gall stone

पित्ताशयातील खडय़ाचे आयुर्वेदिक उपाय

पित्ताशयातील खडे हा बऱ्यापैकी आढळणारा एक पोटविकार. स्त्रियांत तो पुरुषांपेक्षा अधिक प्रमाणात आढळतो. बदलता आधुनिक आहार आणि जीवनशैलीनेमुळे काही आजार वाढत्या प्रमाणात आढळू लागले त्यापैकी हा एक.

पित्ताशयातील खड्यांवर आयुर्वेद चिकित्सेने खुपच चांगला व कायमस्वरूपी उपचार होतो. आयुर्वेदामध्ये प्रत्येक व्यक्‍ती ही दुसर्‍या व्यक्‍तींपेक्षा भिन्‍न मानली जाते म्हणजे जरी पित्ताशयातील खड्यांचे चार रुग्ण समोर असतील तरी त्यांची औषधे ही भिन्न भिन्न असतात.

प्रत्येक व्यक्‍तीच्या भिन्‍नतेवर, वैशिष्ट्यांवर, त्यांच्यातील शारीरिक लक्षणे कमी/अधिक होण्याच्या वेळा, त्यांची खाण्या-पिण्यातील आवडी-निवडी, आहार-तहान, डोक्यापासून पायापर्यंतच्या इतर तक्रारी व त्यांची माहिती, झोप-स्वप्न, थंड-उष्ण प्रकृती, अनुवंशिकता-आई/वडिलांच्या दोन्ही बाजूचे आजार व त्या त्या रुग्णाची मानसिकता इ. गोष्टींचा सखोल व सुक्ष्म अभ्यास करून त्या त्या रुग्णाच्या प्रकृतीनुसार, व्यक्‍तीमत्वानुसार योग्य औषधाची निवड करून दिले जाते.

पित्ताशय वाचवा, ऑपरेशन टाळा, निरोगी राहा.

योग्यवेळी पुरेशा प्रमाणात पाचक रस पाठविणे, इतरवेळी तो साठविणे ही जबाबदारी या पित्ताशयाची असते. त्याचे आकुंचन व प्रसरण या क्रियेमध्ये बाधा आल्यामुळे पित्ताचे(बाईलचे) प्रमाणापेक्षा जास्त साठवणूक झाल्यामुळे, त्याची घनता वाढून त्याची खर तयार होते व या खरीचे रूपांतर खड्यामध्ये होते.

हे खडे मूतखड्यापेक्षा टणक असल्यामुळे थोडेसे फुटायला व बाहेर पडायला वेळ लागतो. परंतु, कोणत्याही परिस्थितीत पित्ताशय काढणे हा त्याचा पर्याय होऊ शकत नाही.

अवास्तव खर्च करून शरीरातील एक महत्त्वाचा अवयव काढून पचनक्रिया कायमची पंगू करून घेण्यापेक्षा अशावेळी आयुर्वेदाचा आधार घेणे हे नक्‍कीच फायद्याचे व शहाणपणाचे ठरेल.

खडे फोडून शौचावाटे बाहेर काढण्याची क्षमता आयुर्वेदिक औषधांमध्ये आहे.

साधारणत: ऑपरेशन शिवाय या विकाराला अन्य औषध नाही असा गैरसमज पसरवला जातो; परंतु ६० टक्के रुग्णांचे पित्ताचे खडे हे औषधोपचारांनी जातात.

औषधोपचाराचा काही उपयोग नाही, असे गृहीत धरून ऑपरेशन केल्यास ही एक फार मोठी चूक होऊ शकते.

आरोग्यवर्धिनी, शंखवटी, फलत्रिकादि काढा, वरूणादि घृत, कुमारि आसव, पुनर्नवासव ई. यासारख्या औषधांचा उपयोग यामध्ये होतो. तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानं औषधोपचार करावेत.

अत्यायिक अवस्थेशिवाय तत्काळ ऑपरेशनचा निर्णय घेऊ नये. पित्ताचे खडे झाल्यावर होणाऱ्या उलट्या आणि पोटदुखी तर आयुर्वेदिक औषधोपचारांनी लगेच कमी होते असा अनुभव आहे.

व्याधीचं निदान झाल्यावर घाईघाईनं ऑपरेशनचा निर्णय न घेता आयुर्वेदिक उपचारांचा उपयोग केल्यास रुग्णांचं ऑपरेशन टळू शकतं.

शरीरात यकृताच्या मागच्या बाजूला पित्ताशय असतं. त्यातून पित्त आतड्यांमध्ये स्त्रवत असतं आणि ते अन्न पचण्यास मदत करतं. सर्व अन्नपदार्थ खाता यावेत,खाल्‍लेले सर्व पदार्थ पचविता आले पाहिजेत.

त्यासाठी उत्तम पाचक रसाची आवश्यकता असते आणि तो उत्तम पाचक रस साठविण्यासाठी पित्ताशयाची आवश्यकता असतेच असते. ऑपरेशनमध्ये हे पित्ताशय काढून टाकतात.

ते काढून टाकल्यामुळे कायम पचनाचा त्रास होतो. पित्ताशय काढून टाकल्यानंतर काही रुग्णांत पित्तनलिकेत पुन्हा खडेनिर्मिती होऊ शकते. क्वचित हा विकार कॅन्सरपर्यंत वाढायची शक्यता असते.

थोडक्यात, एकदा का हा आजार झाला की तो आयुष्यभर पिच्छा पुरवतो ! म्हणूनच ऑपरेशन टाळा! पित्ताशय वाचवा! निरोगी राहा.

पित्ताशयातील खडे टाळण्यासाठी काय करावे?

 • पित्ताशयात खडे होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी पित्तदोष संतुलित राहण्याकडे कायम लक्ष ठेवणे आवश्‍यक असते.
 • या विकारात वेळेवर जेवण करणं महत्त्वाचं असतं. भूक मंदावणे, मळमळणे यासाठी जेवणाआधी आलं लिंबाचा रस व सैंधव यांचे मिश्रण घेण्याचा फायदा होईल.
 • नाश्‍त्यासाठी, तसेच संध्याकाळी पाचच्या सुमाराला साळीच्या लाह्या, खाणे चांगले.
 • पित्तसंतुलनासाठी वैद्याच्या सल्ल्याने योग्य औषधोपचा घेणे. प्यायचे पाणी उकळून गाळून घेतलेले असावे.
  जेवणातील तेल-तुपाचे प्रमाण (स्वयंपाकातील) योग्य प्रमाणात असावे म्हणजे फोडणीसाठी माफक तेल, भातावर थोडे साजूक तूप (हे लोणी काढून घरी बनवलेले तूपच असावे) इतके चालेल.
 • पनीर, खोबरे व शेंगदाण्याचाही वापर माफक प्रमाणात करावा.
 • कृत्रिम रंग, रासायनिक प्रिझर्वेटिव्हज्‌ टाकलेले खाद्य पदार्थ टाळणे आवश्‍यक. ढोबळी मिरची, आंबट दही, कोबी, फ्लॉवर, चिंच, टोमॅटो, अननस, तळलेले पदार्थ, आंबवलेले पदार्थ टाळणे श्रेयस्कर.
 • योग्य प्रमाणात तेला-तुपाचा वापर आहारात असावा. फरसाण, वेफर्स, वडापाव यासारखे खाद्यपदार्थ टाळावेत. तळलेले पदार्थ, फास्ट फूड वरचेवर खाऊ नये. जेवणात रोज कोशिंबीर वा सॅलड घ्यावे.
 • चिकू, सफरचंद, पपई, संत्री, मोसंबी, केळे अशी फळे खावीत.
 • दर १५ दिवसांनी तीन दिवस साजूक तूप २-२ चमचे दोनवेळा गरम पाण्याबरोबर घेऊन चौथ्या दिवशी विरेचन म्हणजे जुलाबाचं औषध घ्यावं. यामुळे पित्ताचे खडे विरघळून जाण्यास मदत होते.
 • रोज नियमित व्यायाम करावा. रोज एक तास चालायला जावे. भुजंगासन, धनुरासन, पश्चिमोत्तानासन, सर्वांगासन, शलभासन या आसनाची मदत होते.
 • पित्तखड्यांच्या २ प्रकारांपैकी कोलेस्टेरॉलयुक्त खडे जास्त प्रमाणात आढळतात. शरीरात व पोटावरील अतिरिक्त चरबी, मधुमेह, उच्चरक्तदाब या समूहाचाच पित्ताचे खडे हा एक सदस्य आहे.

बऱ्याच रुग्णांत हे खडे निद्रिस्त असतात. पण जर का ते त्रास देऊ लागले तर त्याकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ला घेणे हितावह असते

वैद्य. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद
०२० ४८६०४०३९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top