मुरमे, पुटकुळ्या, डोळ्या खालील काळी वर्तुळे, नाकाचे हाड वाढणे, मुरमांचे खड्डे आणि डाग, अतिरिक्त लव (स्रीयांचे बाबतीत) हिरवी दाढी, चाई पडणे, रुक्षत्वचा, तेलकट त्वचा, तिरळेपणा, चामखिळ, वांग, दातांच्या विकृति, ओठावरील पांढरे डाग, चेहरा काळा पडणे इत्यादी कारणांनी चेहर्याचे आरोग्य बिघडते आणि त्याचा परिणाम शारिरीक मानसिक व्यक्तिमत्वावर घडतो.
मानेपासून वरील भागांत आयुर्वेद शास्रानुसार रक्त आणि कफ दोषांचे आधिक्य असते. त्यासाठी रक्त व कडू तुरट गोड सर सात्विक अन्नसेवन केले पाहिजे, चमचमीत, मांसाहार, तळण, व्यसने जागरणे यांचा हव्यास सोडला पाहिजे. कफदोष प्राकृत होण्यासाठी ‘वमन’ या पंचकर्मोपचाराचा वापर करावयास हवा.
नस्य, कर्णपूरण, औषधी गुळण्या, मुखलेप, जळवा लावणे, शिरोधारा, शिरोबस्ति, विरेचन, नेत्रांजन यांचा वापर करून वर उल्लेखित आजारांत लक्षणीय फायदा होतो.
शरीर व मनासंबंधीत विकारांचा संबंध वर उल्लेखित आजारांत असल्यास त्यामुळे आजाराची चिकित्सा करावी लागते.
ठराविक वेळी जेवण, मलमूत्र विसर्जन, रात्री वेळेवर लवकर झोपून लवकर उठणे, नियमित प्राणायाम, योगासने. रोज सर्व शरीरास तीळाचे तेल लावणे, कोठा साफ करण्यासाठी एरंडेल तेलाचे महिन्यातून एकदा जुलाब होणे. चेहऱ्यास आंबेहळद आणि मसूर पीठाचे उटणे रोज लावणे, जंताचे औषध दर दोन महिन्याने घेणे, जेवणांत विदाहीअन्न न घेणे यामुळे चेहऱ्याचे आरोग्य सुधारते.
वृक्काचे, हृदयाचे जनेन्द्रियाचे आजाराचा संबंध चेहऱ्याचा आरोग्याशी असतो त्यामुळे वैद्याला त्यामुळे करावे लागतात. चेहऱ्याचा आरोग्यासाठी नाक, कान, घसा, डोळे, मस्तिष्क, मुख यांच्या रोगांची उपचार प्रणाली, औषधे वैद्याला वापरावी लागतात हे आयुर्वेदाचे यासंदर्भात वैशिष्ट्यच म्हणावे लागेल