आमच्या पुणे येथील क्लिनिकमध्ये प्रत्यक्ष येऊन डॉ. हर्षल नेमाडे यांचा सल्ला नक्की घ्या.

