निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली – आयुर्वेद
आयुर्वेद हे एक प्राचीनतम भारतीय वैद्यकशास्त्र आहे. आयुर्वेदशास्त्राचे प्रयोजनच मुळी “ स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम् आतुरस्य विकारप्रशमनम् च ” हे आहे. अर्थात निरोगी व्यक्तीच्या आरोग्याचे संरक्षण करणे आणि एवढे करूनही जर रोग झालाच तर त्यावर उपचार करणे हे आयुर्वेदाचे प्रयोजन आहे. यामध्ये निरोगी व्यक्तीचे आरोग्य टिकवून ठेवण्यास सर्वोच्च प्राधान्य दिलेले आहे. रोगावर उपचार करणे ही दुय्यम बाब आहे. […]










