बस्ती म्हणजे एनिमा एक मोठा गैरसमज

बस्ती म्हणजे एनिमा असा व्यवहारातील भयंकर मोठा गैरसमज आहे. कृतीतील साधर्म्यामुळे हा गैरसमज झालेला आहे. परंतु पोट, मांड्या व पाठ, मांड्या याठिकाणी औषधी सिद्ध तेल लावून तेल लावलेल्या ठिकाणी विशिष्ट औषधी सिद्ध शेक करून पोटामध्ये औषधी सिद्ध स्नेह पदार्थ,तेल,काढे,दूध,तूप गुदमार्गाद्वारे घेणे अशा पद्धतीने बस्ती उपचार करावयाचा असतो. यापूर्वी शरीरातील अजीर्ण अग्निमांद्य नष्ट्य करायचे असते.

शरीरात वात दोष हा कफ व पित्त या दोन दोषांना काम करण्यास प्रवृत्त करत असतो. अशा वात दोषासाठी औषधी तेल हे अंत:बाहय वापरणे गरजेचे असते. त्याबरोबर बस्ति उपचार हि प्रत्येक आजाराची निम्मी उपचार पद्धत आहे. पाठीचा मणका आणि त्यावर परिणाम करणारे शरीरातील सर्व घटक आणि वातविकार जसे कंबरदुखी, मानदुखी, खांदेदुखी, हातापायाला मुग्या येणे, स्लीपडिस्क, कॉर्ड कॉमप्रेशन, गृध्रसी वात, हात पाय वाळणे, फ्रोझन शौल्डर, टेनिस एल्बो, त्वचा विकार, पोटाचे आजार, पित्ताचे विकार, गर्भाशयाचे आजार, वंध्यत्व ई. सर्व आजारात बस्ती उपचार उत्तम उपयोगी पडते.

यापन बस्ती, लेखन बस्ती, बृहण बस्ती असे निरनिराळे बस्ती शरीरातील अनेक विकारांना आयुर्वेदात सांगितले आहेत.

बस्ती उपचाराचा दुसरा फायदा म्हणजे कोणत्याही आजारात बस्ती उपचार केल्यामुळे हृदय, मस्तिष्क आणि वृक्क या तीन मर्मांचे आरोग्य आपोआपच सुधारले जाते. याची गरज कमी जास्त प्रमाणात पस्तीशीच्या नंतरच्या प्रत्येक व्यक्तीस भासते. या बस्तीमुळे हार्ट अटक, मेंदूत रक्तस्त्राव, पक्षघात, किडनी यासारख्या दुर्धर व्याधी भविष्यात उत्पन्न न होण्याची व्यवस्था आपोआपच होते. या फायद्यासारखा लाभ क्वचितच इतर उपचारांनी मिळू शकतो. रुग्णास असलेली लक्षणे कमी करण्यासाठी बस्तीचा कोर्से करणे आवश्यक असते.

बस्ती उपचारामध्ये दुखण, खुपण, पथ्य, पाणी आणि वेळेचा अपव्यय या गोष्टी फारश्या घडत नाहीत. रुग्ण इतर आजारांसाठी बस्ती घेण्यासाठी येतो आणि त्याचा बल, वर्ण, स्मृती तसेच इतर शरीर मानस भावामध्ये अमुलाग्र बदल होऊन शरीराचा कायाकल्प होतो. आवश्यकतेनुसार मोठ्या जुनाट आजारांमध्ये आजाराच्या अपुन:भवोत्थ्यसाठी २१-२१ बस्तीचा कोर्स सलग ३ महिने करणे आवश्यक असते.

वैद्य. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद
९१७५० ६९१५५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top