शितपित्त- अंगावर पित्त उठणे
आपल्यापैकी काहींना कधी ना कधी अंगावर खाज येऊन ‘शितपित्त’, ‘पित्त उठणे’, ‘चट्टे उठणे’, ‘गांधी उठणे’ असा त्रास जाणवला असेल. काहींना तापमान बदल्यावर, घाम आल्यावर, तणाव, चिंता, सूर्यप्रकाशात गेल्यावर, आणि गरम-थंड पाण्याचा संपर्क झाल्यावर, पित्त वाढल्यामुळे, शरीरातील इतर काही आजारांमुळे एखाद-दुसर्या वेळा असा त्रास होतो, तर काही लोकांना ऋतू बदलल्यावर, खूप दिवस सातत्याने किंवा काही महिन्यांपासून