टाचदुखी आयुर्वेद उपचार
HEEL PAIN AND AYURVEDA

मनुष्याचे जीवन फार धावपळीचे झाले आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही थोडा वेळ व्यायाम करण्यासाठी काढत नाही. परंतु याचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात, आपल्याला दिसून येतात, जसे – लठ्ठपणा वाढणे, सांधे दुखणे, लवकर थकवा येणे इत्यादी. एक नवीन लक्षण आजकाल फार वाढलेला दिसतो ते आहे “ टाच दुखणे ” आजकाल टाचदुखीचे प्रमाण खूप वाढलेले बघण्यात येते.

वर वर पाहत जरी हे सामान्य वाटत असले तरी ज्याची टाच दुखत असते त्याला सकाळी उठल्यावर जमिनीला पाय टेकवताना ज्या काही वेदना होतात की त्या वेदना किती जीवघेण्या असतात ते त्यालाच समजते. 

आठवड्यापासून जरा जास्तीच दुखतंय, अनवाणी तर चालता येतच नाही, पण स्पंजची गादी असलेल्या चपला वापरल्या तरी त्रास होतोय, सकाळी उठल्यावर तर तळपायाची वेदना मस्तकात जाते, पायाला विश्रांती दिली की बरं वाटतं. 

परंतु सारखं बसून कसं चालायचं? एकीकडे वजन कमी करायला, फिरायला जायला हवं, पण फिरलं तर टाच दुखते, कसं व्हायचं? टाचांचा एक्स रे केला, त्यामध्ये दोन्ही टाचांना असलेले टोकं स्पष्ट दिसत होती. 

सुरुवातीला हाडांच्या डॉक्टरांनी गोळ्या दिल्या, पण त्याचा हवा तसा परिणाम होत नाही, असं दिसल्यावर टाचेत इंजेक्शन घेणे, पण ते घेऊनही काही महिन्यांपासून पुन्हा टाचदुखी सुरू होते. एकीकडे वजन कमी करायला, चालायला जायला हवं, पण चालल तर टाच दुखते, अश्याने कसं व्हायचं?

अशा प्रकारच्या पेशंटला काय त्रास होता? ते समजण्यासाठी आपल्या तळव्याची रचना ढोबळपणे पाहूया, पायाच्या तळव्याची टाच, चवडा, बोटे व टाच आणि चवड्याला जोडणारी कमान असे चार मुख्य भाग तळव्याची ही कमान ‘प्लांटर फेशिया’ नावाच्या अस्थिबंधनापासून बनलेली असते. 

चालण्याच्या क्रियेमध्ये आपल्या वजनाच्या वीसपट वजन टाचेवर पडत असते. या भाराचे योग्य विस्थापन करून तो पेलण्याचे काम ‘प्लांटर फेशिया’ हे अस्थिबंधन, तळव्याची चरबीची गादी व स्नायू यांच्या मदतीने वर्षानुवर्षे निरंतर करत असते. त्यामुळे कालांतराने पावलाच्या गादीची थोडीफार झीज होते. 

heel pain टाचदुखी ayurvedic treatment टाच दुखी उपाय टाचदुखी आयुर्वेद heel pain ayurvedic treatment टाचदुखी आयुर्वेद उपाय

HEAL HEEL PAIN WITH AYURVEDA

याशिवाय काही कारणांनी उदा. वजन जास्त असणे, स्थूलता, हायपोथायरॉईजम इत्यादी आजारामुळेही वजन वाढत असल्याने टाचदुखी होते, तळव्यांचे हाड वाढणे, अधिक वेळ चालणे किंवा उभे राहणे, उंच टाचांच्या चपला घालणे, वजन जास्त असणे, अनियमित किंवा सुटीच्या दिवशी व्यायाम करणे, सांधे दुखी, मणक्याचे विकार, उच्चरक्तदाब, वातरक्त इत्यादीमुळे पावलाच्या: टाचदुखीला सुरुवात होते.

सकाळी प्रथम उठताना या दुखण्याची तीव्रता अधिक असते. चालायला सुरुवात केल्यावर हळूहळू कमी होते. ज्या व्यक्तींना सतत उभे राहण्याचे काम असते, अश्या व्यक्तींना हा त्रास जास्त असतो. जास्त वेळ उभं राहिलं, टणक पृष्ठभागावरून चाललं तर त्रास परत वाढतो.

टाचदुखीमुळे चालणं फिरणं कमी होते, परिणामी व्यायाम कमी होतो आणि वजन वाढू लागते. वाढलेल्या वजनाचा परिणाम सर्व प्रथम टाचांवर होऊ लागतो. म्हणून थोडा व्यायाम नियमित करण्याची सवय ठेवावी.

१) फ्रीजमधील थंड पाणी किवां कोल्ड ड्रिंक, थंड पदार्थ खाणे,नियमित ए.सी मधील वातावरणात राहणे, ए.सी. चा वापर जेथे टाळता येणे शक्य नाही तेथेच करावा.

२) थंड पदार्थ अति प्रमाणात वारंवार घेण्यामुळे वजन वाढते. वाढलेल्या वजनाचा सर्वात जास्त भार टाचेवरच पडतो. त्या खालोखाल सर्वात जास्त भार टाचेवरच पडतो. त्या खालोखाल गुडघे नंतर कंबर व शेवटी मणक्यावर ताण पडल्यामुळे कंबरदुखी सुरु होते

३) दररोज सकाळी नियम माहित नसताना, तहान नसताना उगाचच पाणी पिण्यामुळे हे पाणी हाडांच्या भागात जास्त ओलावा निर्माण करतात आणि हाडांमध्ये सूज येऊ लागते.

टाच दुखी उपाय टाचदुखी आयुर्वेद heel pain ayurvedic treatment टाचदुखी आयुर्वेद उपाय

टाचदुखी उपाय

  • टाच दुखी ताबडतोब थांबवण्यासाठी सहन होईल इतक्या गरम पाण्यात खड़े मीठ टाकून १० मिनिटे पाय बुडवून बसावे. टाचा शेकाव्यात.
  • मऊ चपला मिळतात त्या वापराव्या.
  • सोपे एकसरसाइज जसे भिंतीला हात टेकून उभे रहायचे अणि पायाच्या बोटानी टाचा वर उचलून जागच्या जागेवर जॉगिंग करायच.
  • बर्फाच्या शेकाने स्नायूंना आलेली सूज जाते व त्यामुळे बरे वाटते.
  • योग्य प्रकारची पादत्राणे वापरणे देखील महत्त्वाचे आहे. शक्‍यतो, आपण आपल्या पायाचे बाक आणि टाचा यांना आधार आणि मऊपणा देणाऱ्या कमी ते मध्यम टाचेची पादत्राणे घालावीत. टाचा नसलेले शूज घालणे टाळावे. स्पंजची गादी असलेली पादत्राणे वापरावीत.
  • शक्य तेवढी विश्रांती घ्यावी.
  • वाढलेले वजन किंवा शरीरात असणाऱ्या इतर आजारांमुळे टाचदुखी होऊ शकते. यामुळे याचे योग्य निदान करून वेळीच योग्य उपचार केल्यास टाचदुखी टाळता येते.
  • चालण्याची चुकीची पद्धत टाळून यात योग्य सुधारणा करणे.
  • सतत उभे राहून काम करणे टाळावे
"टाचदुखीसाठी प्रभावी असे अग्निकर्म केल्यास टाचदुखी पासून त्वरित आराम मिळतो. परंतु कायमस्वरूपी बरे होण्यासाठी योग्य निदान करून आयुर्वेदिक औषध उपचार,आहार विहार पथ्य व आवश्यक पंचकर्म केल्यास कायमस्वरूपी आराम मिळतो."

वैद्य. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद
9175069155

best-ayurvedic-clinic-in-Pune

संपर्क

9175069155
9028191155

वेळ

सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00

पत्ता

ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे

वेदाकेअर आयुर्वेद पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. येथे आयुर्वेदिक उपचार मिळतात. पुणे येथील सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!