निसर्गातील सूर्याप्रमाणे आपल्या शरीरात जाठराग्नी असतो. निसर्गातील निरनिराळ्या गोष्टी जसा सूर्यप्रकाशाचा त्याच्या उष्णतेचा विविध प्रकारे उपयोग करून घेतात आणि निसर्गातील सोमशक्ती आणि वायूशक्ती यातील संतूलन राखतात.
त्याचप्रमाणे शरीर उष्म्याचे किंवा जाठराग्निचे काम आहे. यासहच शरीरामध्ये जिवात्मा, मन, अहंकार, पंचज्ञानेंद्रिये आणि कर्मेन्द्रिय यांची जोड, उष्णतेच्या सहाय्याने व्याधी निवारण करण्यासाठी उपयोगी पडत असते.
अर्धे अंग लूळे पडल्यानंतर ओव्याच्या धूरीचा शेक द्यावा.
मज्जारज्जूला मार लागून हात पाय लूळे पडल्यास जळवा आणि नस्य यासह बांबू-वेखंड व हळद यांचा शेक द्यावा.
सर्वांगाला कंप सूटत असल्यास नवरात्रीत वापरायच्या पाच धान्यांचा दुधातून गरम गरम शेक करावा.
कोणत्याही अवयवामध्ये जखडलेपणाची भावना असल्यास सेंदेलोण व उडीदाच्या खिचडीचा शेक करावा. हातपाय सूकत असल्यास सूराकिण्व आणि जीवनीय गण यांचा दूधातून शेक करावा.
तोंड वाकडे झाले असल्यास नस्य आणि कर्णपूरणासहीत उडीदाची डाळ आणि ओवा यांच्या खिचडीचा शेक द्यावा.
फ्रोझन शोल्डर साठी तांदूळ, बला, खोबरे, लिंबू आणि अश्वगंधा यांचा षष्टीकपिण्डस्वेद रक्तमोक्षणासहीत करावा.
संपूर्ण त्वचा रूक्ष असल्यास गूळाचे पाणी आणि तूप गरम पाण्यात टाकून फडक्याने शेक करावा .
पोटाच्या अनेक विकारांसाठी पोटावर गव्हाचे पीठ, हळद, तैल यांचे पोटीस उपयोगी पडते.
अर्धशिशी आणि मज्जातंतूशी संबंधित डोकेदुखी अर्गूवादी चूर्णाचा शेक करावा.
संधीवात, आमवात आणि सांधे वाकडे होणे या आजारांसाठी जंगली चिंचोका आणि अळशी यांचा शेक करावा.
हातापायांच्या भेगांसाठी वांग , अळशी आणि भात एकत्र शिजवून शेक करावा.
पाठीच्या मणका त्यातील हाडे झिजणे, सूज येणे, चकती सरकणे इ. विकालांसाठी बोराचे बी, भाताची पेज, गाईचे तूप, तिळाचे तैल आणि तांदूळ एकत्र शिजवून केलेल्या भाताचा शेक करावा.
दररोज रात्री हातापायाला गोळे येत असल्यास हिंग, निर्गुंडी व आले एकत्र शिजवून त्याचा शेक करावा.
कोठेही वेदना होत असल्यास ( सांध्यात, डोक्यात, पोटात) मीठ व सुंठ एकत्र शिजवून त्याने शेक द्यावा.
गुध्रसी वातात (सायटिका) कमरेवरती व त्या त्या पायावर लसून, बंदुकीची पाने, चिंचेचा पाला , निर्गुंडी एकत्र शिजवून शेक करावा.
कंबरदुखीसाठी, मानदुखीसाठी नस्यासह अश्वगंधा व दुध यांचा शेक करावा. दम्यासाठी , फुप्फुस शैथिल्यासाठी अळशीचे पोटीस छातीला बांधावे.
अशाप्रकारे निरनिराळ्या औषधी पदार्थाच्या सहाय्याने शरीर अवयव शेकल्यास शरीरातील मांस, कण्डरा, सिरा, अस्थि, मेद, वातदोष, रक्त, पित्त आणि कफदोष यात सूसंगत बदल घडून पोटात घेत असलेल्या औषधांना आणि पंचकर्मांना मदत होवून वेदनांची मूक्ती होते.