तोतरे बोलणे – कारणं, उपाय व आयुर्वेदिक थेरपी

तोतरेपण: कारणे, लक्षणे आणि आयुर्वेदिक उपाय तोतरेपण म्हणजे काय? तोतरे बोलणे (Stuttering) ही एक भाषा आणि संभाषणाशी संबंधित समस्या आहे, ज्यामुळे बोलताना शब्द अडखळणे, पुनरावृत्ती होणे किंवा बोलणे थांबणे असे अनुभव येतात. ही समस्या लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत कोणालाही होऊ शकते. तणाव, चिंता, अनुवांशिकता किंवा भाषा विकासातील अडचणी यामुळे तोतरेपण उद्भवू शकते. आपलं बोलण स्वच्छ आणि […]

लेप कसा करावा? आयुर्वेदातील लेपाचे प्रकार व वापर

वेदना निवारणासाठी आयुर्वेदिक लेप – डॉ. हर्षल नेमाडे

लेप म्हणजे ओढा घालणे असा व्यवहारात साधा अर्थ आहे, परंतु चरक ॠषींनी शरीराच्या आजारांसाठी आभ्यन्तर शुद्धी ( पंचकर्म व पोटातील औषधी ) तसेच बाह्यशुद्धी साठी अंगाला तेल लावणे, उटणे लावणे, लेप लावणे इ प्रकार सांगितले आहेत. आजार समूळ जाण्यासाठी म्हणूनच लेपाचा प्रभावीपणे वापर करता येतो. लेपामूळे त्वचा विकार, सोरायसिस , वातरक्त, रक्त साकळणे, फुप्फुसात पाणी

शिरोधारा पंचकर्म: आयुर्वेदिक तणावमुक्ती आणि मानसिक शुद्धीकरण

शिरोधारा: आयुर्वेदातील एक अद्भुत मानसिक विश्रांती आणि मेंदूविकारांवरील प्रभावी उपचार आजच्या धावपळीच्या युगात वाढलेला कामाचा ताण, जागरण, स्पर्धा, या सर्व हेतूमुळे शरीरात वाताची वृद्धी होताना दिसते. अशावेळेस शिरोधारेचा वापर त्या विकृत वाताला जिंकण्यासाठी करतात. वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेल्स, मॉल्स व स्पामध्ये शिरोधारेचा वापर करून लोंकाना रिल्याक्सेशन् दिले जाते. शरीराला रिल्याक्सेशन मिळणे एवढाच तोकडा फायदा आयुर्वेदाला अपेक्षित

नेत्रतर्पण (नेत्रबस्ती) – डोळ्यांचे पोषण करणारा आयुर्वेदिक उपाय

Netra Tarpan Ayurvedic eye treatment by Dr. Harshal Nemade

तर्पयतिति, तृप्तीकरं यद्‌ तद्‌ तर्पणम्‌ । ज्या क्रियेमुळे अवयवास तृप्ती मिळते त्या क्रियेस तर्पण असे म्हणतात. डोळ्यांना झालेले विविध आजारांच्या चिकित्सेमध्ये डोळ्यांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून आयुर्वेद शास्त्राने नेत्रतर्पण हा एक चिकित्सा उपक्रम सांगितलेला आहे.नेत्रतर्पणाने मानेवरील अवयवांचे व नेत्रगत असलेल्या दोषांचे स्त्रावरूपाने शोधन व शमन केले जाते. नेत्र तर्पण विधी :- नेत्रतर्पण सकाळी किंवा सायंकाळी

पुटपाक उपचार – डोळ्यांच्या आजारांवर आयुर्वेदिक नेत्रोपचार

पुटपाक हा नेत्रतर्पणानंतर केला जाणारा एक चिकित्सा उपक्रम आहे. तर्पणानंतर डोळ्यास आलेली क्लिन्नता दूर करण्यासाठी, नेत्रबल वाढविण्यासाठी पुटपाक उपक्रम केला जातो. नेत्रतर्पणाने डोळ्यातील दोष, रोग शांत झाल्यानंतरच पुटपाक द्यावा. तर्पण करण्यायोग्य व्यक्तीमध्येच किंवा रुग्णांमध्ये पुटपाक केला जातो. पुटपाकासाठी वापरली जाणारी औषधे व डोळ्यांच्या विविध रोगांमध्ये केल्या जाणाऱ्या उपयोगानुसार पुटपाक तीन प्रकारे करता येतो. पुटपाकाचे प्रकार

नेत्रधावन: डोळ्यांच्या स्वच्छतेसाठी आयुर्वेदिक चिकित्सा

।। सर्वेन्द्रियाणां नयनं प्रघानम्‌ ।। सर्व इंद्रियांमध्ये नयन (नेत्र, डोळा) हे प्रधान इंद्रिय आहे. डोळा व दृष्टी ही परमेश्वराने मानवाला दिलेली पंचज्ञानेंद्रियांतील सर्वोत्कृष्ट देणगी आहे. मानवाचे बहुतांशी ज्ञान व जीवनपद्धती ही डोळा व दृष्टीवर अवलंबून असते. अशा प्रधान इंदियांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व इंद्रियास झालेल्या आजारांच्या चिकित्सेसाठी आयुर्वेद शास्त्राने ‘नेत्रधावन’ हा एक चिकित्सा उपक्रम सांगितेलेला आहे. ॥

नस्य पंचकर्म नाकाद्वारे शरीरशुद्धीचा उपचार

डॉ. हर्षल नेमाडे यांच्याकडून नस्य पंचकर्म उपचार

आपले संपूर्ण शरीर व संपूर्ण विश्व हे पृथ्वी-आप-तेज-वायू-आकाश या पंचमहाभूतांपासून बनलेले आहे. त्यामुळेच ‘जे पिंडीते ब्रह्मांडी’ या न्यायाने आपल्या आसपासच्या जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या शरीर व मनावर परिणाम होत असतो.बाह्य जगाचे हे ज्ञान आपल्या शरीराला पंचज्ञानेंद्रियामार्फत होत असते. (कर्ण-नेत्र-नाक-त्वचा-जिव्हा) म्हणूनच यापैकी एकाचेही कार्य उणावले तरी संपूर्ण शरीराचा समतोल ढासळू शकतो. नाक है त्यापैकीच एक

लेप उपचार – वेदना, सूज आणि त्वचारोगांवर प्रभावी आयुर्वेदिक लेपन

वेदना, सुज व त्वचारोगांसाठी लेप पंचकर्म

आपण रोजच्या जीवनात अनेक असे आजार पाहत असतो की त्यावर आपल्या घरातील थोर व्यक्ती अमूक अमूक गोष्टीचा लेप करा असे सांगत असतात. लेप म्हणजे काय? एखाद्या औषधाचे चूर्ण पाण्यात दुधात, ताकात किंवा इतर द्रव पदार्थात एकत्र करून दुखणाऱ्या भागावर लावणे किंवा औषधी वनस्पती पाण्यात, दुधात, ताकात इत्यादींमध्ये उगाळून त्याचा गंध दुखणाऱ्या भागावर लावणे म्हणजे लेप

ताक थंड की गरम? बटरमिल्क आयुर्वेदिक दृष्टिकोनातून जाणून घ्या

tak buttermilk hot or cold

तक्रं लघु कषायाम्लं दीपनं कफवातजित्‌ ॥ ३४ ॥शोफोदरार्शोग्रहणीदोषमूत्रग्रहारुचीः प्लीहगुल्मघृतव्यापग्द्रपाण्डवामयाज्जयेत्‌ ॥ ३५ ॥ ताक हलकें, आंबट व किंचित्‌ तुरट, वातनाशक, कफघ्न व दीपक असून सूज, उदर, मूळव्याध, संग्रहणी, मूत्ररोग, ग्रह ( बालग्रह इत्यादि ), अरुचि, पांथरी, गुल्म, पांडू व विष आणि घृतजन्य विकार यांचा नाश करिते.हा दुधापासून बनणारा पदार्थ आहे. दुधाचे दही व दही घुसळून ताक केले

आयुर्वेदिक पानक व शरबत – कोल्डड्रिंक्सला आरोग्यदायी पर्याय

पानक – सरबत उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले कि सगळ्याचे पाय थंड पेयांच्या दिशेला वळू लागतात. उन्हाळ्याच्या काळात वातावरणातील सूर्याची तेजस्वी किरण आणि अति-पातळ गरम हवा शरीरातील ओलसरपणा कमी करते. वाढलेली उष्णता, अग्नीच्या ज्वाळेप्रमाणे वाहत असलेली गरम वाऱ्याची झळ, खूपच कष्टदायक व स्वास्थ्यास हानिकारक ठरते. यामुळे शरीरातील जलीय अंशाचा नाश होऊन शरीरात अशक्तपणा, अस्वस्थता, चिंता, थकवा