जिव्हा परीक्षा – तुमची जीभ तुम्हाला काही सांगतेय का?

जिव्हा फक्त रसनेंद्रीय नसुन ते एक रोग परिक्षणाचे उत्तम साधन आहे. म्हटलेच आहे कि

“जीभ हा पोटाचा आरसा आहे.”

आयुर्वेद शास्त्र रोगाचे निदान करण्यावर भर देतो. आयुर्वेदातील प्रमुख उपचार तत्त्व हे निदानपरिवर्जन आणि संप्राप्ती भंग आहे.

आयुर्वेदात रोगी परीक्षणाच्या विविध पद्धतींचे वर्णन केले आहे, अष्टविध परीक्षेच्या अंतर्गत जिव्हा परिक्षा (जीभ परीक्षा) एक आहे. याचा उल्लेख आचार्य योगरत्नकर यांनी केला आहे.

आयुर्वेदासह युनानी आणि सिद्ध, पारंपारिक कोरियन प्रणाली तसेच ग्रीक चिकित्सकांसारख्या इतर प्रणालींनीही जिव्हा तपासणीचे वर्णन केले.

जीभ परीक्षेत आकार, रंग, ओलावा, हालचाल आणि जिभेवर आवरण/कोटिंग यांचे परीक्षण केले जाते. जिव्हा परिक्षणामध्ये आपली प्रकृती, दोषांचे असंतुलन, पचन अग्नि आणि कोष्ठ (अन्नवह संस्था) यांची माहिती समजते.

जिव्हा फक्त रसनेंद्रीय नसुन ते एक रोग परिक्षणाचे उत्तम साधन आहे. म्हटलेच आहे कि “जीभ हा पोटाचा आरसा आहे.”

आयुर्वेद शास्त्र रोगाचे निदान करण्यावर भर देतो. आयुर्वेदातील प्रमुख उपचार तत्त्व हे निदानपरिवर्जन आणि संप्राप्ती भंग आहे.

आयुर्वेदात रोगी परीक्षणाच्या विविध पद्धतींचे वर्णन केले आहे, अष्टविध परीक्षेच्या अंतर्गत जिव्हा परिक्षा (जीभ परीक्षा) एक आहे. याचा उल्लेख आचार्य योगरत्नकर यांनी केला आहे.

आयुर्वेदासह युनानी आणि सिद्ध, पारंपारिक कोरियन प्रणाली तसेच ग्रीक चिकित्सकांसारख्या इतर प्रणालींनीही जिव्हा तपासणीचे वर्णन केले.

जीभ परीक्षेत आकार, रंग, ओलावा, हालचाल आणि जिभेवर आवरण/कोटिंग यांचे परीक्षण केले जाते.

जिव्हा परिक्षणामध्ये आपली प्रकृती, दोषांचे असंतुलन, पचन अग्नि आणि कोष्ठ (अन्नवह संस्था) यांची माहिती समजते.

शरीरातील संतुलनाचे प्रतिबिंब तोंडात दिसते त्यामुळे रोगनिदानास मुखपरीक्षा बरीच मदत करते. सर्व साधारणपणे जीभेचा रंग फिक्कट गुलाबी असतो. त्यावर होणारा रंगद्रव्य बदल, जमणारा थर, ओलसरपणातील बदल, व्रण किंवा जीभेवरील श्लेष्मकलेतील बदल हे विविध रोगांचे निदर्शक असतात.

आयुर्वेदानुसार अग्निमांद्य हे सर्व रोगांचे मूळ कारण आहे. साम जिव्हा (जीभेवरील आवरण) पाचक संस्थेमधील आमाची (अपचीत अन्न) उपस्थिती दर्शवते.

जिव्हा परीक्षणामधील जीभेवरील लेप विविध रोगांचे निदान करण्यासाठी व रोगाची सद्य स्थिती समजण्यासाठी खूप महत्वाचे आहे.

वातदोष झाला असता जिव्हा थंड, खरखरीत व फुटीर असून पिवळट दिसते.

पित्ताची आरक्‍तवर्ण असून किंचित शामवर्ण असते.

कफाची शवेतवर्ण ओलसर, चिकट व बुळबुळीत असते. त्रिदोषाची काळी, वर काटे असलेली, शुष्क असते,

माणुस मरतांना मरणकाळची जीभ खरखरीत असून आत ओढलेली, फेसयुक्‍त, कठीण आणि चलनवलनरहित असते.

तसेच वातदोषांचे प्राबल्य असता जीभेची चव अगदी जाऊन तोंडास एक प्रकारची घाण येऊ लागते. व कोरडी होते.

पित्तप्रकोपानें जीभेची रुची कडवट, बेचव अशी होते, आणि कफकोपाने जीभ गुळमट, ओलसर अशी होते.

त्रिदोषकोपात जीभेस कोणतीही चव नसते व तोंडास घाण, जीभ बुरसलेली, काळसर कोरडी असते.

जर तुमची जीभ हलकी गुलाबी असेल आणि डाग नसेल तर ते निरोगी जीभेचे लक्षण आहे. अशी जीभ ओलसर आहे.

१. जीभ कोरडी व तकतकीत असल्यास– जुनाट प्रवाहिका, मधुमेह, आतड्याचे रोग, टायफाईड, आमाशय-दाह, बध्वांत्र, राजयक्षा पुर्णतेस आल्यावर, अंत्रावरण दाह हे रोग असतात.

जीभ कोरडी व मलयुक्‍त असल्यास– थंडी ताप, वात ज्वर, वारंवार असणारा ताप, अजीर्ण, विसर्प, गोवर, साथीचे ज्वर, कामला, आंत्रावरणदाह, फुप्फुसदाह, संततज्वर, संन्षिपात ज्वर, ज्वराची भयंकर स्थिती, श्वासोच्छवास नाकाने न होता तोंडाने होतो तेव्हां जीभ कोरडी पडते.

३. जीभेवर थर असल्यास– जर तुमच्या जीभेवर पांढरा जाडसर थर असेल तर ते कमी पचन आणि पोटातील आंबटपणाचे लक्षण आहे.

व्हायरल इन्फेक्शन, रक्‍तजन्य मूर्च्छा, पित्ततळीचा अभिष्यंद, बद्धकोष्ठता, अजीर्ण, विसर्प, मलसंचय, वातरक्त, आमाशयदाह, लिव्हर अबसेस, मधुमेह, मायग्रेन, मेंदूच्या आवरणाचा दाह, गोवर, ज्वर, क्षय, कंठग्रंथी, आमवात, ज्वर, जीभेवर मध्ये पांढरा मळ साठून कडा लाल असल्यास पचनेंद्रियाचा श्लेष्मल त्वचेचा त्वचारोग जाणावा.

ज्वरात, ज्वर असेपर्यंत बुरसा असतो, मार किंवा जखम, कोठा किवा आतडी किंवा यकृत. इत्यादी पचनासंबंधी इंद्रियांचे विकार असल्यास,

तुमच्या जीभेचा रंग पिवळसर असेल तर सावधगिरी बाळगा कारण ती यकृतविकार, अशक्तपणा, आतड्यात जळजळ, कावीळ, थकवा किंवा झोपेची कमतरता, सर्दी, विषाणूजन्य संसर्ग, आतड्यांसंबंधी समस्या आणि अपचन दर्शवते

४. जीभ काळी किवा उदी रंगाची असल्यास – विसर्प, टायफाईड, दीर्घ आमाशयदाह, लोह/ लोहयुक्त कल्प, कावीळ, रक्‍तपित्त, संततज्वर, अंत्रगळ, सन्निपात ज्वर, यक्ष्माज्वर, हे रोग असतात.

५. जीभ जाड असल्यास– रक्‍तकमी असल्यास, तोंड आल्यास, अग्निमांद्य, दीर्घ आमाशयदाह, सूज उलटणारा ज्वर, लाळ, अजीर्ण,

जीभ लाल, सुजलेली, पांढरा मळ असलेली दिसल्यास वातनाड्यांचा व मेंदूसंबंधाचा रोग समजावा.

जीभ अकुंचित असल्यास– रक्तस्त्राव, क्षीण हृदय, जिव्हामूळ रोग, कंठरोग, लालपिड रोग, जीभेच्या खाली वातवाहिनी शिरा आहे तिच्या किंवा तिच्या शाखांच्या विकाराने सकुंचित होते. पक्षाघातातही जीभ आकुंचित होते.

७. जीभेवर भेगा किवा चिरा असणें – मधुमेह, जीर्ण प्रवाहिका, विसर्प, उपदंश, मुखपाक ह्यांचे लक्षण समजावे.

८. जिव्हाकंप- मद्यसेवन, सर्वांगवात, कंपवात, तीव्रज्वर यांत जीभेला कंप सुटतो.

९. जीभ पुढे व काठवल्यास- घटसर्प, बुद्धिभ्रंश, जिव्हारोग, स्वरयंत्र रोग, जिभेच्या खालच्या नाडीचा घात, प्लीहारोग, हे समजावे.

१०. जीभ गाठळलेली असल्यास- एक प्रकारचा कृमिरोग समजावा.

११.संनिपातासारखे मोठे दुखणे येऊन गेल्यावर जीभेवर चिरा पडून जिभेच्या मागल्या बाजूस लहान लहानमृदू अशी छिद्रे पडतात. ही खूण ज्वर सुधारत चालल्याची समजावी.

१२. ज्वरात जेव्हां जीभ कोरडी होते तिचा क्रम असा की, प्रथम कडा कोरडा होतो. मग मध्यभागापर्यंत कोरडी होत जाते. त्यातच दोन्हींकडील बाजूही कोरड्या होऊन सर्वच जीभ कोरडी होते.

आता जीभ ओली होण्याची स्थिती याहून निराळी आहे. ती अशी की, प्रथम मधला भाग ओला होतो आणि तो टोकास व बाजूस पसरतो.

ज्वरात मेंदूची शक्‍ती कमी होत चालल्यास जीभ कोरडी पडते. सन्निपातात असा प्रकार घडतो. जीभ ओली असणे हे सुचिन्ह समजावे.

१३. ज्वरात झोप नसली म्हणजे जीभ कोरडी पडते किवा साधारणपणे झोपेच्या अभावातही जीभ कोरडी पडते.

तहान रोगात आणि मद्य वगेरे मादकपदार्थांच्या सेवनानेही जीभ कोरडी पडते.

१४. जीभ कोरडी असूनही संपुर्ण काळी असल्यास असाध्य लक्षण समजावे.

१५. मधुमेही रोग्याची जीभ- गुळगुळीत, चकचकीत ताज्या मांसासारखी दिसते व स्वच्छ दिसते पण कोरडी असते.

१६. दारू पिणाराची, अग्निमांद्याची,आतड्यांत क्षते पडलेल्याची आणि क्षयरोग्याची जीभ तांबडी अशी पुष्कळ वेळा पाहाण्यात येते व तिजवर तांबडे चरे असतात.

१७.जर औषधांचे दुष्परिणाम होत असतील तर जीभ जांभळ्या किंवा निळ्या रंगाची बनते. जर जीभ इतकी रंगली असेल तर ती विटामिन बी 2 ची कमतरता, शरीरावर वेदना आणि जळजळ होण्याचे, मज्जासंस्थेमधील गडबड दर्शवते.

१८. लाल तेजस्वी जीभ म्हणजे ताप, अंतर्गत इजा किंवा संसर्ग होय. विटामीन बी आणि लोहाच्या कमतरता देखील असू शकते.

१९. जीभेवर छोट्या छोट्या चिरा दिसल्यास समजून घ्या की तुमची प्रतिकारशक्ती प्रभावित झाली आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

२०. महिलांमध्ये जेव्हा मासिक पाळी सुरू होते तेव्हा जीभेचा पुढील भाग लाल होतो. याशिवाय हे शरीरात दुर्बलता आणि मानसिक अस्वस्थतेचे लक्षण आहे.

२१. जर जीभेच्या दोन्ही बाजु अधिक लाल झाल्या असतील तर आपल्याला आतड्यांसंबंधी समस्या उद्भवू शकतात.

आयुर्वेदात अष्टविध रुग्ण परीक्षेतील महत्वाच्या जीभेचे आरोग्य टिकवण्यासाठी दिनचर्येत जिव्हा निर्लेखन सांगितले आहे. जीभ स्वच्छ करण्यासाठी सोने, चांदी, तांब, पितळ धातुंचे तीक्ष्ण धार नसलेले, जिभेच्या आकाराचे नरम, मऊ आणि दहा अगुळे लांबीची वापरावी. परंतु यासाठी प्लास्टिक किंवा ब्रश चा वापर करू नये.

जिव्हानिर्लेखनामुळे तोंडातील बेचवपणा तसेच दुर्गधी दूर होते. रात्रीच्या अन्नाचे शिळे अंश अन्ननलिकेत अडकतात. त्यामुळे ते खराब होऊन सडते आणि तोंडाची चव बिघडते आणि मुखदुर्गंधी निर्माण होते. हे सर्व घालवण्यासाठी तसेच जीभेची सुज, जिभेचा कडकपणा आणि तोंडाला पुन्हा चव आणण्यासाठी जिव्हा निर्लेखन करावे. परंतु हे करतांना दाब व्यवस्थित असावा जीभ खूप जोरात दाबून साफ केली तर रक्त येऊ शकते आणि अत्यंत हलक्या हातांनी केले तर ते उपयोगी ठरत नाही.

संपर्क

9175069155
9028191155

वेळ

सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00

पत्ता

ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे

वेदाकेअर आयुर्वेद पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. येथे आयुर्वेदिक उपचार मिळतात. पुणे येथील सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.

2 thoughts on “जिव्हा परीक्षा – तुमची जीभ तुम्हाला काही सांगतेय का?”

  1. Pingback: तोतरे बोलणे उपाय

  2. Pingback: केस वाढीसाठी उपाय - www.harshalnemade.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Exit mobile version