अल्सरेटिव्ह कोलायटिस आयुर्वेदिक उपचार
परिचय:
“डॉक्टर… गेल्या काही महिन्यांपासून मलात रक्त आणि पू येतोय, कधी तापही येतो… आणि सतत थकवा वाटतोय. ही काही गंभीर गोष्ट असू शकते का?” – रुग्णाने हलक्याशा घाबरलेल्या स्वरात विचारले.
डॉ. हर्षल नेमाडे, वेदाकेअर आयुर्वेदचे प्रमुख वैद्य, म्हणाले “हो, ही लक्षणं ‘अल्सरेटिव्ह कोलायटिस’कडे निर्देश करत आहेत. हा आजार गंभीर असला, तरी आयुर्वेदात त्यावर प्रभावी उपाय आहेत. योग्य निदान आणि नियोजनशीर उपचारांमुळे आपण या आजारावर नियंत्रण मिळवू शकतो.
जर तुम्हाला वारंवार सैल मलप्रवृत्ती होत असेल, मलात रक्त किंवा पू दिसत असेल, रक्तस्राव होत असेल, वजन कमी होत असेल, थकवा जाणवत असेल आणि रोगप्रतिकारक शक्ती कमजोर झाली असेल, तर ही अल्सरेटिव्ह कोलायटिस (UC) ची चिन्हे असू शकतात. हा एक गंभीर आजार आहे जो वेळेवर उपचार न केल्यास जीवघेणा ठरू शकतो.
पाश्चात्य उपचार पद्धतीमध्ये स्टेरॉइड्सद्वारे फक्त लक्षणे नियंत्रित केली जातात, पण औषधं बंद केल्यास रोग पुन्हा परत येतो. म्हणूनच, हा आजार पूर्णपणे बरा करण्यासाठी आयुर्वेद हाच खरा पर्याय आहे. डॉ. हर्षल नेमाडे (वेदाकेअर आयुर्वेद) यांच्या मार्गदर्शनाखाली, आम्ही अल्सरेटिव्ह कोलायटिसवर परिणामकारक आयुर्वेदिक उपचार पद्धत ऑफर करतो.
अल्सरेटिव्ह कोलायटिस म्हणजे काय?
“अल्सरेटिव्ह” म्हणजे जखम (अल्सर) आणि “कोलायटिस” म्हणजे कोलन (मोठे आतडे) यात सूज. म्हणजेच, मोठ्या आतड्यात जखमा होऊन सूज येणे हा अल्सरेटिव्ह कोलायटिस होय. या आजारामुळे मलाशय जवळील भाग प्रभावित होतो, म्हणून मलात रक्त, पू किंवा श्लेष्मा दिसू शकतो. हा आजार मोठ्या आतड्याच्या कार्यावर परिणाम करतो, ज्यामुळे मलविसर्जनाशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. पाश्चात्य उपचार पद्धतीत शेवटी शस्त्रक्रिया करून आतड्याचा प्रभावित भाग काढून टाकणे भाग पडते, परंतु आयुर्वेदिक उपचारांनी औषध, पंचकर्म आणि आहारयोग्य कोलनचे संरक्षण आणि रुग्णाच्या आरोग्याची बरा करता येतो.
आयुर्वेदिक दृष्टिकोनातून अल्सरेटिव्ह कोलायटिस
अल्सरेटिव्ह कोलायटिससारख्या ऑटोइम्यून रोगामध्ये तिन्ही दोषांचा समावेश असतो. अल्सरेटिव्ह कोलायटिसला आयुर्वेदात “सन्निपातज अतिसार” म्हणून संबोधले जाते, कारण यामध्ये तिन्ही दोषांचा समावेश असतो. याला “रक्तज अतिसार” (रक्तमिश्रित जुलाब) म्हणूनही काही प्रमाणात समजले जाते, परंतु सन्निपातज अतिसाराची लक्षणे याच्याशी अधिक जुळतात. चरक संहितेत याबाबत सविस्तर वर्णन आहे:
1. रक्तातिसार (रक्तमिश्रित अतिसार) Vs. सन्निपातज अतिसार
काही वैद्य रक्तातिसारासारख्या स्थिती शर्य UC ची तुलना करतात, पण खरंतर सन्निपातज अतिसार हा UC शी जास्त साम्य राखतो. चरक संहितेनुसार,
“शोणितादिषु धातुषु अतिप्रदुष्टेषु हारिद्र-हरित-नील-माञ्जिष्ठ-मांसधावन-सन्निकाशं रक्तं कृष्णं श्वेतं वराहभेदः सदृशम्…”
याचा अर्थ असा की,
- मलाचा रंग हिरवा, निळा, पिवळा, काळा किंवा रक्तसदृश असतो.
- पोटात वेदना आणि जळजळ होते.
- मलात श्लेष्मा (म्यूकस) येतो.
- वजन आणि स्नायूंचे प्रमाण कमी होते.
- रक्तक्षय (हिमोग्लोबिन कमी) होतो.
- भूक कमी लागते.
सन्निपातज अतिसाराची लक्षणे:
- मलाचा रंग बदलणे: लाल, हिरवा, निळा, पिवळा किंवा मांसाच्या रंगासारखा.
- पोटात अधूनमधून तीव्र वेदना.
- मलात श्लेष्मा (म्यूकस) जास्त प्रमाणात दिसणे.
- स्नायू आणि रक्ताची हानी (कमतरता).
- भूक मंदावणे आणि तोंडाला वाईट चव येणे.
या लक्षणांनुसार, हा आजार “कठीण साध्य” (उपचार करणे कठीण) मानला जातो, परंतु योग्य वेळी उपचार केल्यास पूर्ण बरे होण्याची शक्यता आहे. जर यातील बहुतेक लक्षणे दिसत असतील, तर हा आजार कठीण असा समजला जातो. पण वेळेवर उपचार केल्यास पूर्ण बरे होणे शक्य आहे.
अल्सरेटिव्ह कोलायटिस बरा होऊ शकतो का?
हा प्रश्न प्रत्येक रुग्णाच्या मनात येतो. अल्सरेटिव्ह कोलायटिस बरा होणे शक्य आहे की नाही, हे रुग्णाच्या सद्य स्थितीवर आणि आजाराच्या टप्प्यावर अवलंबून आहे. आयुर्वेदात याला दोन टप्प्यांमध्ये विभागले आहे:
बरी होण्यायोग्य अवस्था:
- आजार नवीन असेल. लवकर निदान झालेले
- सर्व लक्षणे उपस्थित नसतील.
- रुग्णाची शारीरिक ताकद चांगली असणे
- वजन खूप कमी झालेले नसणे
- भूक चांगली लागत असणे
या अवस्थेत आयुर्वेदिक उपचारांनी पूर्ण बरे होण्याची शक्यता आहे, परंतु यासाठी दीर्घकालीन उपचार आणि संयम आवश्यक आहे.
बरी होण्यास असाध्य अवस्था:
- मलाचा रंग काळा, मांसाच्या तुकड्यांसारखा किंवा तेलकट दिसणे.
- मलाला तीव्र दुर्गंधी येणे.
- अतिशय वजन कमी होणे
- रक्ताची कमतरता.
- स्नायूंची झीज होणे.
या अवस्थेत आजार पूर्णपणे बरा होणे कठीण आहे, परंतु आयुर्वेदिक उपचारांनी रुग्णाचे आयुष्य सुसह्य केले जाऊ शकते.
वेदाकेअर आयुर्वेद येथील उपचार पद्धती
- आजारा नियंत्रण: पहिल्या टप्प्यात आम्ही आजाराची तीव्रता कमी करतो.
- रोगप्रतिकारक शक्ती सुधारणे: दीर्घकालीन उपचारांनी रोगप्रतिकारक शक्ती बळकट केली जाते.
- सर्वांगीण उपचार: पंचकर्मा, आहार आणि औषधे यांच्या संयोजनाने रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होते.
उपचार सुरू केल्यानंतर पहिल्या १०-१५ दिवसांत बदल दिसू लागतात. पूर्ण उपचारासाठी ८ ते १२ महिन्यांचा कालावधी लागू शकतो, ज्यामध्ये आहार आणि जीवनशैलीतील बदलांचा समावेश आहे.
वेदाकेअर आयुर्वेद येथे आम्ही अल्सरेटिव्ह कोलायटिसवर मूळ कारणावर आधारित उपचार करतो. आयुर्वेद उपचारांचा हेतु केवळ लक्षणे कमी करणे नसून, आतड्यांचे आरोग्य सुधारणे आणि रोगप्रतिकारक शक्तीला बळकट करणे आहे. आयुर्वेद उपचार पद्धतीत खालील गोष्टींचा समावेश आहे.
१. पंचकर्म थेरपी:
- बस्ती चिकित्सा: आतड्यांचा दाह व सूज कमी करण्यासाठी आणि जखमांवर उपचार करण्यासाठी विशेष औषधी सिद्ध दुधाचा, तेलाचा आणि काढ्यांचा वापर केला जातो.
- शिरोधारा: तणाव कमी करण्यासाठी आणि शरीरातील दोष संतुलित करण्यासाठी.
- स्थानिक उपचार: पोटावर विशिष्ट लेप आणि तेल मालिश करून दाह कमी केला जातो.
- शिरोधारा: तणाव व मेंदूचा दाब कमी करण्यासाठी
२. आहार नियोजन:
आम्ही रुग्णाला विशेष आहार योजना देतो, ज्यामुळे आतड्यांना आराम मिळतो आणि उपचार प्रक्रिया जलद होते. यामध्ये पचनास हलके, पौष्टिक आणि दाहक-विरोधी पदार्थांचा समावेश असतो. उदाहरणार्थ:
- ताक, जे पचनास मदत करते.
- शिजवलेल्या भाज्या आणि सूप.
- तेलक मसाल्यांचा मर्यादित वापर.
- पचायला हलका, स्निग्ध आहार
- तांदूळ, मूग, संध्याकाळी गरम दूध
- तीव्र मसाले, तळलेले पदार्थ व थंड पाणी टाळणे
4. जीवनशैली सुधारणा:
- वेळच्या वेळी झोप
- मानसिक तणावाचे नियंत्रण
- योगासने (वज्रासन, पवनमुक्तासन, अनुलोम विलोम)
३. आयुर्वेदिक औषधे:
- अग्निदीपन: पचन सुधारण्याकरिता
- दोष संतुलित करणारी आणि आतड्यांचे आरोग्य सुधारणारी औषधे. यामध्ये कुटज, बिल्व, लोध्र, कुटज घनवटी, बिलवाडी चूर्ण, दादीमाष्टक चूर्ण, नागकेशर, मधुयस्ती, उशीरा, शतावरी यांसारख्या औषधीचा समावेश आहे. ही औषधे लक्षणे कमी करण्यापेक्षा रोगप्रतिकारक शक्ती बळकट करण्यावर आणि आतड्यांचे पुनर्जनन करण्यावर लक्ष केंद्रित करतात.
- रक्तशुद्धी, दाहशामन व गुदप्रदेशीय जखमा भरून येण्यास मदत करणारी औषधे
संशोधनानुसार, आयुर्वेदिक उपचार अल्सरेटिव्ह कोलायटिसच्या व्यवस्थापनात प्रभावी ठरू शकतात. २०१९ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात (Journal of Ayurveda and Integrative Medicine) असे दिसून आले की, कुटज आणि बिल्व यांसारख्या औषधी वनस्पतींमुळे आतड्यांचा दाह कमी होतो आणि मलातील रक्त कमी होते. तसेच, पंचकर्मा थेरपीमुळे आतड्यांचे कार्य सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते. वेदाकेअर आयुर्वेद येथे आम्ही या संशोधनावर आधारित उपचार पद्धती अवलंबतो.
वेदाकेअर आयुर्वेदचा उपचार दृष्टिकोन
उपचार प्रक्रियेची पद्धत
- नियुक्त वेळेवर भेट – रुग्णाने आधी अपॉइंटमेंट घ्यावी.
- संपूर्ण तपासणी व अहवाल पाहणी – प्रत्येक रिपोर्ट पाहून वैद्य उपचार योजना ठरवतात.
- औषधोपचार किंवा पंचकर्म योजना ठरवणे – काहींना फक्त औषधं पुरेशी ठरतात, तर काहींना पंचकर्म आवश्यक.
- तपासणीदरम्यान नियोजन – दर 15 दिवसांनी फॉलो-अप व औषधांच्या मात्रांमध्ये बदल.