vedacareorganizer@gmail.com

हिमोफिलिया: एक दुर्मिळ अनुवांशिक आजार

हीमोफिलिया (Haemophilia) रक्त न थांबण्याचा आजार आणि आयुर्वेदिक उपचार

हिमोफिलिया हा एक दुर्मिळ अनुवांशिक आजार आहे जो तुमच्या शरीराच्या रक्त गोठण्याच्या क्षमतेत अडथळा आणतो. हा वारसागत आजार साधारणपणे १०,००० लोकांमध्ये १ व्यक्तीला प्रभावित करतो आणि रक्तस्त्राव थांबवण्याच्या शरीराच्या क्षमतेला गंभीरपणे बाधा आणतो. जागतिक हिमोफिलिया दिनानिमित्त तुम्हाला माहित असायलाच हव्यात अशा काही महत्त्वाच्या गोष्टी हिमोफिलिया म्हणजे काय? हिमोफिलिया हा एक वारसागत आजार आहे ज्यामुळे इजा

सातु (यव,सत्तु) चे फायदे आणि उपयोग: आरोग्यदायी पौष्टिकता

सातू – नैसर्गिक आरोग्यवर्धक आहार – डॉ. हर्षल नेमाडे, Vedacare Ayurved

प्राचीन काळापासून सातुचा उपयोग केला जात आहे. तृणधान्यांपैकी सर्वाधिक प्रसारित झालेले व जगातील जवळजवळ सर्व देशांत पिकविले जाणारे सातूचे पीक फार पूर्वीपासून ज्ञात आहे. सातू हे धान्य एक दिव्य औषध आहे. सातु स्वाद आणि आकाराच्या दृष्टीने गव्हापेक्षा अगदी वेगळा आहे, परंतु हे गव्हाच्या जातींतील धान्य आहे. गुणधर्मात सातु गव्हापेक्षा हलके धान्य आहे. सातु भारतात सर्वत्र

अग्निमांद्य आणि भूक न लागण्यावर उपाय: आयुर्वेदिक उपचार

भूक न लागणे / भूक कमी होणे – आयुर्वेदिक कारणे, निदान व उपचार – डॉ. हर्षल नेमाडे, Vedacare Ayurveda

मंदाग्निचा अर्थ पचनशक्‍तीत विकार उत्पन्न होणे हा आहे, खाल्लेल्या अन्नाचे पचन ज्या कारणांनी होते त्यात बिघाड होऊन अन्नाचे पचन चांगले होत नाही. ह्याचेच नांव मंदाग्नि आहे. अन्नाने शरीराची वाढ होते आणि दैनंदिन काम करण्यामुळे शरीरातील ज्या द्रव्याचा क्षय होतो ती द्रव्यें शरीरास न मिळाली तर शरीराचा क्षय होणे निश्‍चितच आहे. प्रत्येक दिवशी खालेल्या जेवणामुळे शरीरातील

दम्याने दमू नका, तर दम भरा: दमा आयुर्वेदिक उपाय

दमा आणि श्वास लागणे – आयुर्वेदिक उपचारAyurvedic Treatment for Asthma

सामान्यतः दम लागल्यावर सर्वात प्रथम आठवते ते नेबुल्याझेशन म्हणजेच औषधीवाफ किंवा इंजेक्शन ज्यामुळे संकुचित श्वासवाहिन्यांचे प्रसारण होते व त्यातील अडकलेला कफ मोकळा होतो. या औषधांनी त्वरित्‌ पण तात्पुरते बरे वाटते, परंतु याने दमा कायमस्वरूपी बरा होत नसतो. श्वासवाहिन्यातील संकोच / अवरोध घालवणेसाठी पुन: पुन: इनहेलर स्प्रे, इंजेक्शन, वाफ घेणे, स्टेरॉईड्स्‌ हे वारंवार घ्यावे लागतात. हे

स्वरभंग आणि आवाज बसण्यावर उपाय: आयुर्वेदिक उपचार

आवाज बसणे, आवाजात भरकटपणा यावर आयुर्वेदिक उपाय

सर्दी, पडसे, खोकला, जुनाट खोकला, अति आंबट थंड पदार्थ खाणे घशातील जंतुसंसर्ग (थ्रोट इन्फेक्शन), स्वरयंत्राला सुज, घशातील फोड, घशाचा दाह किंवा घशात खवखवणे, घशाला मार लागणे, फार जोरात बोलण्याची सवय इत्यादी कारणांनी घशातून आवाज निघण्यास अडथळा होतो व त्यामुळे बोलण्याची शक्‍ती कमी होते. एखादे वेळी तर रोग्याचा आवाजे इतका बारीक होतो की, रोग्याने बराच जोर

पोटाच्या पचनाच्या आजारांवर आयुर्वेदिक उपचार: प्रभावी उपाय

पोटाचे विकार आणि पचन सुधारण्यासाठी आयुर्वेदिक उपचार Ayurvedic Treatment for Digestive Disorders – Dr. Harshal Nemade

आजच्या धावपळीच्या, इंस्टट, बैठ्या जीवनशैलीने दिलेल्या अनेक वरदान-शापाच्या यादीत सध्या सगळ्यांना सतावणाऱ्या आजारांमध्ये पोटाचे आजार अग्रणी आहे.  पोटाचे पचनाचे आजार व उपचार आहारशैलीत झालेला बदल, व्यायामाचा अभाव, शारीरिक मेहनती ऐवजी यंत्रांचा वाढता वापर, वाहनाचा अतिरेक, वाढलेले वजन, बैठी जीवनशैली ही कारणे दिसतात. रूग्ण दवाखान्यात येतो, सोबत रिपोर्टची थप्पी असणारी फाईल असते, सर्व रिपोर्ट नॉर्मल असतात,

पंचकर्माचे मनुष्य जीवनातील महत्व

पंचकर्माचे महत्त्व – आयुर्वेदातील शुद्धी चिकित्सा,पंचकर्माचे महत्त्व – आयुर्वेदातील शरीरशुद्धी व मूळ कारणांवर उपचार – डॉ. हर्षल नेमाडे, Vedacare Ayurveda

मनुष्याच्या काही उपजत इच्छा असतात. भरपूर धन मिळावे, मनोकामना पूर्ण व्हाव्यात, मोक्ष मिळावा इ. या सर्व इच्छांची पूर्तता होण्यासाठी शरीर संपदा आणि सबल मन असणे गरजेचे आहे. कारण शरीर आजारी असताना या इच्छांची पूर्तता होवू शकत नाही. आणि झाल्यास त्याचा सुखानुभव घेता येत नाही. नेमकी हीच गोष्ट आयुर्वेदिय क्रषिमुनींनी ओळखून मनुष्य जीवन उत्तम पद्धतीने जगून

जंत कृमींवर प्रभावी उपाय: आयुर्वेदिक उपचार

कृमी व जंत दोषांवर आयुर्वेदिक उपचार – डॉ. हर्षल नेमाडे

शरीरात अनेक प्रकारच्या कृमिंची उत्पत्ति होत असते. यापैकी काही कृमि सहज म्हणजेच जन्मापासूनच शरीरात असतात. हे कृमि अविकारी असतात. म्हणजेच या कृमिमुळे शरीरात कोणतीही रोगची लक्षणे उत्पन्न होत नाहीत. उलट शरीर स्वास्थ्यासाठी त्यांची शरीरातील उपस्थिती आवश्यक अशीच असते. या अशा कृमिंचे वर्णन चरकाचार्यानी केलेले आहे. त्यांचे मते कृमि २ प्रकारचे असतात. १. सहज, २. वैकारिक.

गुळवेल (गिलोय) – फायदे, उपयोग व आयुर्वेदिक उपाय

गुळवेल – आयुर्वेदातील अमृतसमान औषधी वनस्पती

अमृततुल्य गुळवेलाचे अनंत लाभ असल्याकारणाने त्याला अमृता असे संबोधले आहे. गुळवेलाच्या नित्य उपयोगाने आपण निरोगी राहून अनेक रोगांपासून सुरक्षित राहू शकतो. गुळवेलींचे खोड ओळखण्याची प्रमुख ओळख म्हणजे ताणा आडवा कापला असता आतला भाग चक्राकार असतो. गुळवेलीचा तुकडा कुठेपण ठेवला तरी त्याला नवीन अंकुर फुटून गुळवेल वाढते, तसेच तोडून आणलेला गुळवेलीचा तुकडा घरात कित्तेक दिवस न

आयुर्वेदिक दिनचर्या: निरोगी जीवनासाठी प्रभावी मार्गदर्शक

दिनचर्या – आयुर्वेदातील दैनंदिन आरोग्यसंपन्न जीवनशैलीचे मार्गदर्शन – डॉ. हर्षल नेमाडे, Vedacare Ayurved

आजकाल भारतात वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय स्तरावर चांगल्या आरोग्यासाठी तीव्र प्रयत्न केले जात आहेत. परंतु हे प्रयत्न केवळ आजारी व्यक्तींना दिलासा देण्यासाठी आहेत. यामागील रोगांचे मूळ कारण नष्ट करण्याचे उद्दिष्ट त्यांच्याकडे नाही. इतर आरोग्य शास्त्रांच्या तुलनेत आयुर्वेद केवळ रोगांचा प्रारंभ टाळण्यासाठी उपाय सुचवत नाही, तर रोग झाल्यास त्यांच्यावर उपचार करून संपूर्ण मानवजातीवर मोठे उपकार केले