साबुदाणा हा वनस्पतीच्या कंदमुळापासून बनतो. टॅपिओका या नावाच्या वनस्पतीच्या कंदापासून साबुदाणा बनतो. या झाडाचा कंद सोलून किंचित वाफऊन बारीक लगदा करतात. हा लगदा चाळणीवर टाकतात. त्यातून पडणाऱ्या छोट्या छोट्या गोळ्या वाळवतात. मूळ हा भाग वनस्पतीच्या इतर सर्व भागांपेक्षा गुरू असतो. साबुदाणा पचन होण्यास अंदाजे ४-५ तासांचा कालावधी लागतो. अत: मंदाग्नी व विषमाग्नी या अवस्थांत निषिद्ध, समाग्नीसाठी नियमित वापरास अयोग्य, तीक्ष्णामीसाठी सुयोग्य ठरतो.
साबुदाणा सेवन विविध प्रकार
१) लापशी २) खीर ३) खिचडी ४) दही साबुदाणा ५) वडा, थालीपीठ ६) भाकरी ७) घावन इ.
वातप्रकृतीच्या लोकांचा कोठा हा क्रूर स्वरूपाचा असतो म्हणून या लोकांनी sabudana खाताना तो सस्नेह दुध एकत्र करून खावी दूध, तूप घालून खीर करून खावे.
पित्तप्रधान प्रकृतीच्या लोकांनी दुधासह खीर स्वरुपात किंवा वरून तुप घेऊन किंवा तुपाची फोडणी देऊन खावे. पित्तप्रधान प्रकृतीच्या मृदुकोष्ठी व्यक्तीने खिचडी, थालीपीठ हे पदार्थ खाऊ नयेत.
कफप्रधान प्रकृतीच्या लोकांनी भाजून चिवडा वगैरे कल्पनेने खावे.कफप्रधान प्रकृतीच्या मध्यम कोष्ठाने साबुदाणा हा थालीपीठ- भाकरी व तूप या स्वरुपात खावे.
वारंवार भूक लागून कितीही खाल्ले तरी समाधान होत नसल्यास साबुदाण्याची घट्ट खीर शिजवून त्यात भरपूर तूप घालून खावी.
शुक्राच्या अतिस्त्राव झाल्यामुळे -अत्यंत खिन्न वाटत राहणे, कमर, हातापायाचे सांधे दुखत रहाणे, शुक्राचा स्त्राव अत्यंत कष्टाने आणि अल्प होणे आणि तदनंतर मनाची शक्तीच जाणे, शरीरातील बल नष्ट होणे या लक्षणांसाठी साबुदाण्याची खीर आणि ज्येष्ठमध, जायफळ यांच्यासह उडदाचे वडे खावे किंवा उडीद आणि गव्हाच्या पोळ्या खाव्या.
तोंड येण्याची सवय असणाऱ्यांनी साबुदाणा खीर चघळून खावी.
अम्लपित्तने होणार्या पोटातील जळजळीवर जेवणाच्या अर्ध्या भागात साबुदाण्याची खीर खावी.
जेवण झाल्यानंतर पचन होत असता जो शूल होतो यावेळी दाह, छर्दि, तृष्णा, भ्रम ही लक्षणे असल्यास फक्त अप्रतिम साबुदाणा खीर खाऊन २१ दिवस राहावे. यासह वैद्याचे सल्ल्याने औषध घेतल्यास उत्तम फायदा होतो.
वारंवार आणि कुंथुन संडासला होणे, यात खूप कुथंल्यावर थोडासा कफ येणे, पोटात पिळवटल्याप्रमाणे वेदना होणे आणि कफ सुटण्यास त्रास होणे अशी लक्षणे असल्यास साबुदाण्याची दुधातील खीर व एरंडेल हे मिश्रण अपानकाळी घ्यावे. खीर गरम असताना घ्यावी. यात साय येऊ देऊ नये. याने कफ सुलभतेने सुटतो आणि पोटातील वेदना व वारंवार मलवेग येण्याचे प्रमाण कमी होते.
कास रोगात खूप ढास लागून सुका खोकला येणे, छातीत, बरागड्यांत दुखणे, डोके दुखणे भ्रमल्यासारखे होणे, आवाज क्षीण होणे, अशक्तपणा वाढणे आणि आवाज चिरका असलेला खोकला येणे ही लक्षणे असल्यास साबुदाणा खीर आणि जेष्ठमध आणि तूप हे मिश्रण गरम असतानाच घसा शेकत प्यावे.
मूळव्याध असलेल्या व्यक्तीस मलबद्धतेचा त्रास जाणवतो अशा वेळी त्यांनी इतर सारक किंवा रेचक औषधांचा वापर करण्यापेक्षा आहारात साबुदाण्याची खीर इसबगोल घालुन घ्यावी.
खालील रोगांत आणि अवस्थांत खीर वापरू नये.
- हृद्रोग
- श्वासवेगावस्था व रोग असलेल्यांनी
- जुलाब
- ग्रहणी
- भूक न लागणे
- ताप येणे
- मेदस्वी माणसे
- सर्दी होणे
- सूज असताना
- सांधे सुजून तीव्र वेदना आणि तीव्र ताप येणे
- सामव्याधी
- जंत
- मधुमेह
- डोळे येणे
साबुदाणा थालीपीठ हे प्रकार उत्तम पाचनशक्तीच्या व्यक्तींनीच खावे. ज्यांना भूक कमी लागते किंवा ज्यांना कधी भूक लागते कधी भूक लागत नाही अशा लोकांनी तर साबुदाणा खाऊच नये. ज्या लोकांचा कोठा हा मंऊ असतो अशा लोकांनी साबुदाणा शक्यतो खाऊ नये. रात्रीच्या वेळी साबुदाणा खाणे निषिद्ध आहे रात्रीच्या वेळी स्वस्थ व्यक्तीने देखील साबुदाणा खाऊ नये. साबुदाण्याचे शिळे पदार्थ किंवा उरलेल्या साबुदाणा फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी त्याचे पदार्थ बनवूण खाणे हा प्रकार करू नये. नाष्टाला सतत साबुदाणा खाऊ नये.