शितपित्त- अंगावर पित्त उठणे
व्यवहारात आपल्यापैकी काहींना कधी ना कधी अंगावर खाज येऊन ‘पित्त उठणे’, ‘चट्टे उठणे’, ‘गांधी उठणे’ असा त्रास जाणवला असेल. काहींना तापमान बदल्यावर, घाम आल्यावर, तणाव, चिंता, सूर्यप्रकाशात गेल्यावर, आणि गरम-थंड पाण्याचा संपर्क झाल्यावर, पित्त वाढल्यामुळे, शरीरातील इतर काही आजारांमुळे एखाद-दुसर्या वेळा असा त्रास होतो, तर काही लोकांना ऋतू बदलल्यावर, खूप दिवस सातत्याने किंवा काही महिन्यांपासून वर्षापर्यंत टिकू शकतो. तर काहींमध्ये जन्मतःच असलेल्या ऑटोइम्यून डिसऑर्डरमुळे सातत्याने हा रोग त्रास देताना आढळतो.
सामान्यत: या त्रासाला ऍलर्जी म्हणतात, हे चट्टे 24 तासांच्या आत कोणत्याही डागाशिवाय, जखमेशिवाय कमी होतात. पापण्या, ओठ आणि जीभ यासारख्या भागातील श्लेष्मल त्वचेचा सहभाग हा या पित्ताचाच एक गंभीर प्रकार असतो.