आमरस आवडतो मग हे वाचाचं

आंब्याचा रस हे उत्तम शक्‍तीवर्धक औषध आहे म्हणून वैशाख व जेष्ठ महिन्यात रोज पोटभर आंबे खावे. लहानांपासुन थोऱ्यामोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडणारा आमरसामुळे अशक्तता कमी होते, ताकद वाढते,वजन वाढण्यास मदत होते.

कैऱ्या झाडावर असतानाच जमिनीवर पडू न देता, ते तोडून गवताच्या अढीत नैसर्गिकरीत्या पिकवलेला आंबाच वापरावा.

 नैसर्गिकरीत्या पिकवलेला आंबा लवकर खराब होत नाही. केमिकल, कारबाईड, चुना लावलेल्या आंबा लवकर पिकते. परंतु याने आंब्याचे आयुष्य कमी, तो आंबट होते, शिवाय केमिकलमुळे शरीरावर गंभीर दुष्परिणाम होतात.

ताजा आंबा खाण्यापुर्वी स्वच्छ धुवुन काही वेळ पाण्यात भिजत ठेवाणे आवश्यक आहे, याने आंब्यातील उष्णता कमी होते, आंब्यावरील रसायने, धूळ, घाण, सुकलेला चीक, इत्यादि त्रासदायक गोष्टी निघुन जातात. पिकलेला आंबा तासभर साध्या पाण्यात बुडवून ठेवावा व नंतर खावा.

अश्याप्रकारे नैसर्गिकरित्या पिकवलेला डाग, टोच नसलेला, आमरस हा रुचिप्रद आहे. याने भूक वाढते, पचन सुधारते, जास्त खाल्ला तरी भूक मंद होत नाही. यामुळे शरीरात शक्तीचा पुरवठा होतो, मलप्रवृत्ती साफ होते. शरीरातील दाह कमी करतो, तहान लागणे कमी होते. आंब्याचा रस हा विशेषतः उत्तम वाजीकर आहे. म्हणजे संभोगशक्ती वाढविणारा आहे.

अर्धवट पिकलेला आंब्याचा रसामुळे वात, पित्त वाढते, रक्तपित्त घुळणा फुटणे, रक्तस्त्राव होतो, रक्त दुषित खराब होते. बाठलेला आंब्याचा रस कफ पित्त वाढवतो. नैसर्गिक पिकलेला आंब्याचा रस किंचित आंबट, गोड, पचायला जड, कफ वाढवणारा, वात कमी करणारा आणि शुक्र वाढवणारा असतो.

झाडावरच पिकलेला आंबा चवीला गोड, किंचित आंबट व अल्प प्रमाणात पित्त वाढवणारा असतो. तोच जर तोडून आढीत पिकवला तर चवीला गोड, पित्तनाशक होतो. आंब्यातून आंबट रस निघून गेल्याने व त्यात मधुर रस अधिक प्रमाणात झाल्याने पित्ताचा नाश करणारा असतो.

आंबा पिळून चोकून आमरस खाल्यास तो चव वाढवणारा, पचण्यास हलका, लवकर पचणारा, थंड, वातपित्त करणारा आहे, तर आंब्यातून रस काढून खाल्यास वातावरणातील हवेमुळे किंवा गार केल्यामुळे त्याच्या गुणधर्मात बदल घडून तो पचण्यास जड, उशिरा पचणारा असतो.

आंबा हा उत्तम पोषण करतो. शरीरातील रसरक्तमांसादी धातुंवर याचे विशेष कार्य दिसते. सामान्यत: असा समज आढळतो की, जास्त आंबे खाल्याने (फक्त आमरसच पोटभर खाणे) जुलाब होतात, आंव पडते परंतु हा योग्य नव्हे. आंबे स्वच्छ न धुता पोटात जाणे, हात अस्वच्छ असणे इत्यादींमुळे वरील त्रास होतो.

कधीही आंब्याचा रस हा गाळून त्यात दूध घालून चवीप्रमाणे तुप, सुंठ, वेलची, जायपत्री घालावी किंवा आंब्यासह ओवा, काळीमिरी, सैंधव असावे याने उत्तम लाभ होतो. दूध व तुपाबरोबर आंब्याचे सेवन केल्याने वायू तसेच पित्तविकारांचे शमन होते. आंब्याचा मधाबरोबर उपयोग केल्याने कफविकार दूर होतात.

जर आमरस आंबट असेल तर त्यात दुध एकत्र करू नये. चोकून आमरस खाल्ला असल्यास २ ते ३ तासांनी भुकेची जाणीव झाल्यावर दुध पिल्यास धातु वाढण्यास मदत होते.

आंब्याचा रस फडक्यावरून गाळून घ्यावा म्हणजे यातील धागे दोरे, रेषा निघून जातात. या रेषांमुळे पोटात दुखणे, अस्वस्थपणा जाणवणे, जुलाब होणे या तक्रारी जाणवतात.

aamras-mango-juice

जेवताना आंबा खाल्ल्याने मेद वाढतो, हिमग्लोबीन व लाल कण वाढवतात व कफवृद्‌धी होत नाही. आंबे आतड्यासाठी उत्तम टॉनिक आहे. आमाशयाच्या रोगांत ते उत्तम कार्य करतात, जठरातील पचनसंस्थेचे रोग, फुफ्फुसाचे रोग व रक्‍त कमी असल्याने होणारे रोग पिकलेल्या आंब्यांच्या व्यवस्थित प्रयोग केल्याने दूर होतात.

पिकलेला आंबा रस पोट स्वच्छ ठेवणार असतो. आंब्याच्या रसात मूदुरेचक गुण असल्याने शौचास साफ होते. ज्या लोकांना मलावरोध असतो त्याच्यासाठी आंबा अमृतसमान असतो. रसाच्या सेवनाने संग्रहणी, अम्लपित्त, आतड्याची सूज व आतड्याचे इतर रोग, यकृतवृद्धी वगैरेमध्येही फायदा होतो. तसेच त्याच्यामुळे लघवीही भरपूर होते.

रक्ताचे विकार, खाज किंवा त्वचा विकार नसल्यास आंबा रस खाताना जिरेपुड, सुंठ पावडर, सैंधव एकत्र करून मधून मधून चटणी सारखे चाटावे. यामुळे भुक वाढणे, तोंडाची चव सुधारणे, कफवात कमी होण्यास मदत होते.

ज्यांचे पचन चांगले आहे रोज १ आंबा खाणे वर दूध पिणे-असा क्रम ३ महिने केल्यास वजन वाढते, भूक लागणे, झोप सुधारणे, चिडचिडेपणा कमी होणे, यकृत-हृदय यांना बल मिळणे हे फायदे होतात.

हृदयाच्या स्नायुंची दुर्बलता, ब्लड प्रेशर असल्यास आमरस सिजनमध्ये नक्की खावा.

आंब्याच्या ओल्या साली आंघोळ करण्याआधी सर्व अंगाला चोळाव्या. याने मुरुम, पुटकुळ्या न येता, नित्य उपयोगाने त्वचा चमकदार, घट्ट व सौंदर्ययुक्त, निरोगी रहाते.

मधुमेही रुग्णांनी वैद्याचे सल्ल्याशिवाय हे आंबा खाणे योग्य नव्हे. तरी सामान्य अवस्थेत आठवड्यातून २ वेळा आंबा खाण्यास हरकत नसते.

वैद्य.हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद, पुणे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top