पथ्य अपथ्य
- अपथ्य : आहार
- मका, पालेभाज्या टाळाव्या. चुका, अंबाडी, करडई, मुळा, मिरची, गरम मसाले, तळून केलेले पदार्थ हे वर्ज्य करावे.
- कुळीथ, उडीद, वाल, वाटाणे, पावटे टाळावेत.
- मासे, डुक्कर, सांबर, सुकविलेले मांस-मासे टाळावेत.
- अननस, संत्री, पपनस टाळावेत.
- दही, ताक, आंबट ताक विशेषतः टाळावेत.
- सर्व प्रकारची गरम पेय टाळावेत.
- तांबडा भोपळा, साबुदाणा, लसूण टाळावेत.
- मध वापरू नये.
- दारूचा कोणताही प्रकार आसव-प्रकार, ऊस, पीयूष-लस्सी हे प्रकार जास्त आंबट पदार्थ (चिंच), मिठाचा जास्त प्रमाणात वापर – हे सर्व टाळावेत.
- व्यवाय, व्यायाम, दिवसा झोपणे, उन्हात काम करने टाळावे.