मनोविकार प्रकार

मानसिक आजार

बदलत्या आर्थिक,सामाजिक परिस्थितीमुळे आपण सर्व अत्यंत तणावाखाली वावरत आहोत. महागाई, नोकऱ्यांचा अभाव, नैसर्गिक आपत्ती (दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट) नोकरी असल्यास प्रचंड कामाचा ताण, मुलांचे भवितव्य,कुटुंबातील व्यक्तिची व्यसनाधिनता(दारू, सिगरेट), विभक्त कुटुंबपद्धती या सर्व घटकामुळे आपले मन कायम प्रचंड दडपणाखाली असते व एक दिवस भावनांचा बांध तुटतो व आपले आपल्यावरचे नियंत्रण सुटते. खालील काही लक्षणे आपण बदलत्या विकृत मानसिकतेकडे झुकत असल्याचे दर्शवतात.  

व्यक्ती काम करत नाही, तिची क्रियाशक्ति कमी होते.

कामात वारंवार चुका करणे.

आत्महत्येचे विचार आणि प्रयत्न.

चिडचिडपणामुळे घरात वारंवार भांडणे करणे.

कुटुंबातील सुसंवाद हरवणे.

कामात वारंवार चुका करणे.

नैराश्य किंवा डिप्रेशन  (Depression)

 

उदास,निराश,एकटे वाटणे.

सकाळी उठल्यावर ताजेतवाने न वाटणे.

काम करायची इच्छा न होणे.

कोणाशी बोलावे ही न वाटणे.

राग चिडचिडपणा वाटणे.

आवाज गोंगाट सहन न करणे.

रडू येणे पळून/सर्व सोडून निघून जावेसे वाटणे.

आत्महत्येचे विचार येणे.

मनोशारिरिक आजार (Somatic illnesses)

ताणतणाव अतिविचारामुळे मेंदुमध्ये रासायनिक बदल घडतात, ज्यामुळे खालील  शारिरिक लक्षणे दिसू शकतात.

सारखे पोट दुखणे, मळमळ उलटी होणे, बद्धकोष्ठता.

बेचैनी, घबराहट, हात पाय दुखणे.

सांधेदुखी, मान दुखणे, पाठ दुखणे.

पूर्ण शरीर दुखणे.

खुप थकल्यासारखे वाटणे.

अंगात शक्ति नाही असे वाटणे.

काळजी किंवा चिंताविकार  (Anxiety)

हातापायाची थरथर होणे, हातापायाला खुप घाम येणे

अति विचार करणे, भिती वाटणे, विसरभोळेपणा

छातीत धडधड, घाबरल्यासारखे वाटणे, छातीत दुखणे

झोप न लागणे, भूक न लागणे

बंद जागेची, गर्दिची भिती वाटणे, मरणाची भिती वाटणे

सारखे टेंशन मध्ये राहून कामात चुका करणे

मॅनिया / उन्माद / हर्षवायु ( Bipolar disorder )

यात व्यक्ति खूप पैसा खर्च करणे

अचानक देवपूजा, भक्ति जास्त करणे

गाणे म्हणणे, मोठमोठ्या गोष्टी करणे, झोप न लागणे

मारझोड, तोडफोड करणे

आपण खूप मोठी व्यक्ति आहोत या भ्रमात राहणे

आपण खूप लहान व्यक्ति आहोत या भ्रमात राहणे

स्किझोफ्रेनिया ( Schizophrenia)

स्वतःशीच एकट्यात बडबड करणे

संशय घेणे, भ्रम, भास अभास होणे

लोक आपल्याविषयी बोलत आहेत असे वाटणे

कोणीही नसताना कानात आवाज ऐकू येणे

एकटक बघत राहणे, गुंग राहणे

स्वतःशीच हसणे

हिस्टेरिया (Conversion)

हा आजार लहानांपासून-वृद्धांपर्यंत कोणासही होऊ शकतो

श्वास घेण्यास त्रास होणे, धाप लागणे

अचानक बेशूद्ध होणे, चित्रविचित्रपणे वागणे

हातापायाच्या अचानक संवेदना जाणे

वाचा जाणे, बोलणे बंद होणे, दृष्टि जाणे

वैद्य. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद
9175069155

वेदाकेअर हे औंध पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. जे सर्वोत्तम आयुर्वेदिक उपचार देते. वेदाकेअर औंध पुणे येथे सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संपर्क

9175069155
9028191155

वेळ

सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00

पत्ता

ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Exit mobile version