आमरस आवडतो मग हे वाचाचं

आंब्याचा रस हे उत्तम शक्‍तीवर्धक औषध आहे म्हणून वैशाख व जेष्ठ महिन्यात आंबे खावे. लहानांपासुन थोऱ्यामोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडणाऱ्या आमरसामुळे अशक्तता कमी होते, ताकद वाढते,वजन वाढण्यास मदत होते. कैऱ्या झाडावर असतानाच जमिनीवर पडू न देता, ते तोडून गवताच्या अढीत नैसर्गिकरीत्या पिकवलेला आंबाच वापरावा.  नैसर्गिकरीत्या पिकवलेला आंबा लवकर खराब होत नाही. केमिकल, कारबाईड, चुना लावलेल्या आंबा लवकर […]

चेहऱ्याचे आरोग्य आणि आयुर्वेद

Ayurvedic face care treatment by Dr. Harshal Nemade

मुरमे, पुटकुळ्या, डोळ्या खालील काळी वर्तुळे, नाकाचे हाड वाढणे, मुरमांचे खड्डे आणि डाग, अतिरिक्त लव (स्रीयांचे बाबतीत) हिरवी दाढी, चाई पडणे, रुक्षत्वचा, तेलकट त्वचा, तिरळेपणा, चामखिळ, वांग, दातांच्या विकृति, ओठावरील पांढरे डाग, चेहरा काळा पडणे इत्यादी कारणांनी चेहर्याचे आरोग्य बिघडते आणि त्याचा परिणाम शारिरीक मानसिक व्यक्तिमत्वावर घडतो. मानेपासून वरील भागांत आयुर्वेद शास्रानुसार रक्त आणि कफ

ग्रीष्म ऋतुचर्याGrishma Rutucharya

ग्रीष्म ऋतु – पित्तदोष नियंत्रित करणारी आयुर्वेदिक चर्या

वसंत ऋतु संपताच उन्हाळा सुरू होतो व सूर्याचे किरण तीव्र होऊन कडक ऊन पडते. उन्हाळा हा भारतातील सर्वात मोठा अर्थात जास्त दिवस राहणारा मौसम आहे. भारतात कित्येक ठिकाणी ८-१० महिने उन्हाळा असतो. तसे पाहिले तर ऋतु विचाराच्या दृष्टीने चैत्र ते आषाढ (एंप्रेल ते जुलाई) हा काळ उन्हाळ्याचा ऋतु मानला जातो. मे ते जुलै दरम्यान (अंदाजे)

वेदना, त्यावरील विविध शेक

Ayurvedic pain relief therapy at Vedacare Ayurveda

निसर्गातील सूर्याप्रमाणे आपल्या शरीरात जाठराग्नी असतो. निसर्गातील निरनिराळ्या गोष्टी जसा सूर्यप्रकाशाचा त्याच्या उष्णतेचा विविध प्रकारे उपयोग करून घेतात आणि निसर्गातील सोमशक्ती आणि वायूशक्ती यातील संतूलन राखतात.  त्याचप्रमाणे शरीर उष्म्याचे किंवा जाठराग्निचे काम आहे. यासहच शरीरामध्ये जिवात्मा, मन, अहंकार, पंचज्ञानेंद्रिये आणि कर्मेन्द्रिय यांची जोड, उष्णतेच्या सहाय्याने व्याधी निवारण करण्यासाठी उपयोगी पडत असते. अर्धे अंग लूळे पडल्यानंतर

जिव्हा परीक्षा – तुमची जीभ तुम्हाला काही सांगतेय का?

जीभेच्या रंगावरून आजार ओळखण्याची आयुर्वेदिक पद्धत

जिव्हा फक्त रसनेंद्रीय नसुन ते एक रोग परिक्षणाचे उत्तम साधन आहे. म्हटलेच आहे कि जीभ हा पोटाचा आरसा आहे. आयुर्वेद शास्त्र रोगाचे निदान करण्यावर भर देतो. आयुर्वेदातील प्रमुख उपचार तत्त्व हे निदानपरिवर्जन आणि संप्राप्ती भंग आहे. आयुर्वेदात रोगी परीक्षणाच्या विविध पद्धतींचे वर्णन केले आहे, अष्टविध परीक्षेच्या अंतर्गत जिव्हा परिक्षा (जीभ परीक्षा) एक आहे. याचा उल्लेख आचार्य योगरत्नकर

हिमोफिलिया: एक दुर्मिळ अनुवांशिक आजार

हीमोफिलिया (Haemophilia) रक्त न थांबण्याचा आजार आणि आयुर्वेदिक उपचार

हिमोफिलिया हा एक दुर्मिळ अनुवांशिक आजार आहे जो तुमच्या शरीराच्या रक्त गोठण्याच्या क्षमतेत अडथळा आणतो. हा वारसागत आजार साधारणपणे १०,००० लोकांमध्ये १ व्यक्तीला प्रभावित करतो आणि रक्तस्त्राव थांबवण्याच्या शरीराच्या क्षमतेला गंभीरपणे बाधा आणतो. जागतिक हिमोफिलिया दिनानिमित्त तुम्हाला माहित असायलाच हव्यात अशा काही महत्त्वाच्या गोष्टी हिमोफिलिया म्हणजे काय? हिमोफिलिया हा एक वारसागत आजार आहे ज्यामुळे इजा

सातु (यव,सत्तु) चे फायदे आणि उपयोग: आरोग्यदायी पौष्टिकता

सातू – नैसर्गिक आरोग्यवर्धक आहार – डॉ. हर्षल नेमाडे, Vedacare Ayurved

प्राचीन काळापासून सातुचा उपयोग केला जात आहे. तृणधान्यांपैकी सर्वाधिक प्रसारित झालेले व जगातील जवळजवळ सर्व देशांत पिकविले जाणारे सातूचे पीक फार पूर्वीपासून ज्ञात आहे. सातू हे धान्य एक दिव्य औषध आहे. सातु स्वाद आणि आकाराच्या दृष्टीने गव्हापेक्षा अगदी वेगळा आहे, परंतु हे गव्हाच्या जातींतील धान्य आहे. गुणधर्मात सातु गव्हापेक्षा हलके धान्य आहे. सातु भारतात सर्वत्र

अग्निमांद्य आणि भूक न लागण्यावर उपाय: आयुर्वेदिक उपचार

भूक न लागणे / भूक कमी होणे – आयुर्वेदिक कारणे, निदान व उपचार – डॉ. हर्षल नेमाडे, Vedacare Ayurveda

मंदाग्निचा अर्थ पचनशक्‍तीत विकार उत्पन्न होणे हा आहे, खाल्लेल्या अन्नाचे पचन ज्या कारणांनी होते त्यात बिघाड होऊन अन्नाचे पचन चांगले होत नाही. ह्याचेच नांव मंदाग्नि आहे. अन्नाने शरीराची वाढ होते आणि दैनंदिन काम करण्यामुळे शरीरातील ज्या द्रव्याचा क्षय होतो ती द्रव्यें शरीरास न मिळाली तर शरीराचा क्षय होणे निश्‍चितच आहे. प्रत्येक दिवशी खालेल्या जेवणामुळे शरीरातील

दम्याने दमू नका, तर दम भरा: दमा आयुर्वेदिक उपाय

दमा आणि श्वास लागणे – आयुर्वेदिक उपचारAyurvedic Treatment for Asthma

सामान्यतः दम लागल्यावर सर्वात प्रथम आठवते ते नेबुल्याझेशन म्हणजेच औषधीवाफ किंवा इंजेक्शन ज्यामुळे संकुचित श्वासवाहिन्यांचे प्रसारण होते व त्यातील अडकलेला कफ मोकळा होतो. या औषधांनी त्वरित्‌ पण तात्पुरते बरे वाटते, परंतु याने दमा कायमस्वरूपी बरा होत नसतो. श्वासवाहिन्यातील संकोच / अवरोध घालवणेसाठी पुन: पुन: इनहेलर स्प्रे, इंजेक्शन, वाफ घेणे, स्टेरॉईड्स्‌ हे वारंवार घ्यावे लागतात. हे

स्वरभंग आणि आवाज बसण्यावर उपाय: आयुर्वेदिक उपचार

आवाज बसणे, आवाजात भरकटपणा यावर आयुर्वेदिक उपाय

सर्दी, पडसे, खोकला, जुनाट खोकला, अति आंबट थंड पदार्थ खाणे घशातील जंतुसंसर्ग (थ्रोट इन्फेक्शन), स्वरयंत्राला सुज, घशातील फोड, घशाचा दाह किंवा घशात खवखवणे, घशाला मार लागणे, फार जोरात बोलण्याची सवय इत्यादी कारणांनी घशातून आवाज निघण्यास अडथळा होतो व त्यामुळे बोलण्याची शक्‍ती कमी होते. एखादे वेळी तर रोग्याचा आवाजे इतका बारीक होतो की, रोग्याने बराच जोर