वमन

१. पंचकर्म - वमन

‘पंचकर्म’ हे शोधन कर्म आहे. पंचकर्मापैकी सर्वात प्रथम कर्म वमन हे आहे. वात, पित्त, कफ या तीन दोषांपैकी वमन ही कफाची चिकित्सा.
ज्या कर्मामध्ये औषधांच्या उपयोगाने शरीरातील बिघडलेले दोषांना शास्त्रीय पद्धतीने उर्ध्वभाग (मुखावाटे) म्हणजे उलटीवाटे बाहेर काढले जाते त्यास वमन म्हणतात.

आयुर्वेदात कोणतेही कर्म हे ३ भागात केले जाते. ज्यामुळे या कर्माचा शरीराला व्याधीमुक्‍त करण्यासाठी व इतर कोणतेही अपाय होणार नाही. यामध्ये सर्व कर्म हे रुग्णाचे व व्याधीचे (आजाराचे) बल पाहून केले जातात. ते या प्रकारे –
१) पुर्व कर्म २) प्रधान कर्म ३) पश्‍चात कर्म
पुर्व कर्म :
हे कर्म वमनापूर्वी केले जाते. यामध्ये सर्व शरीरभर पसरलेले दोष कोष्ठात अर्थात पोटात आणले जातात, त्यामुळे त्यांना शरीरातून बाहेर काढण्यास सोपे जाते. यामध्ये २ भाग आहेत.

१) स्नेहन : १) अभ्यंतर २) बाह्य
१) अभ्यंतर : यामध्ये त्या त्या आजारानुसार औषधी द्रव्यांनी तयार केलेले तैल, तूप, किंवा साधे तूप पोटातून खाण्यास दिले जाते.
२) बाह्य : आजारानुसार औषधी द्रव्यांनी तयार केलेले तूप/तेल हे अंगाला बाहेरून चोळणे.
जसे एखाद्या भांड्याला तूप लावल्यावर काही द्रव्य त्या भांड्याला चिटकत नाही त्याप्रमाणे शरीरात तूप दिल्याने दोष कोठेही शरीरात चिटकून राहात नाहीत.
२) स्वेदन :
यामध्ये औषधी द्रव्यांची वाफ शरीराला देऊन घाम काढला जातो. त्यामुळे मोकळे झालेल्या दोषांना पोटात आणता येतात. पुर्वकर्म झाल्याचे चिन्ह : शरीराला इंद्रियांची प्रसन्नता शौचात स्नेहाचे तवंग दिसणे, भूक वाढणे, इ. लक्षणे दिसतात.

प्रधान कर्म : वरील प्रकारे ३ ते ७ दिवस ज्याची पूर्व तयारी झाली आहे व ज्याची सुखपूर्वक रात्री झोप झाली आहे व रात्रीचे जेवण पचले आहे. त्याला डोक्यावरून आंघोळ करून. गुरु देव यांची पूजा करून वमनाचे औषध देऊन उलटी करवली जाते.

 

वमन देत असताना त्या बरोबर, उलटी (वमन) सुखकर किंवा काहीही त्रास होऊ नये यासाठी त्याच्या बरोबरीने इतर औषधे (दुध, उसाचा रस, जेष्ठमध काढा, मिठाचे पाणी, मदनफळ) दिली जातात. त्याद्वारे वमन चांगले, विनासायास होते.
त्यामध्ये वमन करणारी व दुसऱ्या औषधी ज्याद्वारे वमन सुखकर होईल अशी औषधे म्हणजे वमनोपग (दुध, ऊसाचा रस, जेष्ठमधाचा काढा, मिठाचे पाणी, इ. औषधी दिले जातात.
पुर्वकर्मामुळे पोटात आलेले दोष ते स्वतः बाहेर पडू शकत नाही. ते दोष औषध द्रव्यांच्या मदतीने मुखावाटे अर्थात उलटीने बाहेर पाडले जातात. हे औषध घेतल्यानंतर रुग्णास ८ ते 10 उलट्या होतात.
वमन उत्तम/चांगले झाल्याचे चिन्ह : इंद्रिय प्रसन्नता, शरीर हलके वाटणे, आजाराची लक्षणे कमी होणे.

पश्‍चात कर्म :
यालाच संसर्जन कर्म असे म्हणतात. प्रधान कर्मामुळे नंतर जे थोडे फार दोष शरीरात शिल्लक राहिलेले असतात त्यांना पचवुन व जठाराग्नि वर्धन करण्यासाठी हे कर्म महत्त्वाचे आहे.
वमनानंतर रुग्णाला एकदम आहार देता येत नाही. कारण, त्यांचा अग्नि हा मंद झालेला असतो जर एकदम आहार दिला गेला तर शरीर ते आहार पचवुशकत नाही व त्या आहारामुळे शरीरात परत दोष संचित होऊ लागतात. यामध्ये रुग्णास लघुपासून गुरुपर्यंत हळूहळू आहार दिले जातात. त्यामुळे जठराग्नि वर्धन होते. हे कर्म ३ ते ७ दिवस पर्यंत केले जातात. यामध्ये प्रत्येक दिवशी एक विशिष्ट पद्धतीने आहार दिला जातो.
वमन पंचकर्म vaman

वमन कोणास द्यावे :

  • त्वचेचे विकार
  • अलर्जिक सर्दी
  • जुनाट सर्दी व कफ
  • अंगावर पित्ताच्या गाठी उठणे
  • सोरियासिस
  • वारंवार तोंड येणे
  • सायटिका
  • केसांच्या समस्या
  • वारंवार कफ होणे
  • मधुमेह
  • स्थुलपणा
  • विशेषतः कफाचे आजार
  • मानसिक आजार
  • स्थुलव्यक्‍ती
  • दमा
  • अम्लपित्त
  • पोटाचे विकार
  • पाळी न येणे
  • उन्हाची अलर्जी
  • पाळीचा अनियमितपणा
  • ऋतू बदलल्यावर होणारे विकार 
  • चरबी वाढणे
  • स्पॉडिलायटीस्‌
  • सायनस
  • पुरुष व स्त्री वंध्यत्व
  • पिम्पल्स
  • पांढरे कोड
  • वारंवार शौचास चिकट होणे
  • फिटस्‌ येणे
  • मुळव्याध
  • भगंदर
  • भुक न लागणे
वमन कोणास देऊ नये :
 
दुर्बल व्यक्‍ती, आजाराने क्षीण झालेले बाल, वृद्ध.
 
वमनास योग्य काळ :
 
वसंत ऋतुत सर्वांनी वमन घ्यावे. कारण सूर्यामुळे शरीरात घट्ट झालेला कफ वितळून शरीरात कफाचे आजार वाढतात.
वमनाचे फायदे :
यामुळे शरीरातील कफामुळे झालेले आजार नाहीशे होतात. शरीर कांती वाढते. इंद्रीय प्रसन्न होतात. शरीराची रोग प्रतिकार शक्‍ती वाढते.

वैद्य. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद
91750 69155

वेदाकेअर हे औंध पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. जे सर्वोत्तम आयुर्वेदिक उपचार देते. वेदाकेअर औंध पुणे येथे सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संपर्क

9175069155
9028191155

वेळ

सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00

पत्ता

ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे

2 thoughts on “वमन”

  1. Pingback: स्त्री वंध्यत्व – www.harshalnemade.com

  2. Pingback: पांढरे कोड - vitiligo - www.harshalnemade.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!