विरेचन पंचकर्म
पंचकर्म ही अशीच वैशिष्ट्यपूर्ण शरीर शोधन चिकित्सा पद्धती असून हे आयुर्वेदाचे भूषणच म्हणावे लागेल. या पंचकर्म उपचारांनी शरीरातील बिघडलेल्या प्रमाणापेक्षा वाढलेल्या दोषांना (वात-पित्त-कफ) योग्य रितीने शरीराबाहेर काढून टाकले जाते, त्यामुळे दुर्धर रोग, वारंवार उद्भवणारे आजार, लहानसहान शारीरिक तक्रारी चांगल्याप्रकारे बऱ्या होतात. शिवाय निरोगी माणसाचे आरोग्य उत्तम टिकवले जाते. पंचकर्म चिकित्सेपैकी ‘विरेचन’ या उपक्रमात शरीरातील बिघडलेले