पन्नास वर्षापेक्षा जास्त वयातील पुरुषांची प्रोस्टेटच्या त्रासांमुळे ग्रस्त असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. प्रोस्टेट ग्रंथी ही एक नर ग्रंथी आहे, आणि आकारात मोठ्या अक्रोडसारखे आहे. प्रोस्टेट मुत्रपिंडाच्या खाली स्थित एक लहान ग्रंथी आहे आणि मुत्राशयच्या पायथ्याजवळ, मुत्रमार्गाच्या सुरूवातीस मुत्रमार्गाभोवती स्थित आहे. हि ग्रंथी लैंगिक आणि लघवीच्या कार्यांमध्ये भूमिका आहे.
आयुर्वेदानुसार याला अष्ठिला म्हणतात. बस्तिप्रदेशी प्रकुपित झालेला वातदोष बस्ति आणि गुदभागी वात वाढवुन मुत्राशय आणि मलाशय यांचा अवरोध करून त्याठिकाणी तीव्र वेदना, वातसंचय, मुत्रावरोध आणि अल्पमुत्रप्रवृत्ति अशी लक्षणे उत्पन्न करून व बस्तिमुखाच्या ठिकाणी अष्ठिलेप्रमाणे कठीण, दगडाप्रमाणे दिसणारी चल व उन्नत अशी ग्रंथीला सुज उत्पन्न होते. अशा या ग्रंथीला मुत्राष्ठिला असे म्हटले जाते.
प्रोस्टेटचे विविध विकार आढळतात, यामध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढणे, बिनाईन प्रोस्टॅटिक हायपरट्रॉफी (बीपीएच) आणि प्रोस्टेट ग्रंथीमध्ये सुज किंवा जळजळ होणे.
प्रोस्टेट विकार झाल्यास मुत्रप्रवृत्ती होण्यास अडचण जाणवते आणि रात्रीच्या झोपेच्या वेळी वारंवार मुत्रप्रवृत्ती टाळण्याची गरज निर्माण होणे, कमरेच्या खालच्या भागामध्ये आणि मांड्या, पाय आणि पायामध्ये वेदनादायक वेदना जाणवतात.
प्रोस्टेट विकारांची कारणे / Causes of prostate disorders :-
वृद्धत्व मुख्य कारण आहे
काही व्यवसायामध्ये दीर्घ काळापर्यंत बसुन राहण्यामुळे मुत्राशयाच्या भागामध्ये दबाव वाढतो आणि परिणामी प्रोस्टेट ग्रंथीच्या आसपास आणि आसपासच्या पेशींना सुज येते.
लैंगिक उत्तेजनसाठीच्या औषधीमुळे सततच्या लैंगिक उत्तजनेमुळे ग्रंथीची सतत जळजळ झाल्यामुळे, सतत हस्तमैथुनाची सवय असणे.
दिवसभरात पुरेसे पाणी न पिण्यामुळे शरीरात पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ नसणे, यामुळे मुत्राचे आजार होणे. मुत्राचा वेग सतत अडवुन ठेवण्याची सवय असणे.
जास्त प्रमाणात अल्कोहोल किंवा कॅफीनयुक्त पेये पिण्याची सवय, मद्यपान.
दीर्घकाळापासून एकाच आधुनिक औषधीच्या सेवनाने
दैनंदिन आहार विहार चुकीचा असणे, वेळेवर जेवण न घेणे, यामुळे शरीरात आमविष तयार होऊन रोगनिर्मितीचा पाया रचला जातो.
प्रोस्टेट विकारांचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे मलावस्तंभ,सततच्या मलावस्तंभामुळे जेव्हा मल आतड्यात साचुन राहतो ज्याचा प्रोस्टेट ग्रंथीवर दबाव पडुन तिला सुज येते.
मुत्र मुत्राशयातुन सुरू होण्यास अडचण येते – मुत्र सुरु होण्यासाठी ताण द्यावा लागतो. मुत्राशय योग्यरित्या रिकामे होत नाही आणि काही मुत्र मागे राहते आणि त्यामुळे मुत्रप्रवृत्ती अर्धवट राहिल्याची संवेदना होते.
४) श्रम, मैथुन, उन्हात फिरणे, रात्री जागरण, व्यायाम, वाहनावर बसणे. या गोष्टी संपूर्ण वर्ज्य कराव्या. रक्तमोक्ष टाळावा.
५) योगाभ्यास – वज्रसन, सिद्धसन, गोमुखासन, बद्धपद्मासन, गुप्तसन, पश्चिमोत्तोसन, सर्वांगासन, पवनमुक्तासन, अश्विनी मुद्रा, मुलबंध, शताली प्राणायाम ई. आसन व प्राणायाम यांचा योगतज्ञाच्या सल्ल्यानुसार नियमित सरावाने फायदा होतो.
६) एकाच वेळी आणि विशेषत: रात्री मोठ्या प्रमाणावर द्रवपदार्थ टाळा.
७) विशेषत: रात्रीच्या जेवणानंतर अल्कोहोल आणि कॉफी टाळा. झोपायला जाण्यापूर्वी 2 तासांच्या आत पाणी पिण्याचे टाळा.
८) योग्य तज्ञ वैद्यकीय सल्ल्यानुसार आयुर्वेदिक औषधांच्या सेवनाने लवकर आराम मिळतो. औषधीचे सेवन वैद्याच्या सल्ल्यानुसारच करा. परस्पर औषधे घेणे टाळा.
९) वेळीच योग्य वैद्यकीय उपचार न केल्यास या रुग्णांमध्ये, मुत्रप्रवृत्ति करण्यास फार त्रास होणे, मुत्रमार्गात जंतूंचे संक्रमण, मुत्रमार्गात खडे बनणे, मुत्रमार्गातुन रक्त जाणे, मुत्राशायात मुत्र अडकुन राहणे, कर्करोग होण्याची शक्यता असते.