संस्कृत:- दुर्वा
मराठी:- हरळी, दुर्वा
हिंदी:- हरीयालो, दूब
Botanical: – Cynodon dactylon
English: – Bahama Grass, Couch Grass

दुर्वा गुणधर्म

नीलदुर्वा हिमा तिक्ता मधुरा तुवरा हरे ।
कृफपित्तास्त बीसप तृष्णा दाहत्वगामयान ॥

दुर्वा ह्या थंड, कडू, गोड, तुरट व सारक असून कफपित्तविकार, धावरे, तहान, दाह त्वचारोग, व रक्तविकार यांचा नाश करतात.

दुर्वा सर्वांच्या परिचियांच्या आहेत. कारण घरोघर गणपती पूजन होते व गणपतीला दुर्वा प्रिय असल्यामुळें त्या गणपतीला अर्पण करतात. तेव्हा त्याचा विशेष परिचय करून देण्याचे कारण नाहीं.

गणेश पुराणात अनलासुराची कथा सांगून दुर्वा चे महात्म्य व औषधी उपयोग फार मार्मिकतेने आढळते. गणपती पूजनांत दुर्वाचें महात्म्य विशेषत्वाने सांगितलें आहे,

दुर्वा हे दाह शांतीचे सर्वोत्कृष्ट व सुलभ औषध आहे

दुर्वाही सर्वांच्या परिचयाची व सर्वत्र आढळणारी वनस्पती आहे. हिला हरळी- नेहमी हिरवी असतें असेंही म्हणतात, हे एक प्रकारचे गवत आहे.

दुर्वाच्या दोन जाती आहेत. एक पांढरी व दुसरी निळसर हिरवी. या दोन्ही औषधाकरिता उपयोगांत आणतात.

दुर्वा चे उपयोग

दुर्वाचे गुणधर्म:-  
या तुरट, शीत, मधुर तृप्तीकारक, तृषा, दाह, वांती, रक्तरोधक, श्रम, कफ, मुर्च्छा, अरुचि, विसर्प, भूतबाधा नाहीशा करणाऱ्या आहेत.

नाक घुळणा फुटल्यास :-
दुर्वाचा रस काढून नाकांत घालावा, रक्त थांबते

दाह :-
सर्वांगाची आग होत असल्यास दुर्वाचा रस खडीसाखर घालून घ्यावा. तापातील उष्णतेचें प्रमाणही यानें कमी होऊन ताप उतरतो. विषमज्वरांतही याच्या रसाने अंगाची होणारी आग थांबते.
दाह कमी करणारें याच्याइतके उत्तम औषध नाहीं.

मूत्र कंडू :-
लघवीला अडखळत व थेंबे थेंब असे होत असतांना दुर्वाचा रस द्यावा म्हणजे लघवीला साफ होते व लघवी तांबडी होत असल्यास पांढरी स्वच्छ होऊं लागते.

रक्तातिसार :-
संडासावाटे रक्तस्राव होत असल्यास दुर्वाचा रस द्यावा.

रक्त प्रदर :-
या विकारात पाळीच्या वेळी अधिक प्रमाणांत व अधिक दिवस रक्तस्त्राव होत असल्यास दुर्वाच्या रसाने चांगला फायदा होतो.

रक्त खराब असल्यास :-
दुषित रक्तामुळे अंगावर चकंदळे/ गांधी पडतात. खाज सुटते अशा वेळीं दुर्वाचा रस घेतल्याने बरें बाटतें.

उचकीवर :
दुर्वाच्या मुळ्यांचा रस १ मासा व मध १ तोळा एकत्र करून प्यावा.

मासिक पाळी :-
पांढऱ्या दुर्वाच्या रसांत डाळिंबाचे दाणे वाटून शिळ्या पेजेतून सात दिवस द्यावा म्हणजे, वयात आल्यावरही ज्या स्त्रीला मासिक पाळी येत नाही तिला सुरु होते. 

जखम :-
मार लागल्याने झालेल्या जखमेवर दूर्वांच्या रसांत सिद्ध केलेले तेल लावावें म्हणजे जखम लवकर भरून येते.

हिरडया सुजणे, दांतांतून पु येणे, अमांश, डांग्या खोकला, तापसरी, गोंवर, रातांधळें, नेजविकार न्यूमोनिया यांत दुर्वाचा रस उपयुक्त होणारा आहे.

बाळंपणानंतर जास्त रक्त जाणें, इतर आजारांत रक्तस्त्राव होणें, जखमा लवकर भरून न येणें यांत दुर्वा रसाचा उपयोग चांगला होतो.

दुर्वाचा रस काढण्याची कृती:

दुर्वा प्रथम चांगल्या स्वच्छ पाण्यात धुवून काढाव्या. माती जळी जळमटे किंवा इतर किडे बरे त्यात रहाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. नंतर त्या दुर्वा पाट्यावर पाणी घालुन चटणीप्रमाणे वाटाव्या व फडक्यात घेऊन पिळून रस काढावा.

दुर्वारस ( पांढऱ्या दुर्वाचा नको ) घेणे हे हमखास उपयोगी ठरेल. वरील प्रमाणावरून जीवनसत्व ‘“ए” व “सी” दुर्वातून भरपूर प्रमाणांत मिळूं शकतात.

ज्वरांतील रोगप्रतिकारशक्ति टिकविण्यासाठीही उपयोग होतो.

या रसाने रक्ताचे प्रमाण वाढते.

दुर्वाच्या रसाची साखरेला भावना देऊन त्याचा टिकाऊ कल्प बनवतात. हा कल्प दाह,रक्त वाढण्यासाठी वापरतात.

दुर्वांच्या रसापासून तयार टॅब्लेट्स नियमित उपयोग केल्यास चांगला फायदा दिसतो.

वेदाकेअर हे औंध पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. जे सर्वोत्तम आयुर्वेदिक उपचार देते. वेदाकेअर औंध पुणे येथे सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संपर्क

9175069155
9028191155

वेळ

सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00

पत्ता

ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे

1 thought on “दुर्वा”

  1. Pingback: गणपतीला दुर्वा का प्रिय आहेत? जाणुन घ्या. - www.harshalnemade.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!