नस्य

नस्य पंचकर्म 

आपले संपूर्ण शरीर व संपूर्ण विश्व हे पृथ्वी-आप-तेज-वायू-आकाश या पंचमहाभूतांपासून बनलेले आहे. त्यामुळेच ‘जे पिंडीते ब्रह्मांडी’ या न्यायाने आपल्या आसपासच्या जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या शरीर व मनावर परिणाम होत असतो.
बाह्य जगाचे हे ज्ञान आपल्या शरीराला पंचज्ञानेंद्रियामार्फत होत असते. (कर्ण-नेत्र-नाक-त्वचा-जिव्हा) म्हणूनच यापैकी एकाचेही कार्य उणावले तरी संपूर्ण शरीराचा समतोल ढासळू शकतो.

नाक है त्यापैकीच एक – संपूर्ण शरीराचा प्राण ज्यावर अवलंबून आहे असा आपला श्‍वास या श्‍वासाद्वारे संपूर्ण शरीराला जीवन शक्‍ती पुरविण्याचे कार्य हे छोटेसे इंद्रिय करत असते.
आयुर्वेदीय पंचकर्म (वमन-विरेचन-बस्ती-नस्य-रक्तमोक्षण) हे चिकित्सेचे पंचप्राणच आहेत. अशा या शरीर शोधनार्थ केल्या जाणाऱ्या पाच उपक्रमांपैकी ऊर्ध्वभागासाठी तसेच संपुर्ण शरीरासाठी नस्य हे अत्यंत महत्वाचे कर्म आहे.

नस्य :-

नाकावाटे विविध औषधे देण्याचे कर्म करणे म्हणजे नस्य होय. नस्य कर्म हे नाकावाटे वेगवेगळ्या हेतूंसाठी वेगवेगळी औषधे प्रविष्ट करण्याचा मार्ग आहे. औषधी अथवा औषधी सिध्द स्नेह यांना नासामार्गे ग्रहण करण्याच्या क्रियेस नस्य असे म्हणतात.

नासा ही शिरसो द्वारं… ।

केवळ नाकावाटे औषध देऊनही संपुर्ण शरीर स्थित व्याधींवर उपचार करता येतात.
नाक हे आपल्या मस्तिष्काचे/शिराचे द्वार आहे व म्हणूनच मानेच्यावरील सर्व अवयव अर्थात्‌ शिरःस्थानातील सर्व व्याधींसाठी नस्य हा प्रधान उपक्रम आहे.
शोधन चिकित्सेमध्ये उत्क्लिष्ट झालेले दोष जवळच्या मार्गाने शरिराबाहेर काढून टाकले जातात. शिरःप्रदेशी दोष असतांना त्यांना शरिराबाहेर काढून टाकण्याचा सर्वात जवळचा मार्ग नासा हा होय. पंचकर्म प्रक्रियांमध्ये नस्यविधीचा अंतर्भाव होतो.

वमन, विरेचन व बस्ति हे अनुक्रमे कफ, पित्त, वात दोषांच्या प्रकोपासाठी उपयोगात आणले जाणारे शोधनोपचार आहेत.
मात्र ‘नस्य’ ही कोणत्याही दोषाची विशिष्ट चिकित्सा नसून विविध कारणांनी आलेले स्थान-वैगुण्य दूर करणारी चिकित्सा आहे.
दोषांप्रमाणे विविध औषधे वापरून शिर:स्थानी असलेल्या तीनही दोषांची दुष्टी दूर करणे नस्यामुळे शक्‍य होते.

नस्य विधी :-

नासा हे शिराचे द्वार आहे. त्यामुळे त्याचे द्वारा दिलेले औषधी द्रव्य हे शिरःसंबंधी सर्व भागामध्ये पसरून तेथील व्याधीचा नाश करते. म्हणून उर्ध्वजत्रुगत विकारांमध्ये ‘नस्य’ या कर्माचे विशेष महत्व आहे.

नस्यकर्मामुळे रुग्णास औषधानुसार स्थानिक व सार्वदेहिक असा दोन्ही प्रकारे फायदा होतो.
नस्य या कर्मामुळे रूग्णाला मिळणारा फायदा मात्र त्वरित जाणवतो.
नस्य कर्मासाठी रुग्णांना पूर्वकर्मे करणेही सोपे जाते.
नस्य विधी हा करावयास सोपा, निर्धोक चिकित्सा प्रकार आहे.

नस्यासाठी रुग्णाला उपयुक्‍त वेळ देऊन सर्वप्रथम डोके, कपाळ, गळा, मान व खांदा यांना औषधीसिद्ध तेलाने मसाज करुन नंतर शेक देतात.
यानंतर सरळ झोपवून ड्रॉपरच्या/नस्यपात्राच्या सहाय्याने नाकाचे टोक आकाशाकडे करुन हळूवारपणे औषधीसिद्ध थेंब नाकात हळूवारपणे सोडतात.
यानंतर काहीवेळ आराम करून रुग्ण/व्यक्‍ती सर्व दैनंदिन कामे करू शकतो.

नस्यौषधी गिळू नये. औषध घशात आल्यास गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात यामुळे कंठात जमा झालेले औषध निघून जाण्यास मदत होते, तहान लागल्यास कोमटपाणी वारंवार प्यावे.
नस्य झाल्यावर बोलणे, हसणे, व्यायाम, आहार या गोष्टी करू नये. चिंता, राग टाळावा. नस्य केल्यानंतर रुग्णास अर्धा तास पर्यंत थंड हवा व पाणी यांचे संपर्कात जाऊ देऊ नये.
दुचाकी वरुन प्रवास करणे आवश्यक असल्यास कानामध्ये कापुस ठेवावा, कानांना रुमाल बांधावा तसेच नाकावर मास्क लावावा.

नस्य प्रकार :-

नाकामध्ये सोडण्याच्या या नस्य औषधींमध्ये खूप विविधता आहे. उदा. शुद्ध गोघृत, औषधी सिद्ध तूप, औषधी सिद्ध तेले, वनस्पतींचा स्वरस, वनस्पतीज सूक्ष्म चुर्ण, वनस्पती द्रव्यांचा धूप याप्रकारे निरनिराळ्या स्वरुपात हे नस्य दिले जाते.

त्याचप्रकारे काही नस्यद्रव्ये शरीर शोधनार्थ कार्य करतात तर काही नस्यांमुळे शरीर बृंहण अर्थात शरीरबल, वर्ण, तेज, यांची वृद्धी होण्यास मदत मिळते.
काही प्रकारची नस्ये ही आपण दरररोजही वापरु शकतो.

नस्य फायदे :-

नस्य हे कर्म अत्यंत निर्धोक व त्रासविरहीत आहे मात्र यातही व्यक्‍तीची प्रकृती, व्याधीची तीव्रता, जीर्णावस्था, ऋतु यानुसार कोणते नस्य द्यायचे हे तज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच ठरवावे लागते तरच त्याचे अपेक्षित फायदे दिसू शकतात. 

नासा हे शरिरातील एक महत्वाचे ज्ञानेंद्रिय आहे. श्‍वसन मार्गाची सुरुवात तेथूनच होत असते. शिर:प्रदेशामध्ये जे विविध व्याधी निर्माण होतात, ते उत्पन्न होण्यामध्ये ‘ नासा’ या इंद्रियाचा निदानाच्या दृष्टीने महत्वाचा सहभाग असतो.

शिर:स्थ दोषांची चिकित्सासुध्दा ‘नासा’वाटे केली जाते. चिकित्सा, उत्तमांग (शिर) या षडंगांपैकी एका महत्वाच्या अंगाची चिकित्सा, पृथ्वी महाभूताची चिकित्सा, प्राणवह, मज्जावह, शुक्रवह, मनोवह या स्त्रोतसांची चिकित्सा असे नस्य कर्माकडे विशाल दृष्टीने पाहिले जाते.

  • नस्याचे फायदे प्रामुख्याने सर्व प्रकारचे वातव्याधी, उदा. संधिवात पक्षाघात, विविध शिरोरोग, नासारोग, कर्णरोग, वातपित्तज मुखरोग, इ.

  • अकाली वार्धक्याच्या खुणा उदा:-केस गळणे, पिकणे, सुरकुत्या पडणे, शरीरशक्‍तीचा ऱ्हास होणे यामध्ये फायदा होतो.

  • प्रतिकारशक्‍ती कमी असण्यामुळे होणारे व्याधी, अलर्जी, जुनाट सर्दी, श्‍वास /दमा, कोणत्याही वासाने शिंका येणे यामध्ये फायदा होतो.

  • विविध प्रकारचे मानसिक व्याधी – उन्माद, अपस्मार, निद्रानाश यामध्ये नस्याचा अत्यंत लाभ होतो.
  • थायरोईड ग्रंथी वाढणे
  • टॉनसिल्सला सुज
  • नाकात कोंब असणे या व्याधीमध्ये वेगवेगळ्या नस्यप्रकाराचा उत्तम उपयोग होतो.
  • कफाने घसा, टाळू, कंठ भरलेला असला तरीही नस्याचा फायदा मिळतो.
  • गंधज्ञान नाहीसे होणे, वास न येणे, (अनोस्मिया) यांमध्ये नस्याचा उत्तम लाभ होतो.
  • मेंदुमधील ज्यांचे ऑपरेशन करता येऊ न शकणाऱ्या गाठी, अर्बुद यांचेसाठी नस्याचा आवर्जून उपयोग करावा. 
  • अपस्मार, मायग्रेन, ट्रायजेमिनल न्युरालजीया आदि व्याधींसाठी शिरोविरेचन नस्य उपयुक्त ठरते.
    मानसव्याधी – कफज उन्माद, मानसिक अवसाद डिप्रेशन
  • सिझोफ्रेनिया या मानसरोगांमध्ये एक प्रमुख चिकित्सा म्हणून नस्याचा उपयोग होतो.
  • डोके जड पडणे
  • अर्ध डोके दुखणे
  • मान जखडणे
  • स्पाँडीलोसीस
  • मणक्यात गॅप हाताला मुंग्या येणे
  • फ्रोजन शोल्डर
  • खांदा दुखणे
  • खांदा जखडणे
  • खांदा गळुन पडणे
  • जबडा अडकणे
  • चेहऱ्यावर काळे डाग
  • मुखरोग, पडजिभ सुजणे
  • कानात दुखणे
  • दातांचे रोग = दात हलणे- दुखणे- जखडणे, गदगदत्व,अपतंत्रक
  • विविध डोळ्यांचे वेगवेगळे आजार =
  • डोळ्याचा पक्षाघात
  • शुक्ररोग
  • स्त्री रोग
  • हार्मोन्स्यच्या विकृती
  • शिरोरोग
  • डोक्याचा कंप
  • चेहऱ्याचा पॅरालिसीस
  • डोके दुखणे
  • उन्हात गेल्यावर डोके दुखणे
  • आवाज बिघडणे
  • नाक कोरडे पडणे
  • अट्रोपिक रायनायटीस
  • बोलतांना जीभ अडकणे इ. रोगांमध्ये नस्य उपयुक्त ठरते.

असे असले तरी व्याधीच्या अवस्थेनुसार काही वेळा या नस्याबरोबरच इतर पंचकर्मांची व औषधींचीही जोड दिल्यास व्याधीमुक्‍ती लवकर होऊ शकते.

केवळ सुगंधाच्या सहाय्यानेपण काही शारीरिक व मानसिक व्यांधींवर उपचार केले जातात. यावरूनच आपल्याला नाक या इंद्रियाचे महत्व लक्षात येते. 

म्हणुनच नस्याचा आपल्या दिनचर्येत अंतर्भाव केल्यास पाचही ज्ञानेंन्द्रीयांचे कार्य वयाबरोबर कमी न होता वाढतच जाईल व आपले स्वस्थही वाढतच जाईल यात शंका नाही.

वैद्य. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद
9175069155

वेदाकेअर हे औंध पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. जे सर्वोत्तम आयुर्वेदिक उपचार देते. वेदाकेअर औंध पुणे येथे सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संपर्क

9175069155
9028191155

वेळ

सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00

पत्ता

ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!