पांढरे कोड – vitiligo

पांढरे कोड हा फक्त त्वचेचाच विकार आहे व यापासून शरीर अगर जीवित यास अपाय नाही. हा विकार स्पर्शसंचारीही नाही. लोक याला मानतात तितका तो भयंकर नाही; एवढेच नव्हे तर दिसण्याला त्वचा विरुप दिसते यापेक्षा त्या विकारापासून त्रासही नाही. हा थोडासा आनुवंशिक आहे. हा विकार दोन प्रकारचा असतो.

एका प्रकारात त्वचा पांढरी दिसते व दुसऱ्या प्रकारात लालसर असते.

पांढरे कोड VITILIGO

बहुधा या विकाराचा आरंभ ओठ, शिस्नावरील कातडी, कमर, डोळ्यांच्या पापण्या येथून होतो. कित्येकांस हात, पाय वगैरे ठिकाणी एखादा वाटोळा डाग येतो, तो सर्व बाजूंनी मोठा होत जातो. डाग असलेल्या जागेवरचे केस काही दिवसांनी पांढरे होतात व पुढे गळून पडतात. केव्हा केव्हा हा विकार सर्व अंगभर असतो व तेव्हा तो मनुष्य विद्रूप दिसतो. पांढऱ्या कोडाचे डाग लहान लहान व वेगळ्या वेगळ्या ठिकाणी दहापाच असले तर औषधांनी बरे होतात.

परंतु ओठावरील, तळहातावरील व शिस्नावरील डाग जात नाहीत. पांढरे कोड या विकाराविषयी पसरलेल्या गैरसमजुतीमुळे बऱ्याचदा त्रास भोगावा लागतो.

उपचार :-

पांढऱ्या कोडावर बरेच दिवस उपचार करावे लागतात. त्यासाठी तज्ञ वैद्याच्या मार्गदर्शनाखाली उपचार घ्यावे. 

पंचकर्म उपचारामध्ये वमनविरेचन औषधे घ्यावी.

तिखट आंबट आणि खारट हे पदार्थ खाऊ नयेत.

महागंधकरसायन दररोज लोण्याबरोबर घ्यावे.

बावची तेलात हरताळ, मनशीळ कालवून लेप द्यावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *